टोल

Submitted by बेफ़िकीर on 18 March, 2015 - 10:56

काहीतरी घडलं आणि आमचा धागा नाही आला असे कसे होईल?

आज समजले की एक एप्रिलपासून महाराष्ट्रात खासगी वाहनांना टोल भरावा लागणार नाही.

अतिशय आनंद झाला. त्यानंतर प्रश्न पडले.

१. आजवर घेतलेला टोल पुरेसा आहे असा साक्षात्कार झाला असला तर तो कसा काय झाला?
२. आजवर घेतलेल्या टोलमधून अधिकच महसूल मिळाला असेल तर त्याचे काय?
३. रस्त्यांना उतारवय लागल्यानंतर अचानक खूप तारुण्यपीटिका आलेल्या आहेत त्या घालवणार का?
४. टोलनाक्यावर काकड्या, खारेदाणे, डुप्लिकेट ओरिजिनल पॅकेज्ड वॉटर विकणार्‍यांचे पुनर्वसन कसे होणार?
५. टोलनाक्यावर काम करणारे आता बेकार होतील त्यांचे काय?
६. प्रवासात करवंदे, पेरू व स्ट्रॉबेरीज कश्या मिळणार?
७. महाराष्ट्राबाहेरील पासिंगच्या खासगी वाहनांना टोल का लावू नये?

खरे तर मन सैरभैर झाले आहे हे ऐकून! अत्यानंद झाल्यामुळे अचानक अशी मनोवस्था झाली आहे की 'अरे अरे, किती बिचारे आपण, आपल्याला आता टोलसुद्धा देता येणार नाही!

टोल हा कायमच एक वादग्रस्त विषय बनून राहिलेला आहे. सामान्य प्रवासी टोल द्यायला तयार होऊन फक्त इतकीच अपेक्षा करतात की डायव्हर्जन्स, खड्डे, क्रॉसिंग्ज हे तरी मिनिमम करा किंवा रद्द करा. रस्ते सुस्थितीत आणा! एक ट्रेलर उलटले तर सहा सहा तास वाहतूक खोळंबणे हे प्रकार कसेतरी बंद करा.

'क्वॉलिटी डिलीव्हरी'बाबत वाच्यता झालेली आढळली नाही, फक्त टॅक्सिंग रिलॅक्स केलेले दिसत आहे.

तरीही हा निर्णय सुखद आहे.

पण कुठेतरी असे फीलिंग येत आहे की आता आपण टोल देणार नाही ह्याचा अर्थ रस्त्याबाबत बोलण्याचा एक नैतिक अधिकार आता राहणार नाही, हे फक्त मानसिक म्हणून फेटाळताही येईलच.

शेवटी असे काय झाले की हा निर्णय आत्ता घेण्यात आला?

खरंच नीट काही न समजल्यामुळे व समजून घेण्यासाठी हा धागा!

======================================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज समजले की एक एप्रिलपासून महाराष्ट्रात खासगी वाहनांना टोल भरावा लागणार नाही. > बेफिकिर साहेब ही बातमी कोणत्या वृत्तपत्रात आली आहे कळु शकेल का? या बाबतीत व्हॉट्सअप मेसेज फिरत आहे फक्त. पण माहीती कुठेच सापडली नाही. आपल्याकडे वर्तमानपत्राची लिंक असेल तर मिळु शकेल?

आ. ना.
धन्यवाद

अरेच्च्या? घोळच झाला का सगळा? माफी असावी. अतिशय ऑथेंटिक वाटणार्‍यांनी सांगितले. काही कारणाने तपासण्याचा वेळ मिळाला नाही.

असे काही नसलेच तर दिलगीरी प्रदर्शीत करतो. Happy

टोलसंबंधी मेसेज व्हॉट्सॅपवर फिरत आहे.. पण नंतर दुसरा मेसेज असाही आला की पहिला मेसेज ही अफवा होती. टोलसंबंधी काही घोषणा झालेली नाही. त्यामुळे बाकी मुद्द्यांवर चर्चा करण्याआधी बातमी खरी आहे का हे आधी तपासून पहायला हवं.

आत्ता अजून एक मेसेज आला की खुद्द मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की टोलसंबंधीची कुठलीही घोषणा झालेली नाही म्हणून.. (अर्थात ह्या बातमीचीही लिंक मिळाली नाही.. )

आर्थिक सर्वे मधे याबाबत चर्चा गडकरींशी झाली होती असे इकॉनॉमिक टाईम्स म्हणत आहे. परंतु खाजगी वाहन वगैरे यांना सुट दिल्यानंतर होणारे नुकसान भरुन काढण्याकरीता मालवाहतुक वर % वाढवावे लागणार होते ते अव्वाच्यासव्वा कॅल्क्युलेट झाले. त्यामुळे त्याचे पुढे काही झाले नाही. अशी बातमी होती.

१ एप्रिल हा दिवस जागतिक नमोदिन म्हणुन साजरा करण्यात यावा. >>> हा चेष्टेचा विषय नाही. राज्य सरकारने अत्यंत गंभीरपणे घेऊन त्या दिवसापासून टोलमाफीची घोषणा केलेली आहे. केंद्र सरकार तर्फेही १५ लाख खात्यात ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत.

काल व्हॉट्साप वर हा मेसेज वाचुन मनातल्या मनात खदाखदा हसलो.
एवढं सोप्प असत तर कोल्हापुरचा थातुर मातुर टोल नाका विषय पेटलाच नसता.
टोल बन्द होणार नाही. वाढतच जाणार. त्यात बरीच कमाई आहे सर्वांचीच.

१ एप्रिल हा दिवस जागतिक नमोदिन म्हणुन साजरा करण्यात यावा.<<< Lol

इतका जळफळाट बरा नव्हे काउ, बाऊ होईल.

toll1.jpg

कालच्या इंडियन एक्स्प्रेसमधील बातमी.
संबंधित विभागांच्या बैठकीनंतर राज्यशासनाने, ८०,००० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होईल असे सांगत टोल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारच्या अर्थ, सार्वजनिक बांधकाम, महसूल व विधी खात्यांच्या संयुक्त बैठकीनंतर ही माहिती दिली.
महसुलाच्या नुकसानीव्यतिरिक्त कंत्राटे रद्द केल्यास संबंधित कंपन्यांना प्रचंड नुकसानभरपाई/दंड द्यावा लागेल. त्यामुळे विकासाच्या व पायाभूत सुविधांच्या निर्माणाच्या गतीवर परिणाम होईल.
टोल रद्द करणे हा आमच्या पक्षाच्या जाहिरनाम्याचा भाग नव्हता. तसे म्हणणारी कागदपत्रे दाखवा वा कोण्या नेत्याने तसे आश्वासन दिल्याचे दाखवा असे ते पुढे म्हणाले.
केंद्राच्या सहाय्याने नवे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प योजले आहेत. सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या भागिदारीतून साकारणार्‍या प्रकल्पासाठी (कंपन्यांना) टोल गोळा करू द्यावा लागेल.

१. आश्चर्य याचे वाटते कि नितीमत्ता / उच्च विचारसरणी याचे कायम गोडवे गाणारे , आयुष्य भर खान्ग्रेस ला शिव्या घालणारे लोक , मोदी कसे सुंदर काम करत आहेत याचे तर गोडवे गातातच पण टोल कसा अत्यावश्यक आहे ते पण सांगू लागले आहेत आता. इतका दांभिक पणा दाखवतील असे कधीच वाटले नव्हते.
२. कोब्रा साप आहे.
१ आणि २ यांचा काहीही संबंध नाही. वाटल्यास योगायोग समजावा.

http://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/lessons-for-india-f...

Where is Modi failing to learn from Lee? First, he is doing nothing to create an efficient police-judicial system. Second, his Make in India scheme has a protectionist touch. Third, he shows no hurry to catch and jail influential people for corruption. Fourth, he has done surprisingly little to improve the ease of doing business. Lee in his grave will frown at such a large unfinished agenda.

फेकूच जर फेकफेकी करत असेल तर त्याचे ईथले चेले का करनार नाहीत?गडकरिनेच टोलचे झंझट महाराश्ट्राच्या मागे लावले आहे .तो कशाला टोल बन्दी करेल?

टोल ची झंझट :

काँग्रेसने ६५ वर्षांत फक्त ११ हजार किमी रेल्वे बांधली आणि ब्रिटींशांनी ८० वर्षांत ५६ हजार

काँग्रेसला ब्रिटीशांएवढी रेल्वे बांधायला फक्त ३२५ वर्षे लागतील.

भाजपाच्या सरकारा अंतर्गत, आज देशात दररोज १५ किमी लांबीचा हायवे बांधला जातोय.

Pages