" अरे मनपाखरा "

Submitted by विनायक. दि.पत्की. on 12 April, 2015 - 03:34

" अरे मनपाखरा "

ऊगाच कोणाच्या हसण्याने
मन पाखरा तु डोकू नको
तुला डोकाऊ दिले तर
ऊगाच तु सोकू नको

दाणा पाणी टिपता टिपता
नित्य वाढवावी घसट
नित्य भेटीच्या सरावाने
भीती हि करावी पुसट

फुगीर डोलाचे बुजगावणे
राखीत असते शेत
नियतीच्या निखळ
प्रेमानेच हाणुन पाडावा बेत

दाण्या दाण्या वर असतेच
खाणार्याचे नांव
नशीबानेच मिळत असतो
हुलग्या ला हि भाव

भाव मिळाला मनपाखरा तर
तु मातू नको
पंख जर झडले कधी
तर चालणे तु विसरू नको

देईल हरी पलंगा वरी
या भ्रमात तू राहू नको
दैव देते कर्म नेते
प्रचीती याची पाहू नको

मिळाले त्यात आनंद मानून
अंतर कधी देऊ नको
वाढवणे जमलेच नाही तर
असलेले कधीच तोडू नको

Group content visibility: 
Public - accessible to all site users