नटावे लागते आहे, सजावे लागते आहे

Submitted by मृण_मयी on 20 March, 2015 - 03:01

नटावे लागते आहे, सजावे लागते आहे
कराराच्याप्रमाणे देह व्हावे लागते आहे

कधी विधवा, कधी पत्नी बनावे लागते आहे
सती जावे, सतीचे वाण घ्यावे लागते आहे

कधी होत्या जिथे ज्वाळा तिथे धग राहिली थोडी
उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे

कळेना कावळ्यांवर, मृण्मयी, ही वेळ का आली
स्त्रियांना आणि पिंडांना शिवावे लागते आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे<<< मस्त ओळ!

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे<<< शेर आवडला.

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे<< हासिले गझल

मतलाही आवडला

वृत्त जमत नव्हते तेव्हा छापलेल्या माझ्या 'आलास तू उशीरा; ह्या पुस्तकातील 'आलास तू उशीरा' ह्या मृत्यूला उद्देशून असलेल्या कवितेतील हे कडवे आठवले.

किती वेगळीच असते ...... दुनिया जिवंतांची
होतो किती मी परका...... आलास तू उशीरा

Happy

कधी होत्या जिथे ज्वाळा तिथे धग राहिली थोडी
उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे

वा वा मस्त शेर !

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा
जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे
लागते आह>>>> वा ! मस्त शेर

आवडली..

कळेना कावळ्यांवर, मृण्मयी, ही वेळ का आली
स्त्रियांना आणि पिंडांना शिवावे लागते आहे ........ अप्रतिम