आरसा

Submitted by इस्रो on 6 April, 2015 - 07:19

जे जसे आहे तसे ते दाखवी हा आरसा
बोलला खोटे कधी ना आरसा हा आरसा

वाटतो हेवा तयाचा लाडके जेव्हा तुला
नखशिखांती पाहतो गं लावुनी टक आरसा

"लावती का माणसे ही चेहर्‍यावर चेहरा ?"
बोलला वैतागुनी मज एकदा तो आरसा

हाय उठले खायला हे आज माझे घर मला
सर्व भिंतीभर घराच्या लावला मग आरसा

(आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा)
एक होऊया असे की बिंब तू, मी आरसा

- इस्रो
[भ्रमणध्वनी ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users