होणार ठार वेडे आम्ही हे बघूनी

Submitted by आयटीगर्ल on 24 March, 2015 - 16:41

होणार सून मी या घरची या मालिकेतला झालेला पुनर्मिलन भाग बघितला. मी ही मालिका बघत नाही पण एका मैत्रीणीने हा भाग बघून हमखास (विनोदी ) मनोरंजन होईल म्हणून सुचवले.

तर गाणं सुरु झालं, हिरोईन दुधाचा ग्लास हातात घेऊन लाजत जीने चढु लागली. गाणं ऐकायला चांगलं वाटलं अणि अपेक्षा उंचावल्या.
सुरवात हळुवार झाली तरी रोमांस नंतर पकड घेइल अस वाटत होतं. पण हाय रे कर्मा, त्या लंबुटांग्या हिरोईन समोर आल्यावर हिरो अगदी ईटुकला वाटला. तो समोर आल्यावर ति त्याला पटकन उचलून कडेवर घेतीये की काय अस क्षणभर वाटलं.
मग तो हिरो दुधाचा ग्लास हिरोईन च्या हातातून घेऊन मागे मागे चालतो( हिरोईन तर त्याच्या पुढे होती मग हा मागे का चालला अस वाटेपर्यंत त्याने दुधाचा ग्लास टेबल वर ठेवला.)
हिरो मग हिरोईनच्या हातातल्या बांगड्या, घड्याळ काढून (शब्दशः) फेकतो.
हे रोमँटिक जेश्चर असावे दिग्दर्शकाच्या मते पण ते बघताना फनी वाटले.
हे सगळं करताना, हिरोच्या चेहर्‍यावर देवळात गेल्यावर घंटा वाजवताना जसे सात्विक सोज्वळ भाव असतात तसेच असतात. त्यात अजिबात रोमांस, मिस्चीफ अशा प्रसंगोचित भावनांना थारा नसतो..
(अरे बाबा रोमांस करतोस कि भजन? असं त्याला विचारायचा मोह होतो.)
बरं त्या हिरोईनचा ड्रेस पण अगदीच खास या प्रसंगासाठी (भजन, तुम्हाला काय वाटलं?) शोधून काढलेला असतो. अरारा, साफसफाईसाठी घर आवरायला काढल्यावर किंवा रंगपंचमीला, धुलवडीला रंग खेळताना सुध्दा मुली याहून चांगले ड्रेस घालतात..
तर हिरोईन पण आपल्याला हिरोने आता काहितरी करावं म्हणून डोळे मिटून घेते. आता तरी काहितरी चांगला रोमांस बघायला मिळेल म्हणून आपण प्रेक्षक डोळे मोठे करतो.
पण कस्सच काय.. मंद हिरो आणि मंदा हिरोईन ते मसाला दुध पिऊन तेवढ्याच तुपकट चेहर्‍याने ईंटेस रोमान्स, प्रेम, केमिस्ट्री वगैरे समयोचित अपे़क्षांना सुरुंग लावतात आणि झोप, विरक्ती वगैरे गहन विषयांवर अचानक बोलायला लागतात.
ते झोपेवरचे डायलॉग्स तर कहर अंगाईगीत आहेत.. ते ऐकुन १००% झोप येण्याची ग्यॅरेंटी, निद्रानाश झालेल्या व्यक्तीला सुध्दा झोप लागेल.
मंद तुपकट भाव घेऊन वावरणारा हिरो, वेडसर हसणारी हिरोईन आणि महा बोअरिंग डायलॉग्ज..
ते रटाळ संवाद हिरोईन तितक्याच भावहीन सुरात म्हणते, त्यात कोण्त्याच भावनेचा, अभिनयाचा, केमिस्ट्रीचा थांगपत्ता नसतो. अत्यंत बालीश अभिनयाची झलक बघायला मिळते.
मला त्यावेळी रंगिला सिनेमातल्या अमीर खान चा डायलॉग ओरडून म्हणावासा वाटला "अरे ईस्से अच्छा तो हमारे गली के गणपती का कार्यक्रम होता हे"
झोप अणि विरक्ती वगैरे विषय अशा वेळी काढून जर ईतके पुस्तकी, भावहीन , नाटकी संवाद कोणी म्हटले तर रोमान्स सोडून संन्यास घ्यावा वाटेल
नो वंडर, जेव्हा हिरोईन वरचे संवाद म्हणते तेव्हा हिरोला आधी बरेच दिवसात न आलेली झोप तात्काळ येते आणि तो गाढ झोपतो.
असला तुपकट, अळणी, भजन रोमान्स ( ?) टिव्हीवर बघत असलेल्या तमाम प्रेक्षकांना सुध्दा त्यावेळी गाढ झोप लागली असेल.
त्या कमाल नाटकी, मेंगळट हिरोईन ने प्रत्येक सीन च्या आधी एनर्जी ड्रिंक पिण्याची फार फार गरज आहे.
आणि त्या हिरोला देवळातले सात्विक तुपकट भाव रोमान्स च्या वेळी नको, समोर बायको आहे, देवी नाही हि आठवण करुन द्यायला हवी झोपलेल्या डिरेक्टरने. (आधी झोपलेल्या डिरेक्टरला उठवायला हवे पाणी मारुन).
अर्थात भजन हिरो तरी काय करणार बिचारा, त्याला साथ समोर असलेल्या वेडसर हास्याच्या मंदाची, त्याला "तसे" भाव आणता येणं पण अवघडच असणार म्हणा..
बरं त्या दुध पिण्याचा सीक्वेन्स पण गंडलेलाच वाटला. म्हणजे पुढे फुली गोळा खेळायला शक्ती मिळावी म्हणून दुध आधी घेत असावेत असा हिंदि सिनेमे बघून माझा तर्क. पण तो हिरो, हिरोईन च्या बांगड्या, घड्याळ, ओढणी काढूनच दमला बहुधा. मग दुधाचा ब्रेक झाला. मग तो गाढ झोपी गेला..
अरे पण मग पलंगाला ति प्लॅस्टीकच्या फुलांची सजावट ज्या कारणासाठी केली होती, ते काम मुदलात झाले कि नाही देव जाणे?
या सगळ्या संवादात मराठीची पण वाट लावली.
हिरो हिरोईनला विचारतो "मी तुझ्या मांडीत डोके ठेउ?"
अरे बाळा, तुला मांडीवर डोके ठेऊ असं विचारायचं आहे का?
हे राम, प्लीज या भावना झी मराठी आणि या सिरियल च्या टीम पर्यंत कोणी पोचवेल का?
मंडळ आभारी राहिल!!

जर उत्सुकता असेल तर हि या भागाची लिंक, तुम्हाला हे बघण्याची शक्ती मिळो Happy

https://www.youtube.com/watch?v=-IQTah7-HTo

~~ITG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलयं!!
वरची लिंक पाहिली....अगं आईगं काय तए दोघं (कपाळावर हात मारलेली बाहुली)!!
एपिसोडच्या शेवटी ती बया म्हणते," प्रेमानं मागितलं तर देव सगळं देतो".
हा एपिसोड बघता जानी जी आता प्रेग्नंट आहे ते देवाच्या दयेनेच वाटतं Wink Wink Wink कारण बाकी एकूणच सगळा आनंदच आहे

लिहिलय छान... प्रतिसाद वाचुन मला राहवल नाही .. म्हनुन लिन्क पाहिलि.. अरेरे ... काय करतात हे दोघे ... एवढेच करायचे होते तर मग ते .. फुल वैगेरे नसते तरी चालले असते .. उगाच अपेक्षा वाढवल्या आमच्या.... Happy आणि काहिच झाले नाहि...

मराठी प्रेक्षक लय भारी हुशार असतात. ते त वरून ताक-भात ओळखतात त्यामुळे प्रतीकात्मक दाखवतात. टिकली पडली. बायकोचं कानातलं नवऱ्याच्या शर्टात अडकलं.

ते डिटेल्स हिंदीमध्ये द्यायला लागतात Wink

मराठी प्रेक्षक लय भारी हुशार असतात. ते त वरून ताक-भात ओळखतात त्यामुळे प्रतीकात्मक दाखवतात. टिकली पडली. बायकोचं कानातलं नवऱ्याच्या शर्टात अडकलं. >>>>>

अगदी अगदी Happy दोघांच्या कपड्यांची इस्त्री पण मोडली नाहीये..पण टिकली पडली त्यावरून समजायचं Happy

आदिती, स्वप्ना_तुषार, निल्या कुलकर्णी तुम्ही हे वाचून अभिप्राय दिलात याबद्दल धन्यवाद Happy

अन्जू, चीकू , अहो मग दोन गुलाबाची फुलं जवळ येताना दाखवायची की सरळ. तेवढे समजून घेतले असते कि कोणत्याही भाषिक प्रेक्षकांनी, नाही का? Happy
हा असला येडच्याप पणा कशाला Wink

काही फार भडकपणा , बोल्ड सीन्स न दाखवताही अ‍ॅस्थेटिकली प्रसंग दाखवाता येणं ईतक अवघड असावं?
शिवाय प्रसंगानुरुप संवाद लिहिणं बॅन असावं का? Happy

भारी लिहिलय Lol काही पंचेस तुफान आहेत.
अरे बाबा रोमांस करतोस कि भजन? >>> Lol
हिरो हिरोईनला विचारतो "मी तुझ्या मांडीत डोके ठेउ?" >>> Rofl

घना, धन्यवाद Happy
हो, त्या जुळून येती मधे त्या सीन ला विनोदी नव्हतं केलं, बरचं बरा होता तो सीन या वर लिहिलेल्या भागापेक्षा Happy

आगाऊ,
मराठीच्या दृष्टीने कपाळपण बोल्ड होईल.
-----------------------------------------------
मग तुम्ही जुळून येती मधे तो सीन बघितला नाही का? Wink
खाली दिलेल्या भागाची सुरवातीची १० मि. बघा, मराठी मालिकेत कप्पाळ पण आलं आणि मान पण Proud

https://www.youtube.com/watch?v=6HOf8oOn0pM

प्रत्यक्षात नाही पण या मालिकेत तरी समेट झाला एकदाचा श्री आणि जान्हवी मधे अशी ऐकीव बातमी आहे Happy

Pages