अकादमी 6 :- पाहिले रेकी ऑप

Submitted by सोन्याबापू on 15 April, 2015 - 05:57

वेपन्स मधे आम्ही आता बऱ्यापैकी निपुण झालो होतो 9 mm, ए के 47 तर आता आम्ही जणु तोंडपाठ केले होते, एका मिनिटात हत्यार खोलणे जोड़णे वगैरे खेळ पुढे सुरु झाले होते, ते झाले तेव्हा डोळ्याला पट्टी बांधून वेपन चे स्पेयर ओळखणे वगैरे ची प्रैक्टिस करत होतो. वेपन मधे ज़रा जम बसता सुरु झाले, ते मॅप रीडिंग. नकाशे, त्याचे वेगवेगळे प्रकार कंटूर मैप्स, ऑपरेशनल मैप्स, वेगवेगळी लेजेंड्स इत्यादी चा आमचा अभ्यास सुरु झाला होता.

मॅप रीडिंग चे लेक्चर अगदी भारी वाटे!, कारण त्यावेळी अंगमेहनत म्हणुन काही नसे, फ़क्त सावलीत बसायचे अन श्रवणभक्ति करायची , त्यात हळूहळू रस येऊ लागला होता, वेगवेगळे मॅप त्याच्यावरची चिन्हे, लेजेंड्स, रुट मार्किंग इत्यादी भारी वाटत असे. मग सुरु झाले ते मॅपरीडिंग एक्सरसाइजेज , ह्यात अजुनच मजा, पुर्ण सरंजाम धारण करुन पाठीला पिठ्ठू, पुढे छातीवर मैगज़ीन पाउच, स्लिंग ने लटकवलेली असाल्ट राइफल, डोक्यावर हेलमेट, पायात हंटर शूज सारखे बूट , पूर्ण camouflage यूनिफार्म अन उगा चेहऱ्यावर काळ्या वैक्स चे पट्टे!! आम्ही सारे ओसी अगदी झिंगाट कमांडो वेशात असायचो. त्याच्यामुळे का काय माहिती आजकाल ज़रा 'लड़कपन' जाऊन 'पोक्त' दिसायचा प्रयत्न केला जात असे.

अश्याच एका मैप रीडिंग एक्सरसाइज मधे झालेला तूफ़ान किस्सा, अदल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी मेस च्या नोटिस बोर्ड वर नोटिस दिसली

"Map reading field exercise tomorrow, fall in at at 0600 hrs in front of Scindia Hall, further instructions would be given accordingly."

आम्ही त्यादिवशी रात्री तयारी करण्यात गढुन गेलो, बूट्स साफ़ करणे, पाउच मधे शू पाउडर, ग्लूकोस चे डबे ठेवणे, नव्या लेस लावणे बुटाना, यूनिफार्म खुर्चीवर रेड़ी ठेवणे इत्यादी.

सकाळी पीटी ला सुट्टी होती, आम्ही आपले फुल किट लेडन अवस्थेत आपापल्या कंपनी मधे फॉल इन होतो. तेवढ्यात बड़े उस्ताद आले मागे मेस स्टाफ होता. त्याने एका उंच ठिकाणी चहा चा मोठा थर्मस ठेवला अन एक बॉक्स धरून उभा होता, बावचळल्या गत आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. तितक्यात बड़े उस्ताद बोलला.

"डेप्युटी अद्जुडेँट साहेब इंस्पेक्शन पे आयेंगे, सब फिट?"

"यसssssसरsssss"

आवाज वाढवून तो म्हणाला

"आवाज नहीं आ रही , अंतड़ीयाँ हग के आये हो या रात को खाना नहीं खाया? किसी को कोई तकलीफssss?"

"नोssssssss सरssssss" बेंबी ची देठे खरवडून ओसी ओरडले.

अंमळ संतोषाने उस्ताद बोलले

"ये बात!!! ये जोश!!! आराम से"

आम्ही ढीलाऊन विश्राम अवस्थेत उभे होतो.

"अभी सबलोग चाय बिस्कूट का नाश्ता करेंगे, पांच मिनट के अंदर. कोई भी बिस्कुट रैपर यहवहा नहीं फेकेगा, अपनी जेब में रखेगा, मैं बादमें हर कंपनी कमांडर से 7 रैपर जमा करूँगा . बाकी इंस्ट्रक्शन खुद डेप्युटी अद्जुडेन्ट साहेब देंगे"

सगळे कंपनी कमांडर जबर conscious झाले होते, ही मंडळी अमच्याच मित्रमंडळी मधुन निवडलेली होती!! परफॉरमेंस , डिसिप्लिन इत्यादी च्या बेसिस वर ते खालील प्रमाणे

अल्फा:- तेजु गुरुंग
ब्रावो :- सरदार गिल
चार्ली :- खुद्द मोसाय
डेल्टा :- अमित गौड़ा
ऐको :- नेमा सांगे

मी, पुनीत , अन्ना, समीर अन किश्या परफॉरमेंस ला बरे होतो पण आम्हाला आमची मस्ती करणे अन अकारण खी खी करणे नडले होते! आम्ही आपले बेरडागत शिक्षा ही हसत भोगत असु, अर्थात पुढे नियती च्या मनात माझ्यासाठी एक मोठा प्लान होता , ते पुढे कधीतरी.

चहा पिऊन झाला, गौड़ा ने बिचर्याने सगळी रैपर आपल्या साइड पॉकेट मधे भरली. तेवढ्यात डेप्युटी अद्जुडेन्ट विक्रम सिंह सर आले, आमच्याकडे तोंड करुन बड़े उस्ताद सावधान मधे उभे राहिले.

"परेडsssssssसावधानsssss"

आम्ही खट्टकन सावधान झालो.

"कंपनी कमांडर्स रिपोर्टsssss"

गुरुंग सावधान झाला होताच आता त्याने मार्च करत बड़े उस्ताद समोर जाऊन थम केले अन हळु आवाजात रिपोर्ट दिला. बाकी लोकांनी ही तसेच केले. प्रत्येक कमांडर रिपोर्ट देऊन परत आपापल्या कंपनी समोर येऊन पीछे मुड़ करुन सावधान मधे उभा होता.

परत एकदा बड़े उस्ताद चा आवाज आला

"परेडsssssविश्रामssss"

"परेडssss सावधानsssss, हिलो मतssssss"

अबाउट टर्न करुन तो विक्रम सरां समोर गेला तसे सर ही सावधान झाले, उस्तादजी ने कड़क सलूट मारला . तितकाच कड़क सलूट प्रतिसादात आला , अन सगळ्या कम्पनीज चे उस्ताद जे एकत्र एका कोपर्यात
उभे होते ते एका लाइन मधे सावधान झाले होते.

"श्रीमानssss 35 ओसी, 6 अदर रैंक, निरिक्षण में हाजिर है श्रीमानsssss"

आता विक्रम सर बोलले

"परेडsss विश्रामssss"

"परेड सावधानssss इंस्ट्रक्टर्स लाइन तोड़ssss"

"ओसीज, आज तुम्हे उस गुर में परखा जायेगा जो तुम्हे जिंदगी जीने के, अपने इलाखे को पहचाननेके और दुश्मन पर एज दिलाने के काम आएगा,सब रेड़ी?"

"यसsssss सरsssss"

"कोई दुःख कोई तकलीफ?"

"नोsssssसरsssss"

"आज हम मॅप रीडिंग और काउंटर इंसर्जंसी ऑप को एक करते हुए एक रेकॉनिस्संस ऑप सिमुलेट करेंगे, आपही के कुछ उस्ताद लोग दहशतगर्द बनेंगे और आपको कमांड सेंटर मतलब की मुझे उनकी लोकेशन और बाकी डिटेल्स देने होंगे, ये एक रेकी ऑप होगा,गोलियां कम से कम चलेंगी, एक्सपोज़र नहीं होगा, जंगल concealment की जैसे आपको सिखलाई दी गई है वैसे ही फॉलो की जायेगी...."

"अभी आपको मैप्स दिए जाएंगे उसकी स्ट्रेटेजी डीसाइड करने के लिए टाइम दिया जाएगा, ये सिमुलेशन एक्सरसाइज है इसीलिए गोलियां नहीं होगी, बस राइफल साथ में होगी..."

"कोई शक?

"नोssss सरssss"

"चौधरी उस्ताद जी आगे की करवाई शुरू करो"

"सब लोग एक कतार में कंपनीवाइज बस में चढ़ेंगे, सफ़र में कोई हल्ला नहीं करेगा, मैप्स स्टडी करो, बाकी चीजे फील्ड कमांड सेंटर पहुंचने पर डिस्कस करेंगे..... सिंगल लाइन तोड़"

आम्ही आपले बस मधे बसलो, गौड़ा मॅप घेऊन आला होता अन आम्ही आळीपाळी ने तो अभ्यासत होतो, अन अभ्यासांती आमचे लक्ष्य होते ललितपुर च्या जंगलाकड़े.

साधारण 0630 hr ला आम्ही जंगल ला पोचलो. तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या एका इंस्पेक्शन बंगलो मधे आमचे लुटुपुटु चे "कमांड एंड कंट्रोल सेंटर" एस्टेब्लिश केले गेले होते. एक टेबल , खुर्ची तिथे विक्रम सर आधी पासुन पोचुन स्थानापन्न झाले होते. त्यांच्यासमोर एक वॉकीटॉकी होता. बंगलो च्या मागे मेस स्टाफ आपले "फील्ड किचन" सेट करत होता.

आमच्या कंपनी एकमेका पासून 100 100 मीटर दूर कोंडाळे करुन ऑपरेशन प्लान करत होत्या आमची डेल्टा कंपनी म्हणजे मी, समीर, पुनीत, गौड़ा, प्रियांशु खुराना (हा दिल्ली चा होता), अनिल सिंह कुमावत (राजस्थान) अन त्सेरिंग नामग्याल (लदाख). बाकी तिघे ही मस्त होते, अर्थात ते आमच्या कोर मित्रांच्या गृप मधे नसले तरी मस्त मित्र झाले होते, डेल्टा ची ताकद होती आमची एकी.

एव्हाना विक्रम सर प्रत्येक कंपनी ची असेसमेंट करत आमच्या कंपनी समोर आले होते.

"हा तो मेरे डेल्टाज, प्लान फाइनल??"

"यस सर" गौड़ा

"आज कौन लीड करेगा?, गौड़ा आलरेडी कमांडर है ही तो इसबार लीडर अलग होगा."

आम्हाला वाटले होते गौड़ा कमांडर असेल तर तोच लीड करेल, म्हणले आली आता पंचाइत. गौड़ा आमच्याकडे पाहू लागला, काही सेकंद कोणी काही बोलना तसा मी उठलो,

"सर, ओसी बापूसाहेब, at your command sir"

"Good going OC, ओसीज आपके भाई बापुसाहब ने इनिशिएटिव लिया है, कोई दिक्कत?"

"नोssss सरsss"

"चलो बापु ब्रीफ करो मुझे" इति विक्रम सर!

म्हणले बोंबला!!! सुरुवातीला 5 सेकण्ड्स काही सुचलेच नाही पण हळूहळू ट्रेनिंग ने डोक्याचा कब्जा घेतला

"कंपनी बैठे बैठे सावधान"

पोरे न हलता कड़क बसली

**"फेलो ओसीज, आजकी करवाई रेकी ऑप, जित के लिए जरुरी है जंगल में मिल जाना, कम से कम हिलना और एलिमेंट ऑफ़ सरप्राइज....."

"....आज की करवाई का हमारा लक्ष्य, दुश्मन की सही पोजीशन मार्क करना, उसके जीपीएस कोआर्डिनेट लेना, और चुपके से वापस कमांड सेण्टर आना , हमें ट्रांसपोर्ट वे पॉइंट वन याने इंफिल्ट्रेशन पॉइंट तक ले जायेगी जो की हाईवे पर दक्षिण के तरफ 3 किमी है, वहां पर हम ट्रांसपोर्ट छोड़ कर अंदर घुसेंगे पूर्व की तरफ, हमें खबर मिली है जंगल में 15 कीमी पर इंसर्जन्ट्स का ठिकाना है,ये होगा वे पॉइंट टू माने टारगेट, वहां पहुंचकर रेकी के बाद हम 13 किमी पश्चिम के तरफ चल कर वे पॉइंट 3 माने राँडेव्हू पॉइंट पर पहुंचेंगे, वहा हमें पिकअप करने के लिए ट्रांसपोर्ट हाजिर होगा, जिसमे बैठ कर हम फिरसे फील्ड कमांड सेण्टर पर पहुंचेंगे,हमारा कोड है चिड़िया, सर होंगे बर्ड, टारगेट होगा वर्म, कमांड सेण्टर होगा नेस्ट और ट्रांसपोर्ट होगा उड़ान,वे पॉइंट वन के बाद रेडियो ब्लैकआउट होगा, ...."

"....मैं फिर से एक बार आगाह कर दूँ,जंगल में हम स्टैंडअलोन रहेंगे, यह ऑप सिर्फ ऑपरेशनल रेकॉनिसंस का है, हमें इंगेज नहीं करना है, कोई हड़बड़ाहट में करवाई नहीं करेगा, बाते हैण्ड साइन में होगी , हमारे लिए एम्बुश लगने की संभावना है, करवाई में सब सतर्क रहे, आज कोई डेल्टा जख्मी नहीं होगा , जो होगा उसे साथ में लाना है, जोश के साथ होश का ध्यान रखेंगे. कोई शक या सवाल???"

"नोssssसरssss" बैटरी चार्ज झालेली डेल्टा कार्टी दबक्या आवाजात कोकलली.

"वैरी गुड ब्रीफिंग बापु कैरी ऑन, गुड लक बॉयज"

"थैंक यु सर"

आता आम्ही सगळ्या कम्पनीज एकत्र आलो होतो अन तेव्हा बड़े उस्ताद ने बम फोडला,

"आजके इस एक्सरसाइज में पहले आने तीन कम्पनीज का नाम नोटिस बोर्ड पर लगेगा, ये एक टाइम बाउंड मिशन है, जो 1400 hrs तक टारगेट अचीव कर के कमांड सेण्टर आएगा खाना बस उसी को मिलेगा, कोई शक??"

"नोsssसरssss"

मनात म्हणले "तुमच्या मायला तुमच्या तुम्हाला नो सर बोलायला काय जाते, माझी लागली!!!"

तितक्यात आमची ट्रांसपोर्ट जिप्सी आली, त्यात सगळी पोरे बसली अन आमची वरात निघाली नामग्याल च्या हाती आमचे कम्युनिकेशन होते, वे पॉइंट वन ला उतरल्या बरोबर मी हाताने सिग्नल दिला तसे नामग्याल रेडियो वर हळूच बोलला
"this is chidiya to nest, repeat chidiya to nest"

" copied, this is bird from nest, go on chidiya"

"चिड़िया वर्म्स की तरफ बढ़ रही है ओवर"

"copied, गुड लक चिड़िया ओवर एंड आउट"

आता पुढे गरज असेल तितकाच कांटेक्ट होणार होता, शक्यतो नाहीच. आमची यात्रा सुरु झाली सर्वात पुढे मी मधे इतर मागे समीर, शिकवल्या प्रमाणे एका रांगेत दबक्या पावलाने चालत होतो. राइफल मधे एकही गोळी नसल्याचे माहिती असताना ही हाताची पकड़ तिच्यावर वर मजबूत होती.साधारण 0930 hrs ला आम्ही टारगेट जवळ पोचलो, एखाद किलोमीटर वर टारगेट असावे असा आमचा अंदाज होता. आम्ही तिथे रेस्ट स्टॉप घ्यावा असे मी कंपनी ला सांगितले अन आम्ही सराइता सारखे जंगलात विरघळू लागलो, वैक्स चे हिरवे काळे पट्टे तोंडावर आले , त्या जंगलात असंख्य पळसाची झाडे होती तेव्हा concealment साठी आम्ही त्याची पाने व गवत वापरले हेडगियर ते यूनिफार्म पळस पाने अन गवत खोचुन आम्ही चालती बोलती पळसाची झाडे झालो होतो.

ते सगळे झाल्यावर एक एक घोट पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो, साधारण 800 मीटर दक्षिण पुर्व पकडून आम्ही आलो होतो, कंपास सेट केला होता निघतानाच. नकाश्यात 3 नॉर्थ असतात
1. physical north
2. magnetic north (compass north)
3. grid north (north depicted on the map)

ह्या तिघांचा समन्वय साधुन जी उत्तर निघते ती रेफेरेंस मधे वपरायची असते अन हे सगळे ऐन जंगलात.

आमची नफरी (संख्याबल) कमी असल्यामुळे आम्ही टारगेट ला semicircular वेढा घालनार होतो ते आमचे तोंड south west कड़े करुन, जेणे करुन "टारगेट" पळायचे ठरवत असल्यास त्याला दक्षिण पश्चिमे ला आमच्या पोस्ट कड़े पळायला लागले असते. जर आम्ही एलिमेंट ऑफ़ सरप्राइज मेंटेन केला असता तर आम्ही त्यांची पोजीशन मार्क करुन विरुद्ध दिशेला 13 किमी हाईवे ला जाणार होतो जेणेकरुन आम्ही "आरव्ही पॉइंट" ला पोचलो असतो. अश्याने एक त्रिकोण बनला असता ज्याचा एक बिंदु टारगेट अन दोन बिंदु हाईवे वरच असलेले आमचे वे पॉइंट वन अन वे पॉइंट 3 (आरव्ही) हे झाले असते, थोडक्यात ह्या त्रिकोणी प्रवासाची हाईवे रूपी भुजा आम्ही गाड्यांत पार केली असती अन कंपनी कमी थकली असती. एक लीडर म्हणून मला प्लानिंग मधे तो मुद्दा घेणे गरजेचे होते.

तर सद्ध्या आम्ही त्रिकोणाच्या वे पॉइंट वन ते टारगेट ह्या भुजेवर टारगेट पासून 200 मीटर दुर होतो अन तिकडे हळू हळू क्रॉल करत सरकत होतो, आम्हाला भांडीकुंडी इत्यादी चा आवाज यायला लागला तसे आम्ही थांबलो अन जमिनीवर ओनवे पडून ऐकत होतो!, ह्यावेळी थेट टारगेट ला न जाता आम्ही हळू हळू विरुद्ध दिशेला टारगेट ला सामानांतर जात जात टारगेट जवळ पोचलो आता आमची थोबाड़े थेट टारगेट कड़े होती अन अंतर अंदाजे 150 मीटर होते,

मी खुणेनेच सांगितले तसे प्रियांशु अन समीर माझ्या सोबत पुढे यायला सज्ज झाले नामग्याल गौड़ा अन अनिल तीन दिशांना तोंडें करुन राइफल सरसावुन बसले अन पुनीत ज़रा vantage पॉइंट असावा म्हणुन मी जवळ च्या जांभळी वर चढवला. आता मी समीर अन प्रियांशु घसटत क्रॉल करत पार त्या टारगेट एरिया (एक जुने पंपहाउस) च्या उजव्या बाजूला 25 मीटर पोचलो होतो, concealment असले झकास होते की कोणाच्या बापाला इथे पुर्ण प्रशिक्षित हत्यारबंद तीन ओसी आहेत हे कळु नये! आमच्या मागे 50 मीटर वर आम्हाला कवर करायला 3 बसले होते अन समस्त हालचाल ब्रह्मदेव बघतो तशी पाहायला जांभळी वर पुनीत राजे बसले होते. आता आम्ही कुजबुजत ही नव्हतो समस्त संवाद करपल्लवी ने होत होता. समोर जे दिसले ते पाहून आम्हाला भयंकरच हसु आले कारण समोर साक्षात् बड़े उस्ताद , शर्मा उस्ताद , गुल मोहम्मद उस्ताद अन सोलंकी उस्ताद , अफगानी वेष धारण करुन बसले होते, शर्मा उस्ताद जेवण बनवयच्या तयारीत होते, बड़े उस्ताद माळ जपत बसले होते अन बाकी उरलेली उस्तादद्वयी दोन खाटावर झोपले होते!!, मी प्रियांशु ला इशारा केला त्याने मला एक पॉइंट एंड शूट दिला , सेटिंग मधून त्याचा फ्लॅश बंद करुन मी हळूच हात वर घेतला अन खटाखट त्यांचे 3 4 फोटो काढले!!. केला तितका पराक्रम पुरे म्हणत हळूहळू मागे आलो, आम्ही परत आलेल्याचे पाहुन पुनीत ही झाडावरून उतरला, सगळ्यांना "mission accomplished" चा thumbs up देऊन आम्ही पश्चिमोत्तर दिशेला वे पॉइंट् 3 उर्फ़ आरव्ही कड़े परतीचा प्रवास सुरु केला , आलो तसे 100 मीटर क्रॉल करत दाट राईमधे आलो, जरा बसलो, परत एक एक घोट पाणी प्यायलो अन सुसाट सुटलो, मैप अनुसार वे पॉइंट 3 च्या आसपास आलेल्याची चिन्हे दिसली तसे मी नामग्याल ला इशारा केला अन तब्बल 4 तासाने आम्ही पहिला शब्द बोललो

"nest this is chidiya one, do you copy?"

"copied. chidiya one this is bird, sitrep?"

"worms located , approaching RV , requesting extraction over"

"copied. approach RV, stand by for extraction udan in 30 minutes.over and out"

आम्ही आरव्ही ला पोचुन एका हत्ती गवताच्या माजलेल्या बेटात पहुड़लो होतो!! आता आम्ही हळू आवाजात का होईना बोलत होतो , पुनीत शिव्या घालत होता झाडावर चढ़ायला लावल्या बद्दल अन स्वतःच हसत होता!.

काही वेळाने रेडियो वर मेसेज आला

"chidiya this is udan, extraction authorised make contact, over"

"udan this is chidiya one approaching for extraction, over and out"

आता आम्ही हाईवे वर धावत पोचलो, चालता चालता थोड़ी स्लो झालेली जिप्सी पाहताच आम्ही एक एक करत धावत्या जिप्सी मधे चढ़लो अन जिप्सी सुसाट सुटली. फील्ड कमांड सेण्टर ला पोचलो तेव्हा सर स्वतः दारात उभे होते, पावणे दोन वाजले होते , मिशन पूर्ण झाले होते, एक्सपोज़र झाले नव्हते अन आम्ही 7 सेफ होतो.

आम्हाला मिळालेल्या ऑर्डर नुसार आम्ही "चने-पुरी" च्या जेवणावर तुटून पडलो होतो! हळू हळू एक एक कंपनी आली दोन ला दहा कमी असताना ऐको अन दोन ला पाच कमी असताना ब्रावो, बिचारे अल्फा अन चार्ली कंपनी चे आमचे दोस्त उपाशी राहिले!.

निघायच्या आधी काही वेळ आमचे "टेररिस्ट"उस्ताद आले! अन हँसीमजाक ला उधाण आले, विक्रम सर पण सामील होते, बड़े उस्ताद सगळ्यांना ते कुठे एक्सपोज़ झाले ते सांगत होते. प्रथम सांगे ला उभा केला

"सांगे तेरी गलती बता??"
"सर मैंने कॅमेरा का फ़्लैश बंद नहीं किया"
"गुरुंग तु बोल???" सर आमको खांसी आया!!

असे एकेकाला त्यांच्या चुका सांगितल्या गेल्या, कुठली कंपनी कुठे कशी लपली होती इतपत डिटेल देऊ लागले उस्ताद तसे मला वाटले माझी ही पोजीशन कोम्प्रोमाईज़ झाली असणार, शेवटी माझी बारी आली

"बापुसाब और डेल्टा कंपनी खड़े हॉप" आम्ही सावधान मधे उभे राहिलो , अन कान टवकारून ऐकू लागलो,अन ते मस्त शब्द बड़े उस्ताद च्या तोंडुन निघाले

"तुम रेगुलर मकरे कहा छुपे थे पता ही नहीं चला!!, बॉयज आजकी अपनी विनर कंपनी डेल्टा कंपनी"

"थ्री चियर्स टू डेल्टा हिप हिप हुर्रे"

मला एका सेकंदात जिंकल्याचे कळले! उस्ताद पुढे म्हणाला

"अब अपना पुरा प्लानिंग और execution बताओ बापुसाहब"

पुढल्या अर्ध्या तासात मी वर लिहिलेले सगळे बाकी बैचमेट अन सर अन उस्तादवृंदाला समजवले

आयुष्याच्या शाळेत, मेंदू च्या पाटीवर , "जंगल वारफेयर" चा पहिला "अ" गिरवला गेला होता.

**मुळ मैप रीडिंग अन रेडियो कम्युनिकेशन हे फार टेक्निकल जारगन असणारे असतात ते मी मायबाप वाचकांसाठी थोड़े सुलभ करुन टाकले आहेत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थ्री चियर्स टू डेल्टा हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे .....

ग्रेट - कौतुक करायला शब्द अपुरे पडताहेत ...

सोहोण्याबाहापु..
आप पकडे गये. अरे हम भी आपके साथ थे और आपको देख रहे थे . हर कदम.
इतके प्रत्ययकारी वर्णन ...
ग्रेट !

रॉबिनहुड,

लैच!!! आपको तो साथ में रखना ही होगा साहब! वर्ना हमारे अकादमी में कैसे घुल मिल जाओगे Happy

बाकी सगळ्या लोकहो,

मज सारख्या लेखन कला नसलेल्या शिपाईगड्याला लाड अन प्रेम दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार

खुप थरारक..

असे शिक्षण घेता आले नाही याची खंत आहेच. पण हे सगळे वाचून अगदी प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे नक्कीच वाटत राहते.

सोन्याबापू,

तुमची ही लेखमालिका अप्रतिम आहे! काही भाग थरारक तर काही काळजाला हात घालणारे आहेत. आम्ही नुस्तं श्वास रोखून वाचतो, तुम्हीतर त्यातला शब्दन् शब्द जगला आहात. हॅट्स ऑफ!

पुढल्या भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

फार मजा आली या भागात. अफगाणी ड्रेसातले माळ ओढणारे बडे उस्ताद, "रेगुलर मकरे" वगैरे वाचून फार हसू आलं.
"आवाज नहीं आ रही , अंतड़ीयाँ हग के आये हो या रात को खाना नहीं खाया? किसी को कोई तकलीफssss?" >>> Lol एकूणच या तुमच्या मालिकेत फौजी भाषेतला रॉ ह्यूमर वाचायला मज्जा वाटतेय Happy

फौजी भाषेतला रॉ ह्यूमर वाचायला मज्जा वाटतेय

अहो कसला ह्यूमर अन कसले तेव्हा त्यावेळी काही सुचत नसे! Lol Lol

सोहोण्याबाहापु बाकी ट्रेनिंगचे हे मैत्रीबंध आयुषभर कुटुंबियांसारखे अतूट राहत असणार !

बापूसाहेब... श्वास रोखून वाचलं सगळं... ट्रेनिंग आहे हे माहीत असूनही.
फौजी भाषेतला रॉ ह्यूमर वाचायला मज्जा वाटतेय>> अगदी अगदी

सोहोण्याबाहापु बाकी ट्रेनिंगचे हे मैत्रीबंध आयुषभर कुटुंबियांसारखे अतूट राहत असणार !

अलबत!!! ज्या परिस्थितीत ही मैत्री होते, घट्टच होते

Pages