परत येवु न शकल्यास काय करावे

Submitted by माणूस on 17 January, 2009 - 00:34

ओके मला मायबोली आणि reddit सोडुन बाकी काही फोरम माहीत नाही, त्यामुळे ईथे विचारतोय.

सध्या माझे चार पाच मित्र जे भारतात २-३ आठवड्याकरता गेले होते, ते तिथेच अडकुन पडले आहेत. stamping करताना कसल्यातरी 221G form मुळे हा delay होतोय.

तर ईथुन निघण्यापुर्वी, ३-४ महीन्यांचा delay होवु शकतो ह्याच हिशोबाने निघायचे असेल तर काय काय तयारी करावी.

उ.दा.

मला वाटतेय मी माझे महत्वाचे सामान निट box मधे pack करुन ठेवायला पाहीजे, जे delay झाल्यास कोणी मित्र storage मधे ठेवु शकेल.

ह्या CT मधे आल्यापासुन ईतका पसारा घेवुन ठेवलाय घरात की मला काही कळत नाहीय नेमके काय काय pack करुन ठेवायला पाहीजे.

गाडीचे काय करावे हा महत्वाचा प्रश्न (लोक म्हणत होते चांगली used honda/toyota घे पण नाही नाही) the good thing is, i have covered parking

आता W2 यायला सुरवात होईल, भारतात राहुन tax भरता येतो का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता W2 यायला सुरवात होईल, भारतात राहुन tax भरता येतो का? >> का नाहि ? online भरू शकतोस. Worst case, extension file करू शकतोस.

.

गाडीचे काय करावे हा महत्वाचा प्रश्न >> बी यम व्हि मध्ये गाडी POA सारखा फॉर्म मिळतो. त्यावर आपल्या मित्राची सही व वा नाव टाकायचे. मग गाडी विकायची गरज पडल्यास तो मित्र तो फॉर्म आणी टायटल दोन्ही देउन गाडी विकू शकतो. मुख्य म्हणजे गाडी ही मित्राचा नावावर होत नाही आपल्याच नावावर असते. Happy

धन्यावद. अजुन काही point कुणाच्या लक्षात येतायत का?

कंप्युटर आणि जुने हितगुज सोडले तर बाकीच्या क्षेत्रात माझे ज्ञान अगाध आहे.

Tax नेमही CPA कडे जावुन भरल्याने online भरायचे माहीत नाही.

आणि ह्या DMV च्या form ला काय म्हणतात ते कुणाला माहीत आहे का.

Tax नेमही CPA कडे जावुन भरल्याने online भरायचे माहीत नाही. >> जर Standard Deductions घेत असशिल तर कितीतरी चांगल्या साईट्स आहेत. Itemized सुद्धा करता येतो जर कुठली deductions घ्यायची हे जर माहित असेल तर. Wizards चांगली आहेत एकदम. मी कायम turbotax online वर भरतो. फेडरल फ्री (इ-फायलिंग) असतो आणी स्टेटसाठी पैसे पडतात (फायलिंग साठी). पण ती कॅल्क्युलेशन्स घेउन तुमच्या स्टेटच्या साईटवर भरता येतो (काही स्टेट्समध्ये फुकट) किंवा प्रिंट करुन पाठवता येतो.

अति आवश्यक गोष्टींची कागदपत्रे भारतात घेऊन जा.
गाडीत अर्धा टाकी तरी पेट्रोल ठेव.
भाड्याचे घर असेल तर उशीर झाल्यास तुझ्या जागी कोणि दुसरा रहाण्याची व्यवस्था कशी करता येईल ते पहा. वेळेवर भाडे, इतर बिले कोण देणार त्याची तजवीज करून ठेव.
किंवा भाडेकरार संपवण्याचा अर्ज वगैरे घेऊन जा. तिकडून फक्स करता येईल. त्या बाबतीत तुझे सामान कोण हलवणार त्या घरातून ते तुला पहावे लागेल. ते कूठे ठेवायचे तेही पहावे लागेल. भाड्याने स्टोरेजच्या जागा पाहून ठेव जवळपासच्या.
उशीर झालाच तर मग कारचा विमा फक्त कोलीजन आणि कॉम्प्रिहेन्सिव लागेल. नेटवरून इतर गोष्टींचे कवरेज कमीत कमी करून टाक भारतातून.

कर भरण्याबद्दल नात्याने सांगितलेच आहे.
बाकी आत्तातरी आठवत नाही.

भारतातही अमेरिकेतला Tax Return भरणारे बरेच चार्टर्ड अकाऊटंट्स आहेत (सहसा सगळ्या मोठ्या शहरात जिथे बर्‍याच अमेरिकन धंद्यांच्या भारतीय शाखा आहेत)