कावळ्या

Submitted by धनुर्धर on 9 April, 2015 - 09:16

येरे कावळ्या आता किती वाट पाहू
शिव पिडांस त्वरे खोळंबले बहु

काव तुझी एकण्यास टवकारले कान
काही केल्या आटपेना नेत्यांचे भाषण
काव तुझी गोड परी ते भाषण पकावू
शिव पिंडास त्वरे खोळंबले बहू

तुझ्या काकस्पर्शाने आत्मा होई मुक्त
रडूनीया व्याकूळ झालेत सारे आप्तु
इच्छा मागे राहिलेल्या पुर्ण करून घेऊ
शिव पिंडास त्वरे खोळंबले बहु

तुच आमचा मुक्तीदाता तारणहार तु
स्वर्गाच्या दारावरी द्वारपाल तु
पोटातही ओरड तुझी कशी आम्ही साहु
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

तुजसाठी घास सारा का करी संकोच
कर जीवा मोकळा मारूनीया चोच
संधी ही नामी तु नको वाया घालवू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहू

खुप केली आता आम्ही तुझी आर्जवे
दर्भाच्या कावळ्याचे शास्त्र आम्हास असे ठावे
दर्भ करूनी कावळा मुक्त आम्ही होवू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहू

Group content visibility: 
Public - accessible to all site users