" लागेबांधे "

Submitted by विनायक. दि.पत्की. on 17 March, 2015 - 06:38

“ लागेबांधे ”

काही ठरवले नसताना
सर्व घडत गेले
न कळत पाउल माझे
हि ओढत गेले

काही तरी हरवले आहे
असे कधी वाटत नव्हते
तू भेटल्यावर मात्र
मला हि राहवले नव्हते

शुद्ध अंतकरणाने जेव्हा
उसळले अंतरंग
सुखद संवेदनांचे तेव्हा
शहारले जलतरंग

काय सांगावे कसे सांगावे
प्रश्न नव्हता उरला
नियतीलाच होती काळजी
प्रश्न हवेतच विरला

न कळत जे हरवले होते
ते तुझ्यातच सापडले
प्रवाहात वहात आले
आणि माझ्यातच दडले

जे चालले होते
त्याला चालना हवी होती
दात्याच्या मनात असल्याने
मागणीची गरज नव्हती

मने जुळली जसे
तंतोतंत सांधे
जीवनाच्या वळणावरच
जन्मोजन्मीचे लागेबांधे

विनायक. दि.पत्की

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" जीवनाच्या वळणावरच
जन्मोजन्मीचे लागेबांधे"
खरेच आहे .......सुंदर