अकादमी 2 : नव्याची नवलाई

Submitted by सोन्याबापू on 30 March, 2015 - 10:09

पैलेस चा पहिला दिवस मला आजही आठवतो "इंडक्शन डे", आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहाला आम्हाला बी एन चौधरी उर्फ़"बड़े उस्तादजी" नावाचा कर्दनकाळ भेटला होता , तो सतत का कावलेला असतो हे आम्हा वयाने बारक्या अन सिविलियन पोरांस न उलगडलेले कोड़े होते बाकी पुढे एक समजले होते कोणाचे काही चुकले नसेल तर बड़े उस्तादजी देव माणुस. रनिंग करताना कोण मागे पड़तो त्याला मोटीवेट कसे करायचे ट्रूप कितीवेळ ड्रिल (परेड लेफ्ट राईट वाला) केली की लैक्स होतो मग त्याला कितीवेळ रेस्ट द्यायची ह्याचे ज्ञान त्याला अगाध होते. तर, पहिल्यादिवशी झाला तो ओळख सोहळा, ओळख माणसे ते फायरिंग रेंज अन हॉस्टेल ते अकैडेमिक ब्लॉक सगळ्यांची. माणसात सर्वात मोठे अकादमी अद्जुडेंट साहेब, आय.जी विरूपाक्ष शास्त्री उर्फ़ व्हीएस सर प्रॉपर कर्नाटक चे, नंतर डेप्युटी अद्जुडेंट डीआयजी विक्रम सिंह हे राजस्थानी राजपुत, डीआयजी मैथ्यू वर्घीस हे केरळ चे, सीएमओ डॉक्टर मेजर राजेंद्र कुलकर्णी, एमबीबीएस, बीजेएमसी, एमएस ऑर्थोपेडिक्स अन स्पेशलाइजेशन इन ट्रॉमा एएफएमसी पुणे (पुढे हा इसम ठार वेडा होता हे कळले अन आम्ही पोरे आजारी पडायची बंदच झालो). ह्या शिवाय श्रीवास्तवजी (मेस मैनेजर), प्रभजोत सिंह तोमर (स्पोर्ट्स इंचार्ज), बड़े उस्तादजी, अन त्याच्या बरोबर उस्ताद विष्णु गुरुंग, उस्ताद गुल मोहम्मद, उस्ताद जागीराम मीणा, उस्ताद राम शर्मा, अन उस्ताद अलोक सोलंकी हे अनुक्रमे अल्फ़ा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,इको ह्या कम्पनीज चे उस्ताद होते सगळे हुद्द्याने सुभेदार होते. अन बड़ा उस्ताद सुभेदार मेजर. ही सर्व मंडळी कैंपस वरच असलेल्या स्टाफ क्वार्टर मधे राहत असे, अन काहीही प्रॉब्लम असल्यास फ़क्त ह्यांच्याशीच बोलायचे असा आम्हाला स्ट्रिक्ट निर्देश होता, बाकी काही सिविलियन प्रोफेसर लोकं काही कायदेविषय शिकवायला येणार होते ते काही परमानेंट नसत. आम्हा 35 लोकांना ट्रेनिंग पुरते 5 कम्पनीज मधे वर सांगितल्याप्रमाणे विभागले होते. मी अन पुनीत डेल्टा कंपनी ला होतो मोसाय चार्ली ला अन सरदार गिल ब्रावो कंपनी ला होता. आज पहिला दिवस होता सो aclamatization साठी आम्हाला मोकळे सोडले होते पण त्या आधी प्रत्येक कंपनी ने आपल्या उस्तादजी सोबत चहा प्यायचा कार्यक्रम होता. मी अन पुनीत निमुट शर्मा उस्तादजी जवळ जाऊन उभे राहिलो इतर ही आले होते. बाकी 5 लोकांची नावे माहिती नव्हती.आम्ही उभे असतानाच त्या पाचांपैकी एक, हात पैंट च्या खिशात घालुन दीड पायावर उभा होता !! झाले, ते पाहुन शर्मा उस्ताद भड़कला !!! "नाम क्या है तेरा???"
"अमित गौड़ा, मैसुर, कर्नाटक सरssss" पोरगे थरथरत बोलले
"यहाँ क्या घर के खेती में खड़ा है क्या तू!!, अब सारे सातों लोग, जो परेड ग्राउंड के पीछे वाला लैंप पोस्ट है उसे छु कर आएंगे, शूटssss"
काय झाले हे कळायच्या आत आम्ही रिफ्लेक्स एक्शन ने कुत्र्यागत धावत सूटलो होतो!! परत आल्यावर उस्ताद ने फॉल इन करुन "आरामसे" असा आदेश दिला तेव्हा जीव भांड्यात अन शर्मा उस्ताद चे शब्द कानावर पडले होते "तुम आजसे सात जिसम एक जान हो तुम्हारी कंपनी ही तुम्हारा सबकुछ है इससे पहले डेल्टा कंपनी ने बोहोत सुरमा अफसर दिए है वह तरतीब टूटनी नहीं चाहिए, गलती कोई भी करे भुगतना पुरे कंपनी को पड़ेगा !! बात समझमें आई ओ.सीज ssss"

अन नकळत आमच्या तोंडुन सामयिक चीत्कार निघाला "यसsssssसरssssss"
तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव पडायला, पाती घडायला सुरुवात झाली होती!!!!.

पुर्ण कंपनी ला माइल्ड रगड़ा लागला होता,पण ह्याचमुळे काही चमत्कार ही झाले होते!चहा अप्रतिम लागत होता चवीला अन गौड़ा वर पोरे सॉरी ऑफिसर कैडेट्स (ओ.सीज) रागवली होती तरी त्याला सांत्वनापर साथ ही देत होती!!! जेलिंग अप सुरु झाले होते !!

चहा प्यायल्यावर अकादमी चा एक गाइडेड टूर झाला , महाल एकंदरित भारीच होता मुख्य महालात अद्जुडेँट ऑफिस अन इतर एडम शाखेच्या बैरक्स होत्या त्याशिवाय वेपन्स सिम्युलेटर अन ऑपरेशनल रेकोनिसंस फोटोग्राफी लॅब पण महालातच होती , महालाच्या उत्तरेकडून जी 4 मोठी मैदाने होती त्यात एक परेड ग्राउंड एक आउटडोर ऑब्स्टकल कोर्स , एक जंगल ट्रेल, अन पिटी झोन होता. त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला महालच्या मागल्या दारातून गेल्यास पाणीटाकी अन त्याच्या पुढे न्यू होस्टेल ब्लॉक होता, अन होस्टेल पासुन खाली जराशी खड्यात ऑफिसर्स मेस होती तिच्यामागे किचन अन किचन च्या मागे आवरभिंतीचा एक भाग होता.बाकी पूर्ण दाट जंगल होते!!इतके की ह्या जागेपासुन 8 किमी वर ग्वालियर सारखे शहर आहे ह्यावरच अविश्वास वाटावा!!

ह्या टूर हुन परत आलो ते आम्हाला हॉस्टेल रूम्स अलोट झाल्या होत्या! दोघांना मिळून एक रूम दिली होती पुनीत ला पार्टनर म्हणुन अमित गौड़ाच आला होता , मोसाय अन गिल पार्टनर्स होते माझ्या सोबत एक नाव होते "समीर सांगवान" हरयाणवी पोरगे!!! मी सुचनेबरहुकुम स्टोर्स च्या काउंटर ला गेलो तिथे मला रूम नंबर विचारुन एक रजिस्टर मधे सही करायला लावली अन मग एक बादली एक मग्गा एक सोपकेस 3 अंघोळीचे अन 3 कपड्याचे साबण , दोन बेडशीट्स दोन उश्या काही वह्या पेन अन एक ब्लैंकेट दिले वर "गुम किया तो स्टाइपेंड से काटूँगा" हा दम सुद्धा दिला गेला, मग रूम ची किल्ली दिली , अन मी माझे "घर" न्यू हॉस्टल ब्लॉक कड़े निघालो वाटेत पुनीत भेटला त्याने अन अमित ने सामान लावले होते जागी, तो मला म्हणाला
"बापुसाहब तेरे स्टेट का एक और बन्दा है पूछ रहा था तेरे लिए रूम नंबर 22"
"अबे उससे तो मिलते रहेंगे पहले ये बताओ रूम नंबर 13 कोनसी है!!??"

त्याला विचारेपर्यंत एक खणखणित आवाज आला

"ओये बाऊ जे से रूम नंबर 13!!!"
मी आधी त्याला आमच्याच कंपनी मधे पाहिले होते.
माझा रूम पार्टनर समीर सांगवान, रोहतक, हरयाणा, दिलखुलास माणुस सरळ येऊन गळ्यात पडला

"काक्के के हाल से रे?? आजसे तु अपणा भाई!!" विलक्षण गोरापान चेहरा घारे डोळे अन मिश्किल हसु , ह्या साहेबांनी मला "बापूसाहेब" अख्ख्या 11 महिन्यात दोनच वेळी म्हणले एकदा कोणीतरी फैकल्टी ने रूममेट चे नाव विचारले तेव्हा अन एकदा पास आउट परेड ला भावुक झाल्यावर एरवी आजतागायत माझे नामकरण झाले आहे ते "कक्के"

रूम उघडून आत आलो ते मस्त साफ़ रूम होती प्रत्येकाला एक टेबल,लैंप,अलमीरा,सेपरेट बेड वाटर कूलर इत्यादी जमानिमा होता ज़रा स्पेशल फील करत होतो , मी सैलावुन बसलो होतो समीर त्याच्या कॉट वर होता त्याची अन तेवढ्यात रूम मधे आलेल्या मोसाय अन गिल ची ओळख करुन दिली होती चौघे बोलत होतो तोवर बाहेर एक आवाज आला , अस्सल मराठी बाजाच्या हिंदीत कोणीतरी विचारत होता

"वह 13 नंबर का खोली किदर कु पड़ता है दादा???"

मी मराठीत ओरडलो "या या इकडे असे या खोलीत या"

साधारण 6 फुट ऊंची राकट गव्हाळ वर्ण असा एक पोरगा आत आला

"मी किशोर , किशोर उमरीकर, अहमदनगर चा"

त्याला आत बोलावले व् बसवले त्याची सर्व लोकांशी ओळख करुन दिली ,नव्या मैत्री जुळत होत्या दुसऱ्या दिवशी पासुन त्या घट्ट होणार होत्या!! काही कुरकुरी होऊन शेवटी भट्टी जमणार होती.

हसत खेळत गप्पा सुरु होत्या तोवर एक अशी गोष्ट झाली जिचा आम्ही अख्खे 11 महीने नंतर धसका घेतला होता!! ते म्हणजे कर्कश्य "फॉलइन विस्सल" चा आवाज!!! धडपडत धावत आम्ही सारे होस्टेल च्या पुढे फॉल इन झालो, तेव्हा बड़े उस्तादजी बोलले

"एक लाइन से सभी आदमी अकादमी बार्बर शॉप पे जाएंगे बाल कटवाएंगे और उसके बाद 1230 hrs तक फ्रेश होकर ऑफिसर्स मेस में मिलेंगे, याद रहे मेस में कोई चप्पल सैंडल पहनके पयजमा पहनके नहीं आएगा, वरना रगड़ा परेड होगी पुरे परेड ग्राउंड के 20 चक्कर पुरे गुनहगार कंपनी को, क्लियर?"

"यसssss सरssss"

बार्बरशॉप चा मालक दुनिराम हा अजब मशीनी नमूना होता !! एका पोराची कटिंग तो सरासरी 40 सेकंदात करत होता अर्थात तिथे स्टाइल्स नव्हत्याच!! खुर्चीत बसले की कापड लावायचे जीरो मशीन परजायची अन तीन पट्टयात डोक्यावर जावळ अन बाजुने टक्कल ! काम खत्म!! 20 मिनट्स मधे 34 ओसी "डोक्याने रिकामे" झालेले होते!!! सगळे फरक गळून पडले होते बार्बर शॉप च्या जमीनीवर राठ, काळे, भुरकट, पिंगट, लांब, कुरळे !! एकतेची भावना "ड्रेसिंग शिस्त" मधुन येते हा अविष्कार त्या दिवशी झाला होता!! सगळेच सारखे! 34 चमनगोटे वजा एकटा अंगद सिंह गिल !!!

रूम वर येऊन सामयिक बाथरूम कड़े पळालो आम्ही, अन्हिके आटपुन मेस ला हजर! मेस मस्त होती ! विशाल हॉल त्यात भिंतींवर आमच्याच फ़ोर्स च्या काही अधिकाऱ्यांच्या तसबीरी, फ्लॅग, आडवे करुन लावलेले भाले तलवारी इत्यादी, उत्तम शिसवी टेबल्स. "पहला खाना" साठी निर्दिष्ट जागेवर अद्जुडेंट पासुन सगळे स्थानापन्न झालेले अन एक घोषणा झाली,

"पुरे डिसिप्लिन के साथ बिना प्लेट चम्मच बजाये यहाँ खाना होगा, ये सिर्फ मेस नहीं है ये ट्रेडिशन है, सबको परोसने के बाद ही खाना शुरू होगा, कोई शक???"

"नोsssssसरsssss"

त्या शिस्तीपासुन जी एक "गरमा गरम" खायची सवय मोडली ती मोडलीच!!! आजही बायको च्या गरम शिव्या खातो पण अन्न गरम नाही!! सगळ्यांना वाढल्याशिवाय नाही! अन वचावचा तर मुळीच नाही!!.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. ही कथा म्हणजे अनुभव थोड्याफार फरकाने आमच्या शेजारच्या दादाकडुन ऐकलीय. Happy आताही दादाच सांगतोयसं वाटलं.

खूप मस्त. दोन्ही भाग आवडले. पुढचे भाग पण लवकर लिहा.
एकदम उत्कंठा वाढवणारे लिहीताय. >>>>> +१००००००

फार जबरीहे हे सगळे... मस्त लिहिताय भाऊ .....

मस्त

सैन्यदलाचे आणि तिथल्य शिस्तबद्ध जीवनाचे अनिवार आकर्षण असल्याने खूप आवडतंय

भराभर लिहीत रहा काही मदत लागल्यास इकडे मागा नक्क्की मिळेल Happy

मस्त बरका .. मजा येतेय वाचायला... पुढच लिहा पटापट...
नेमक्या शब्दात फापटपसारा न करता लिहिताय ते खूपच छान वाटतंय..
धन्यवाद या लेख मालिकेसाठी .. Happy

मस्तच !

20 मिनट्स मधे 34 ओसी "डोक्याने रिकामे" झालेले होते!!! सगळे फरक गळून पडले होते बार्बर शॉप च्या जमीनीवर राठ, काळे, भुरकट, पिंगट, लांब, कुरळे !! एकतेची भावना "ड्रेसिंग शिस्त" मधुन येते हा अविष्कार त्या दिवशी झाला होता!! >>> भारी !

Pages