उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे

Submitted by ash11 on 25 March, 2015 - 12:24

दर महिन्याला काही देणगी देण्यासाठी माहिती हवी आहे .
अर्पण foundation सारख्या काही आणखी संस्था आहेत का?
आणि आपण जर अर्पण foundation ला जरी देणगी दिली तर income tax rebate साठी काय करावे लागेल?काही reciept मिळतील का कि जेणेकरून tax मध्ये सवलत मिळेल?
उसगावात अश्या काही संस्था आहेत का कि ज्या भारतासाठी काही काम करतात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उसगावात अश्या काही संस्था आहेत का कि ज्या भारतासाठी काही काम
करतात?>>> www.maayboli.com/node/53020 ,ash11 ही लिंक पाहा
यात भारतात काम करण्याऱ्या संस्था आहे
यातल्या संस्थाना कर सवलत आहे
तुम्ही इथहीे देणगी द्यायचा विचार करू शकता

खालील संस्था उत्तम काम करतात. उसगावात टॅक्स सवलतही मिळेल. बर्‍याच कंपन्यांबरोबर यांची मॅचिंग डोनेशनची पण व्यवस्था आहे.

भारतभर मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे सेवा कार्य.
https://www.sewausa.org/

वनवासी भागात एक शिक्षकी शाळा. एका एकशिक्ष़की शाळेचा एका वर्षाचा खर्च फक्त ३६५ डॉलर्स. म्हणजे दिवसाला एक डॉलर देउन तुम्ही एका शाळेची कायमस्वरूपी जबाबदारी घेऊ शकता. भारतभेटीत त्या शाळेत जाउ शकता.
http://www.ekal.org/

अधिक माहिती मदत हवी असल्यास मला विपू/संपर्क करा.

http://www.indiancharity.org/

महाराष्ट्र फाऊंडेशन देणग्या स्विकारून भारतात बरेच कार्यक्रम राबवते. या देणग्या अमेरिकेत करमुक्त असतात..
त्याची नीट पावती मिळते..
वर्षातून एकदा $२० सभासदत्वासाठी लागतात..

अमेरीकेत करसवलत मिळण्यासाठी संस्था 501(c) (3) खाली नोंदणीकृत असायला हवी. फॉरीन करंसी देणगी स्विकारणार्‍या भारतील संस्थांना भारतात 80 G असले तरी त्याचा अमेरीकेत टॅक्स भरताना डिडक्शनसाठी उपयोग होत नाही.

http://www.saveindianfarmers.com/web/

महाराष्ट्रात बरेचसे शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांच्या कुटुंबियाना जगण्यासाठी मदत करणारी ही संस्था.

हे शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतात २८/३० टक्के व्याजाने. ते पेलले जात नाही, मग सावकार जमीन घेऊन टाकतो आणि हे त्याच्याकडे मजूर म्हणून राबतात. शेवटी निराशेने आत्महत्या करतात.
तेव्हा सरकार 'मजूराने आत्महत्या केली' (शेतकर्‍याने नाही ) असे नोंदवून मोकळं होतं.
कर्जमाफी जाहीर झाली तरी ती राष्ट्रीय बँकांची असते, सावकाराकडून नाही.
यांची कर्ज फेडली तर पुढच्या वर्षी पुन्हा ते सावकाराकडेच जातात. त्यामुळे प्रश्न सोडवणे खरोखरच कठिण आहे.
पण निदान त्यांच्या कुटुंबियाना जगण्यासाठी काहीतरी उदरनिर्वाहाची सोय करावी हा उद्देष..

देणगी देण्याची अजून एक सोय.. तुम्ही जर अमेझॉन . कॉम भरपूर वापरत असाल खरेदीसाठी, तर तुम्हाला देणगीसाठी एकादी करमुक्त संस्था नेमता येते. आणि तुम्ही खर्च केलेल्या रक्कमेतून १% त्या संस्थेला जातात (तुम्हाला अधिक द्यावे लागत नाहीत).. यात यादीमध्ये Save Indian Farmers चा समावेष आहे..
फक्त खरेदी करताना smile.amazon.com वरून जावे लागते... मी कालच माझी 'देणगी संस्था बदलून Save Indian Farmers केली , आणि मी अमेझॉन वर बरीच खरेदी करतो..

गगो, शेतकर्‍यांबद्दल वरचा दुवा चांगला वाटतोय. चांगले काम करताहेत, विहीर वगैरे बांधुन दिलीये. तुम्ही ओळखता का त्यांना? अमेझॉनवर बरेचदा खरेदी करतो, बदल करते.

मी परवा एका ठिकाणी ऊ ऊ वि साठी गेलो होतो.. तिथे त्यानी काही silde दाखवून माहिती दिली. अडचणी सांगितल्या... प्रयत्नातली कळकळ जाणवली, म्ह्णून मदत करावी म्हणतो.. मी गेली कित्येक वर्षे भारतातील संस्थाना काही ना काही मदत करतोय. म्हटलं आता हे करून बघावं.. आणि amazon वर खरेदी तर नित्याचीच असते. मग त्यातला १% परस्पर गेला तर काय हरकत आहे म्हणून तोही पर्याय निवडला.

आपल्यात amazon वर बरेच लोक खरेदी करत असतील.. त्यानी कुठल्या ना कुठल्या कार्याला अशी मदत केली तर खिश्याला एका पैचीही चाट न लागता कितीतरी संस्थाना आर्थिक मदत मिळेल..... म्ह्णून सांगावे वाटले..

गोगा उत्तम मुद्दा.

गेली दहाएक वर्षे मी जे क्रेडिट कार्ड वापरते त्याचे असेच काही टक्के World wide federation ला निसर्ग संवर्धनासाठी जातात.

गोष्टीगावचे - खूप धन्यवाद या माहितीसाठी. अ‍ॅमेझॉनवर बरीच खरेदी होते. अगदी रेग्युलरली. तेव्हा हे सहजशक्य आहे.