दुणका डाग

Submitted by कविनारायण on 8 April, 2015 - 02:53

चांद तारे भ्रामक माळिलेस साजने,
मी गुंफिलेल्या मोगरयाचा सुवास कुठे गेला?

सुगंध रस अत्तरींचे दरवळीलेस वस्त्रांशि,
मी ओघाळलेला नशेबंध श्वास कुठे गेला?

सोनेरी चंदेरी रंगिल्या नजर पाकळ्या,
मी आखलेला काजळ काठ कुठे गेला ?

गुलाबी निळ्या अपणावल्यास अर्ध नग्न जाळ्या,
मी नटवलेला  पैठणी काठ कुठे गेला?

अश्वांचि चाहूल तुज पादुका साद देती,
मी बांधलेला पैंजण राग कुठे गेला?

चारित्र्यखणी हंसिनी काळीज शुभ्र भासवतेस जगी,
मी लावलेला दुणका डाग कुठे गेला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users