Thank God..! Finally...

Submitted by मी मुक्ता.. on 1 April, 2015 - 04:18

कालच सर्फ ची एक जाहिरात बघण्यात आली. (जाहिरातीचे काही डिटेल्स चुकले असले तर सॉरी. नेट वर मिळत नाहीये मला ती अ‍ॅड..) दोन म्हातार्‍या बायका चहा घेत गप्पा मारत असतात, "आमच्यावेळी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा ६ रुपये पगार होता. आणि आज माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त कमवते. किसने सोचा था औरते इतना आगे चली जाएंगी? आजके जमानेमेंही औरत बनने का मजा है.." मागे सून लॅपटॉपवर काम करत असते. आणि इतक्यात तिचा नवरा खाली येतो आणि विचारतो "मेरी शर्ट धोयी नही क्या?" त्या बोलणार्‍या दोन्ही बायका चमकून बघतात आणि टॅग लाईन येते, "Is washing just a women's work/job?" आणि मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला, म्हटलं, "Thank God! Finally... Something sensible.. at last.."
एकीकडे काही मूर्ख ढोंगी अभिनेत्रींचे बिनडोक व्हीडीओ व्हायरल होत असताना, ३० सेकंदांमध्ये सांगितलेली ही वस्तुस्थिती खूप मार्मिक आहेच पण जाहीरातींसारखी सेक्सिस्ट इन्डस्ट्री जेंडर रोल ब्रेक करताना दिसतेय ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे.
मिडीया.. जाहिराती.. चित्रपट.. त्यातही मनोरंजन क्षेत्र आणि मार्केटींग क्षेत्र यांना बर्‍यापैकी मेडीऑकर रहावं लागतं, मध्यम आणि लोकप्रिय मार्ग स्विकारावे लागतात, किंवा या क्षेत्रातल्या बहुतेक स्ट्रॅटेजीज तरी तशा असतात. लोकांना पचेल रुचेल इतपतच फिलॉसॉफी ते मांडतात कारण कदाचित त्यांच्या पैशाचं गणित त्याच्यावर अवलंबून असतं. चित्रपटांमधल्या स्त्रियांच्या इमेजबद्दल जितकी चर्चा होताना दिसते तितकी जाहिरातीतल्या इमेजबद्दल होत नाही. झालीच तरी ती अंगप्रदर्शनाच्या पुढे जात नाही. पण अंगप्रदर्शनाच्याही पुढे रोजच्या जगण्यातल्या स्त्रीचं चित्रण या जाहिरातीत कसं होतं यावर खोलवर विचार कधी झालाय का? झालाच असेल तर तो जाहिर मांडला/चर्चिला गेलाय का?
जाहिरात या माध्यमाची ताकद तशी आता कोणाला नवीन नाही. कोणी कितीही नाकारायचं ठरवलं तरी त्यांचा प्रभाव आणि परीघ कोणी नाकारु शकत नाही. चित्रपट, मालिका, साहित्यं किंवा इतर कशाहीपेक्षा आपण जाहिरातींना जास्त एक्स्पोज होत असतो. त्यामुळे जाहिराती रोजच्या जगण्याबद्दल काय सांगतायेत हे खूप महत्वाचं ठरतं.
जन्मापासून मरेपर्यंत लागणार्‍या प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जात असताना त्यात स्त्री ज्याप्रकारे उभी केली जाते ते खरच चिडचिड करणारं आहे. बाळाची काळजी फक्त आईलाच असते का? बापाला नसते? कुछ मांएं डॉक्टर होती है म्हणून त्यांना कळतं बाळासाठी कोणतं डायपर वापरायचं, कोणता साबण वापरायचा, कोणता टीश्यु वापरायचा.. एकाही डायपरच्या अ‍ॅडमध्ये बाप का असू नये? पुरुष जेव्हा डॉक्टर असतो तेव्हा तो लॅब मध्ये संशोधन करत असतो किंवा कुठेतरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पेपर वाचत असतो पण बाई जेव्हा डॉक्टर असते तेव्हा ती मुलांच्या डायपरमध्ये, घराच्या निर्जंतुकीकरणात आणि हेल्थ ड्रिंकमध्येच गुंतलेली असते. एकही पुरुष असं म्हणताना दिसला नाहीये की "मै एक बाप भी हुं और डॉक्टर भी.." बाई जेव्हा इंजिनिअर असते तेव्हा तिला घरात कोणती गॅझेट्स वापरायची आणि ऑफिस आणि घर स्मार्टली कसं मॅनेज करायचं हे जास्त चांगलं कळतं. बाई बदाम खाते, स्वतःची काळजी घेते कारण तिला पुढे जाऊन मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि त्यांच्या बसमागे धावुन डब्बा द्यायचा असतो. असं का? हे असं का दाखवलं जातं? काळजी घेणार्‍याच्या आणि सेवा देणार्‍या भूमिकेत कायम बायकाच का असतात? मग ती आई म्हणून केलेली दुधाची काळजी असो, बायको म्हणून गेलेली तेलाची काळजी असो की मुलगी म्हणून केलेली लग्नाची काळजी असो.. बायकांची शैक्षणिक गुणवत्ता ही त्यांच्या करीयरपेक्षा त्यांच्या संसाराला पोषक आणि पूरक ठरणारी आहे असं चित्र का आहे?
जास्त शिकलेली बाई = जास्त चांगला संसार, जास्त गृहकृत्यदक्ष वगैरे...
भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिकता या गोष्टी जाहिरातीत येणं यात काही चुकीचं नाही? पण कुठवर बायका फक्त पर्फ्युमवर आणि गाड्यांवर जीव टाकत रहाणार. Why dont they choose someone with clean kitchen, organized bedroom and hygienic bathroom? कपडे, भांडी, घराची सफाई, टॉयलेट क्लीनर, मुलांच्या गोष्टी, जेवणातले पदार्थ या सगळ्या गोष्टी फक्त बायकांच्याच का? पुरुष फक्त दाढी करतात, पर्फ्युम लावतात, मस्तपैकी बियर किंवा स्कॉच पितात, गाड्यांतून फिरतात आणि त्यांच्या बायकांना डायमंडस गिफ्ट देतात. What the hell is that?
विमा.. पॉलिसी काढणारे पुरुषच दिसतात. बायकांच्या आयुष्याला तशी काही किंमत नाहीच का? एकतर आधीच भारतात विमा असलेले लोक कमी. त्यातही जे आहेत ते पुरुष. हे वास्तव जाहिरातींमधूनही बोलतं.
आणि कॉस्मेटीक्स च्या जाहिरातींविषयी तर न बोललेलच बरं. मूर्खांच्या लक्षणामध्ये यांचा उल्लेख व्हावा इतका मूर्खपणा या जाहिरातींमध्ये भरलेला असतो.
असो, मुद्दा हा आहे की काही जाहिराती तरी आता वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करतायेत.
एक जाहिरात पाहिलेली मागे. नवरा-बायको बोलतायेत आणि आज भांडी घासायचा नंबर कोणाचा यावर त्यांची मजा-मस्करी सुरु आहे. नीट आठवत नाही पण " बर्तन चमकायें.. और रिश्ते भी.." अशी टॅग लाईन होती बहुधा. स्कॉच ब्राईट ची नवी जाहिरात पाहिलेली मध्यंतरी. की भांडी घासणं इतकं सोपं आहे की तो मुलगा पैसे नसताना हॉटेलमध्ये जेवत राहतो आणि भांडी घासतो. कालच्या जाहिरातीच्या निमित्ताने मनातली अनेक दिवसांची मळमळ बाहेर पडली.. अशा जेंडर रोल ब्रेक करणार्‍या अनेक जाहिराती येत्या काळात निघोत आणि त्या जनमानसावर खूप आणि खोलवर परिणाम करोत ही अपेक्षा..
-----------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, वरची पोस्ट अग्दी परफेक्ट लिहिली आहेस. Happy आवडली!!!

बाकी मूळ लेखामधली काही निरीक्षणं पटली. काहींबद्दल नंतर सविस्तर कधीतरी.

छान विषय, लिहीलाही छान आहे.

हो ती दोन आज्यांची गोष्ट छान आहे. यात जाणवणारा दुसरा अर्थ असा की बायका कितीही शिकोत, कमावू लागोत, बिझी होवोत, त्यांच्या वरच्या अपेक्षा अहे तशा आहेत. >>> त्याच्यातला अर्थ तसाच आहे .
म्हणूनच त्या सासवा चमकून लेकाकडे बघतात . की याच्या अपेक्शा बायकोने आठवणीने आपले शर्ट धूवून ठेवावे . >>>>>
सासवा चमकल्या असतील तर नक्कीच चांगली पॉझीटीव्ह गोष्ट आहे कारण जनरली सासवाच अश्या अपेक्ष्या ठेवणार्या असतात.

मृण्मयी,
'मी घरी नसले की कसं सगळ्यांचं अडतं. चहा आणि टोस्ट करणंदेखिल नवर्‍याला जमतच नाही.' असली बावळट कौतुकं असतात. >> अगदी खरं.. ह्म्म..

बी,
टीव्ही चा तसा काही संबंधच येत नाही पण जाहिराती आवर्जून बघते मी.. Lol

ऋन्मेऽऽष,
जाहिरातींचं व्यवसाय गणित मी लेखातच मांडलं आहे. त्यांना समाजप्रबोधनाचा स्टँड घेणं तसं परवडणारं नाहीये. But again I will say, if at all there is a choice, I would rather prefer illusion of equality over illusion of superwoman..

लेख आवडलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार.. Happy

मुक्ता, मलाही आवडेल अशा जाहिराती बघायला. तुझे सोर्सेस काय असतात? काल मी गुगलून पाहितू, तूनळीवर शोधले पण तू वर उल्लेख केलेली जाहिरात मिळाली नाही.

चांगलं लिहिलंयस.
सासवा चमकून बघतात हेच मला जास्त आवडलं होतं त्या अ‍ॅड मधलं.

शी टच्ड द पिकल पण मस्त होती.
मासिक धर्मासंदर्भाने असलेले जुनाट, बुरसटलेले विचार मोडण्यासाठी गरजेची.

छान लेख आहे!! स्त्रियांचे चित्रण जाहिराती, चित्रपट, नाटके, गाणी ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये बदलायला हवे आहे!! कोठून तरी सुरुवात झाली हे चांगलेच आहे!!

>>> चिडचिड होऊन उपयोग नाही. यासाठी काही अंशी बायकाही कारणीभूत आहेत. काही बायकांना घरी सगळी मरमर स्वतःच करायची हौस असते. 'मी घरी नसले की कसं सगळ्यांचं अडतं. चहा आणि टोस्ट करणंदेखिल नवर्‍याला जमतच नाही.' असली बावळट कौतुकं असतात. 'माझ्यावाचून अडतं' हा विचार बहुतेक इगो सुखावून जातो. काही ठिकाणी कामांची जबाबदारी वाटून न घेता नवर्‍याकडून, मुलांकडून मदत केली गेली तरी त्याचं तुडुंब कौतुक असतं. >>> कित्येक वेळा आपल्या करीयरमुळे आपल्याला घरातील जबाबदार्‍यांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही अशी अपराधीपणाची भावना देखील ह्या मरमर करण्यास कारणीभूत असते. अपराधी वाटण्यासारखं आपण काही करत नाही हा विचार रुजला पाहिजे (ह्याचा अर्थ जबाबदार्‍या झटकाव्यात असा होत नाही पण जबाबदार्‍या वाटून घेण्यामध्ये गैर काहीच नाही ही भावना असायला हवी). आणि हा विचार रुजविण्यासाठी जाहिराती, चित्रपट, नाटके, गाणी ह्याचा आधार घेता यायला हवा.

लेख आवडला Happy

बाकी ती MTR ची जाहिरात खरच वैताग आहे.
http://www.ascionline.org/index.php/lodge-ur-complaints.html या The Advertising Standards Council Of India च्या लिंकवर तक्रार नोंदवता येते असं सापडलं आत्ताच. मी MTR ची तक्रार नोंदवलीय. ट्रॅक आयडी वै. दिला आहे त्यांनी, बघू काय रिप्लाय येतो ते.

बी,
सोर्स टीव्हीच.. कधीतरी समोर बसणं झालंच तर चॅनल बदलून बदलून अ‍ॅड्स बघते मी.. आणि क्रीकेट च्या मॅच दरम्यान शक्यतो नव्या अ‍ॅड्स असतात. Lol

नीधप,
सासवा चमकून बघतात हेच मला जास्त आवडलं होतं त्या अ‍ॅड मधलं.>> येप. मलाही.. Its kinda second climax.. Happy

सुमुक्ता,
अनुमोदन..

काउ,
१. its an expression..expressions are generally used as it is.
२. God is the ultimate power/driving force. Power doesnt have gender.
बाकी हा पूर्ण वेगळा विषय असल्याने या विषयावर माझ्याकडून हा एकमेव प्रतिसाद.

साक्षी,
Happy बघतेय लिंक

सर्वांचे आभार.. Happy

बाईनेच करियर वुमन, सुपरमॉम सगळं एकाच वेळी प्ले करायचा अट्टाहास का? >>> कोणाचा...स्वःताच न? मग त्यात काय गैर?

ह्ल्ली एक बघितलय्...ऐखादीला career हव मूल नको...तर general reactions are oh wow! she is breaking the mold...thinking out of the box....etc..etc..

मुलानसाठी career सोडल ....तर कीती महान! FB वर तर उदो उदो असतो...housewives कीती great आणि किती काम करतात...

पण एखादीला दोन्ही करावस वाटल...आणि दोन्हीमधे बाजी मारली तर त्यात काय गैर? असतो एखादीचा उरक...असते तिच्यात धमक...and if she wants to aim for the stars so be it!

मुद्दा हा आहे की जस आपण housewives किंवा करियर वुमन accept/respect करतो, तस आपण या dual role players ना का Scrutinize करतो?

आणि हल्ली करियर वुमन + सुपरमॉम बरोबर Fit/Hot bodyचा पण अट्टाहास असतो. Happy

छान लेख आहे.. खरं तर मला जाहीराती बघूनच ( इथल्या टीव्ही नेटवर्क वर अजिबात जाहीराती नसतात ) बरीच वर्षे झाली. पण हे सगळे पुर्वी बघत होतो तसेच अजून आहे. काहीच बदललेले नाही.

BS,
कोणाचा...स्वःताच न? मग त्यात काय गैर? >> हेच तर ना.. तो हट्ट स्वतःचाच असेल तर एक वेळ चालेल. तो चॉईस असेल तर खरंच एकवेळ चालेल पण चॉईस असतो का? हा प्रश्न आहे. Its the freedom to choose that matters. आणि दुर्दैवाने बायकांना चॉईस अजूनही मिळत नाही. उरक असो किंवा नसो त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. क्वचित काही अशाही असतात ज्यांच्यात ही अपेक्षा सोशल कंडिशनिंग मुळे इतकी भिनलेली आहे की तो आपलाच चॉईस आहे हे ही त्यांना वाटू शकतं.

हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला असेल तर इतर प्रश्नांची उत्तरं पण यात मिळतील.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दिनेश.
पण हे सगळे पुर्वी बघत होतो तसेच अजून आहे. काहीच बदललेले नाही.>> Sad ह्म्म्म

मिळत नाही. उरक असो किंवा नसो त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. क्वचित काही अशाही असतात ज्यांच्यात ही अपेक्षा सोशल कंडिशनिंग मुळे इतकी भिनलेली आहे की तो आपलाच चॉईस आहे हे ही त्यांना वाटू शकतं. >>> +१

छान.
नारी शक्ति जिंदाबाद...

असाच एखादा लेख चित्रपट, जाहीरातींमध्ये होणार्या देहप्रदर्शनावर आणि स्त्रीला भोगवस्तू समजणार्या मानसिकतेवरसुद्धा लिहावा.

ललिता-प्रीति,
नाही मिळालेला हो मेल. Sad
मागेही मी कोणालातरी संपर्कातून मेल केलेला पण त्यांचा प्रतिसाद आला नाही. आत्ता तुमचा संदेश बघून वाटतंय की कदाचित संबंधित व्यक्तीला माझा मेल मिळाला नसावा त्यावेळी.
तुम्ही कृपया विपू कराल का?
किंवा merakuchhsaman@gmail.com या आयडीवर मेल करा.

अशीच एक खाद्यतेलाची जाहिरात बरेच महिने झाले डोक्यात जातेय.

नवीन सून सगळ्यांच्या खाण्याच्या फर्माईशी पुऱ्या करण्यासाठी किचनमध्येच गुंतून पडली आहे, म्हणून सासूला वाईट वाटतंय. मग ती बदल घडवून आणायचा म्हणून, ' आज तुला काय बनायचंय?' असं सुनेला विचारते. मग मला वाटलं, ती बदल म्हणून कामवाली बाई किंवा एखादं नवीन यंत्र किंवा स्वतःच सुनेला मदत करणार असं होईल.
पण सासूबाई बराच वेळ अन्न ताजं आणि पौष्टिक ठेवणारं नवीन तेल आणतात. मग सूनबाई सकाळी नाश्त्याचे २-३ पदार्थ बनवण्यासोबतच अजून दुपारच्या जेवणाचेही ५-६ पदार्थ बनवून किचन बंद करतात आणि प्रसन्न चेहऱ्याने स्वतःच्या नवीन बिझनेसच्या रुममध्ये जातात.
" कारण आम्ही मानतो, तुमची जागा फक्त किचनमध्ये नाही."

आणखी एक खाद्य तेलाची जाहिरात. आई स्वयंपाकघरात भरपूर पदार्थ करण्यात गुंतलेली आणि तिची शाळकरी मुलगी हातात घुंगरू घेऊन आईकडे हट्ट करतेय की माझ्या बरोबर नाच.
मग ते विशिष्ट तेल वापरून आई भरमसाट चमचमीत पदार्थ शिजवून देखील टवटवीत रहाते आणि लगेच मुलीसोबत नाच करू लागते.
अतिशय डोक्यात जाते ही जाहिरात. काही नाही तर निदान मुलगी आईचा वेळ वाचावा म्हणून तिच्या कामात मदत करायला येते असे तरी दाखवावे.

मला आवडलेली जाहिरात (भांडे घासण्याच्या liquid soap ची )
"शादीके बाद खाना बनाने भी मदत कारुंगा आपकी "
"तो बर्तन धोने मे मै आपकी मदत करुंगी "

Pages