दुबईत मस्त हॉटेल कुठले

Submitted by अजय on 26 March, 2015 - 00:29

दुबईत राहण्यासाठी मस्त आणि अगदी वेगळे हॉटेल कुठले? स्वस्त नसले तरी चालेल. एरवी असा विचार करत नाही पण काही विशेष प्रसंगाकरीता मनाची तयारी आहे. ३-४ दिवस थांबायचे आहे.

चांगल्या हॉटेलात महागडी रूम किंवा Suit नको आहे. कारण त्याला काही लिमिट नाही. त्यापेक्षा हॉटेल असे शोधतो आहे जिथे अगदी सगळ्यात स्वस्त रूम घेतली तरी त्या हॉटेलात राहिलो, अशी कायमची आठवण राहील.

शाकाहारी जेवण देणार्‍या चांगल्या रेस्टॉरंटच्याही शोधात आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

4 points Sheraton. हे Bur Dubai area मध्ये आहे. तिथेच जवळ्पास जवळपास खुपसारी इंडियन रेस्टॉरंट आहेत.

कधी येताय ?

कुठे काम आहे ते सांगा म्हणजे हॉटेल सजेस्ट करता येईल,

दुबई करामा मध्ये वेगी रेस्तँरॉ आहेत, चांगला ऑपशन मिळेल.

धन्यवाद
@पिल्या, ४ सिझन पाहतो.

@विवेक नाईक
एप्रिल च्या ४ आठवड्यात येतोय (२२ ला) . काम काही नाही. दुसर्‍या मधुचंद्राहून मालदीववरून परत येताना तो थोडा लांबवून काही दिवस जिवाची दुबई करायचा विचार आहे. Happy पहिला होऊन आता बरोबर २५ वर्षे होतील त्यामुळे मधुचंद्राचे प्लॅनिंग करायची सवय सुटली. (सवय? हो एकेकाळी मी बंगळूरात रहात असल्यामुळे अनेक मित्रांचे मधुचंद्र प्लॅन करायला मदत केली आहे)

बुर्ज खलिफामधे राहण्याचा विचार चालू आहे. पण तिथल्या नवीन अर्मानी हाटेलाची सेवा खूप वाईट आहे असे वाचण्यात आले. बुर्ज अरब बजेट बाहेर आहे. जवळ पास शाकाहारी जेवण असणे आवश्यक आहे. रोज राहणार त्या हाटेलातले जेवण १-२ पेक्षा जास्त वेळा जाणार नाही असे वाटतेय

टॉप हॉटेल्स मध्ये,

१. हॉटेल अ‍ॅटलांटिस ( पाम जुमैरा मध्ये ) पिअर्स ब्रोस्नानच्या आफ्टर सनसेट ह्या चित्रपटातील

२. जुमैरा बिच हॉटेल

३. बुर्ज खलिफाच्या अगदी जवळ " हॉटेल अ‍ॅड्रेस डाउन टाउन दुबई"

अल करामा इथे सर्व हॉटेल्स आणि खाण्याच्या शाकाहारी जागा मिळतील.

खाण्यासाठी खलिफा बीन झायद स्टीट पुरान्मल ते छप्पन भोग सुद्धा आहे.
इतर सुद्धा आहेत बरीच.

दुबईत संजिव कपुर यांची " सिग्नेचर ऑफ संजिव कपुर " ह्या नावाने ५ रेस्टाँरंट आहेत. संजिव कपुर ह्यांनी त्यांच
सर्वात पहील हॉटेल देखिल दुबईलाच सुरु केल होत. आज त्यांची जगभरात ५० च्या वर हॉटेल्स आहेत.

त्या शिवाय "आशाताई भोसले" ह्यांच ही "आशाज" नावाच हॉटेल दुबईत आहे.

संजीव कपुरच्या "मेलिया" मधे मी राहिलो होतो. काही खास नाही ! जेवणही खास नव्हते.
एक छोटेसे जेवण्याचे हॉटेल आहे गोर्धन थाल म्हणून.. पहिले वाढलेलेच संपत नाही.. पण सगळे खावेसे मात्र वाटते.

सगळ्यांना धन्यवाद !

@रमाकांत कोंढा
आशा भोसले यांची इतकी रेस्टॉरंट आहेत (दुबईतच दोन आहेत, मध्यपूर्व आणि ब्रिटनमधेही आहेत) हे माहिती नव्हते. मेनू मांसाहारी जास्त तोंडाला पाणी आणणारा आहे पण काही व्हेज पदार्थही दिसत आहेत. नक्कीच भेट द्यायला हवी.

@वत्सला
धन्यवाद. भांडता भांडता कशी वर्षे निघून गेली ते कळालेच नाही. वयाबरोबर थोडे शहाणपणही येईल असे वाटले होते पण अजूनही त्याची वाट पाहतो आहोत.