संध्याकाळचा नाश्ता

Submitted by सारेग on 23 March, 2015 - 04:54

हा प्रश्न बदलत आहे. संध्याकाळी नोकरी वरून घरी आल्यावर पटकन होतील अश्या नाश्त्याच्या रेसिपीज इथे एकत्रित असाव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चणे/फुटाणे
खाकरा भेळ
भडंग भेळ (कांदा,टोमॅटो , लिंबु किवा चिंच चटणी घालुन)
ब्राउन ब्रेड सँडवीच ( काकडी, कांदा टोमॅटो, पुदीना चटणी आधी करुन ठेवा फ्रिज मद्धे, नुसते चटणी+चीज स्लाईस घालुन पण मस्त लागते सँड्विच..यात बरेच व्हेरीएशन करता येतील)
इंन्स्टंट उपमा ( भरपुर कढिपत्ता आणि उडीद डाळ , मिरची घालुन फोडणी करायची त्यात रवा खमंग भाजुन घ्यायचा आणि मीठ साखर लिंबु पिळुन फ्रिज मद्धे ठेवा ..आयत्या वेळी उकळलेल्या पाण्यात घालुन उपमा तयार)
पास्ता उकडुन आणि सॉस फ्रिज्मद्धे करुन ठेवा...आयत्या वेळी पटकन तयार
थालीपीठ ( सकाळीच पीठ तयार करुन फ्रिज करा....घरी आलात की फक्त तव्यावर थापुन भाजुन घ्या )
लाडु - चिवडा ( सुट्टीदिवशी बनवुन ठेवा )
नाचणी खीर
तांदुळ उकड
दही -दुध पोहे कालवुन ( मिरची ची फोडणी द्या )

कांदा टोमॅटो बारिक चिरून त्यात तिखट मिठ घालून ते खाकर्‍यावर पसरून खायचं. पोटभर होतं शिवाय फार कॅलरीज पोटात जात नाहीत.

कच्चे पोहे ताकात भिजवून त्यात मीठ साखर घालून खायचं सोबत लोणचं. गॅस पेटवावाच लागणार नाही.

पातळ पोह्याचा चिवडा किंवा भडंग घरी करून ठेवणे,त्यात ही टोमॅटो वगैरे घालून खाउ शकतो.

उडदाचा पापड भाजून. वर शेव, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर वगैरे ऐच्छिक.
मोड आलेली कडधान्ये वाफवून, वरून तिखट मीठ चाट मसाला कांदा टोमॅटो.
कॉर्न फ्लेक्स, व्हीट फ्लेक्स. दुधात घालून. किंवा दूध पोहे / ताक पोहे / दही पोहे / कोळाचे पोहे / तेल तिखट मीठ पोहे
धिरडी, घावने, डोसे, उत्ताप्पे
सँडविचेस, ओपन टोस्ट, ब्रेड बेसन टोस्ट, फ्रेंच टोस्ट
उपमा, तांदळाची उकड, नाचणीची ताकातली आंबील, राजगिरा लाही / ज्वारी लाहीचे पीठ ताक - मीठ - हिरवी मिरची - कोथिंबीर घालून / साळीच्या लाह्या किंचित तुपात भाजून वरून मीठ / साळीच्या किंवा ज्वारी लाहीचा चिवडा.
उकडलेल्या शेंगा, शेंगदाणे
चणे फुटाणे चिक्की सुकामेवा
काकडी - गाजर - मुळा - टोमॅटोच्या चकत्या मिरपूड मीठ भुरभुरून
कट फ्रूट्स, लस्सी, मिल्कशेक

आसट भात - तूप - मीठ - मेतकूट. सोबत लिंबाचे लोणचे.
पोळीचा लाडू. गूळ तूप पोळी / साखरांबा पोळी / फ्रँकी

१.दडपे पोहे
२.शेंगदाणे व गुळाचा लाडू
३.काजू, मनुका, बेदाणे, बदाम, अक्रोड, अंजीर एकत्र मिक्सरमधे बारीक करून तुपाचा हात लावून वळलेला
लाडू
४. अंड्याचे ऑमलेट
५. टोमॅटो ऑमलेट

खालील रेसिपी बघा. पीठ दळून तयार ठेवले की ५-१० मिनिटात होणारा पदार्थ आहे.
http://www.maayboli.com/node/49056

उरलेलि पोळी तेलात तलुन त्यवर कान्दा टोमटो पत्ता चाट तीखट

फ्राइड राइस एग
फ्राइड नूड्ल
फोड्णी राइस

बटाटा पतीस

मका पोहे
शेन्गडाणे
मगी
चिन्ग नूड्ल

मी डापे स्पेशल पदार्थ करते.
१.थालिपिठ,
२.शेंगदाणे भाजून किंचित तेलात तिखट, मीठ घालून ते चोळून केलेले चटपटीत शेंगदाणे,
३.मुरमुरे, फरसाण कांदा कोथिंबिर, कधी लिंबू पिळून भेळ
४. मुरमुरे, पापड / शेव
५. पोळीचे विविध हलके रोल (सॉस, चटणी अथवा तेल व जवस चटणी असे घालून)
६. मारी बिस्किटे / मोनॅको बिस्किटे
असे आलटून पालटून करते

चपाती पिझ्झा
मी आजच केलं,छान लागले
चपाती(ताजी किंवा उरलेली),,
कोबी,सिमला,कांदा, टोमॅटो बारीक चिरून एकत्र करून घ्यावे व त्यावर मेयोनीज,शेजवान चटणी टाकून सगळे एकत्र मिक्स करावे,
तवा गरम करून घ्यावा व त्यावर बटर लावून घावे आणि चपाती ठेवावी,
चपातीवर बटर आणि टोमॅटो सॉस संपूर्ण पसरून घ्यावा व मिक्स करून ठेवलेल्या भाज्या पसरून घेऊन वरून चीझ टाकावे,
झाकण ठेवून 5 ते 7 मिन ठेवावे
मस्त लागते

पण खाकरा म्हणजे तापवुन, शेकून कडक केलेली पोळीच ना? मग पोळीत जितक्या कॅलरीज (उष्मांक) असतील तेवढ्या खाकर्‍यात असणारच की, कमी कसे असतील?

1. Dadape pohe
2. Tel tikhat pohe- kacche patal/jaad pohe tyat thoda kaccha goada tel ani tikhat mith chavipramane, khup chan lagta
3. Kurmure ani farsan nusta mix karun var limbu
4. Seasonal fruits chya smoothies
5. Nachaniche/ Tandalache/mugache ghavan
6. Steamed vadya- me moogachya pithat gharat aslelya bhajya barik chirun ghalte, thoda ova, titkhat/ hirvi mirchi, ala-lasun paste, kothimbir asa ghalun thalipeetha pramane peeth bhijvun, dhoklya pramane ukdun ghene, sauce kiva hirvya chutney sobat masta lagtat, Soda kiva kahihi itar add karave lagat nahi. Diet cha prashna nasel tr thodyashya telavar til ani jeere mohri kadhipatta ashi fodni karuin tyavar hya vadya partun hi chan lagtat
7. soups/ dry fruits
8. Boiled eggs chya chaktya karun tyavar kanda tomato/ boiled egg salad hi chan lagta

तेलात मोहरी,जिरे,कढीपत्ता,शेंगदाणे घालून फोडणी करायची. त्यात मुरमुरे घालून मध्यम आचेवर परतत रहायचे.गरम झाले की लगेच वरून मीठ,मिरची पावडर घालून हलवत रहायचे. चांगले भाजले की लगेच एका मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्यायचे.थोडे गरम असतानाच जरा पिठीसाखर घालून हाताने मिक्स करायची. ही भडंग करायला दहापंधरा मिनिटे लागतात आणि हवाबंद डब्यात पंधरा दिवसही चांगली राहते.

@Cuty,
भडंग/चिवड्याची फोडणी थंड करुन मिक्स करतात ना?

मी तर नेहमी वर लिहिल्याप्रमाणे करते. अशीही छान होते.

मी लेकासाठी cheat pizza बनवते.
1. मोबाईल खाकरा + pizza sauce +cheeze slice चे तुकडे.
मावेत 10 से. गरम करायचा.
२. शेवपुरीच्या कडक चपट्या पूर्या + pizza sauce +कांदा टोमॅटो बारीक चिरून + चीज किसून किंवा cheeze slice चा छोटासा तुकडा . मावेत 5-10 से.