'नको नको रे पावसा' ह्या गाण्याची ऑडियो फाईल हवी आहे.

Submitted by अगो on 1 April, 2015 - 01:00

नकोनको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

गीत - इंदिरा संत
संगीत - यशवंत देव
स्वर - पुष्पा पागधरे

नेटवर खूप शोधले हे गाणे. कविता उपलब्ध आहे पण ऑडियो उपलब्ध नाही.

माझ्या आठवणीत हे गीत पद्मजा फेणाणी ह्यांच्या आवाजातही ऐकल्याचे आठवत आहे. चुभूद्याघ्या.

कुणाकडे ह्या गाण्याची ऑडियो फाईल आहे का ? असल्यास मला संपर्कातून पाठवता येईल का ? कुणाच्याही आवाजातले असले तरी चालेल.

संपर्कातून पाठवल्यास इथे किंवा माझ्या विपुत लिहा प्लीज. सध्या संपर्कातले मेल्स मिळतील ह्याची खात्री नसते किंवा स्पॅममध्ये जातात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवणीतली गाणीवर फक्त कविता आहे, गाणे नाही.

हे गाणे नेटवर ऐकण्यासाठी उपलब्ध नाही म्हणजे निदान मला सापडले नाही.