परदेशातील शिक्षण

Submitted by सारेग on 13 April, 2015 - 03:25

बारावी नंतर परदेशात शिक्षणासाठी जर जायचे असेल तर काय तयारी करावी लागते? Pancard, व्हिसा सारखे documents, Admission process साठी काय करावं लागेल. मुलीला तिकडे B. Arch करायचे आहे. UG तिकडे करावे का? याची माहिती असेल तर मदत हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेशी शिक्षणासाठी माहिती व सेवा (सशुल्क) देण्यास बर्‍याच संस्था आहेत.
किमान वर्ष / सहा महिने आधी तयारी करावी लागते.
बी. आर्च. साठी मला सिंगापूर सुचवावेसे वाटते.
पण भारतातही नावाजलेल्या संस्था आहेत. त्याची आपण महिती घेत असालच.

बहुतेक ठिकाणी जी आर ई स्कोअर मागतात. म्हणून ती एक परिक्षा उत्तम मार्काने देऊन ठेवा.

सगळ्या कागदपत्रांची सॉफ्ट्कॉपी करुन ठेवा पीडीएफ च्या रुपात. हल्ली सगळे प्रोसेसिंग ऑनलाईनच होते.

१२॑ वी नंतर परदेशात पाठ्वायला काहीच हरकत नाही.

मी सिंगापुरमधे पीजी केले. छानच झाले माझे मास्टर्स.

तुमच्या मुलाला शुभेच्छा.

असे काही नाही पण इथे शिक्षण घेतले की नक्कीच पी.आर. मिळताना त्याचा फायदा होतो. २००८ पर्यंत पी. आर. साठी विद्यापिठ स्वतः पत्र देत विद्यार्थाना. पण आता ही पद्धत बंद झाली. आता पी. आर. मिळणे पुर्वी इतके सोपे नाही. पण ही स्थिती बदलेल. इथे नेहमीच नवीन प्रयोग करुन पहातात.

ऑस्ट्रेलिया च्या विसा प्रोसेस बद्दल त्यांच्या ईमिग्रेशन च्या वेब्साईट वर विस्तृत माहिती आहे.

शिवाय पुण्यात असाल तर मनोज पालवे यांचे कर्वे रस्त्यावर ऑफिस आहे. त्यांना भेटुन बघा.

ऑस्ट्रेलियाची विसा प्रोसेस तुम्ही स्वतःही करु शकता. वेबसाईटवर तंतोतंत माहिती आहे. कागदपत्र योग्य असेन तर काहीच प्रोब्लेम येणार नाही.

तसे युनिवर्सिटीज च्या वेबसाइट्स वर सर्व माहिती असते पण एजंट्स कडे वेळ वाचू शकतो. शिवाय IDP सारख्या संस्था आपल्याकडून पैसे घेत नाहीत (कदाचित युनिवर्सिटीज कडून घेत असतील!). फक्त त्यांच्या लिस्ट्पेक्षा आपली हव्या असलेल्या कॉलेजेसची लिस्ट तयार असावी.
परदेशी शिक्षण हा एक मोठा 'व्यवसाय' असल्याचे वाचलेय! त्यामुळे सर्वांगिण विचार करुनच निर्णय घेणे योग्य ठरेल!