बालपण....

Submitted by मनापासून on 17 March, 2015 - 06:07

नमस्कार रसिक मित्रांनो,

नवीनच आहे मायबोलीवर …सध्या मायदेशी नाही आहे त्यामुळे मराठी वातावरण नाही आजूबाजूला … थोडे शब्द सुचायला लागले म्हणून लिहितो आहे जसा जमेल तसा आणि तेवढा…:)
इंटरनेटवर मायबोली सापडली खूप बर वाटलं.. नावापासूनच सगळच जवळच वाटत मायबोलीवर …
म्हणून मी लिहिलेलं थोडा पोस्ट करतोय बिनधास्त …
अभिप्राय अपेक्षित... वाईट आणि चांगलेही Happy

१९८०-१९९० मध्ये ज्यांचा जन्म झाला असावा कदाचित त्यांच्या आठवणी थोड्या जास्त लवकर ताज्या होतील असा वाटतंय ...

--------------------------------x---------------------------x---------------------------x--------------------------x-----------------------------x----------------------

बालपण....

हे काय करतोय ...
उद्याचा काय प्लान मग ...
रविवारचा आरामच ना…

ऐक ना ..

माहितीये हल्ली पुढेच लागता जावा
पण,चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ…
बालपणालाही येत असेल आपली आठवण
त्या आठवणीनाही थोडा भेटून येऊ...

१०० दा फोन येतील घरच्यांचे
उशीर होईल खूप,घरी सांगूनच निघु…
बऱ्याच आठवणी आहेत बालपणाच्या पेटीत
त्यांना मात्र एक प्रेमळ सरप्राइझ देऊ...
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ …

रंगोलीमध्ये एकदाच पाहायला मिळतात नवी गाणी
तर थोडा लवकरच उठू …
केबल नसेल TV ला घरी
Channel आताच सेट करून ठेऊ ...
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ ...

बुर्जी चपाती,कडक चहा असेल नाश्ता
मोगली ,कृष्णा बघतच त्यावर ताव मारू…
रामायण,महाभारत आजकाल चालूच असता घरोघरी
ते न बघताच नेहमीच्या जुन्या ठिकाणी भेटु...
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ ...

गाडीचा कंटाळा येतो हल्ली यार
सोड, उद्या बाईक नको घेऊ...
पूर्वीसारखा जुन्या गल्ल्या,घरांसमोरून जाउ
नाहीतर बाबांची सायकल घेऊन मस्त रेस लाऊ ...
चल थोडं पुन्हा मागे जाऊन येऊ…

बॉक्स क्रिकेट,गोट्या,भवरा,डब्बा एक्स्प्रेस फुल ऑन मजा...
पुन्हा लपाछपी खेळून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसू ...
आठवतात का नेहमीची खिडकी-दारं,पाण्याचे नळ,तेच जुने उंबरठे
त्या सगळ्या निर्जीव वस्तूंना स्पर्शून पुन्हा एकदा जिवंत करू …
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ ...

थोडे पैसे घे निघताना,थोड्यामधेच भागेल आपला
चिंचा-बोरं,गोळा-पेप्सीकोला,चटणीपाव मस्त लंच करू...
देवळात झाडाखाली छापा-काटा,तळ्यात-मळ्यात खेळून गोंधळ घालू
बाजूच्या काकू येतील ओरडत,पटकन तिथून गायब होउ…
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ...

५ वाजता मराठी पिक्चर की खाडीवर फिरायला???
सूर्यास्त,गार वारा,भाड्याची सायकल आणि तिखट भेळपण खाऊ …
चिमण्यांचा थवा दिसेल खाडीवर बऱ्याच दिवसांनी
पिक्चरपेक्षा आपण खाडीच प्रेफर करू…
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ…

दूरवर देवळाची घंटा,आजोबांचे भजन आणि आरती
देवळाबाहेरचा मंद प्रकाश,विंटेज मोडचा फील घेऊ...
सेल्फी,रेकॉर्डिंग करावासा वाटेल खूप आपल्याला
पण मनावर नक्कीच हे सारे ठळकपणे कोरून ठेऊ…
चल थोडा पुन्हा मागे जाऊन येऊ…

संपत आला रे हा दिवस पटकन,अरे पण खो-खो ??
हलोजन्स,मच्चर,मैदानाच्या पाया पडून तेही सुरु करू…
मैदानाला ३० राउंड,वार्म अप,प्र्यक्टिस
आज काय २ चाहि पोल मारू…
चल थोडं पुन्हा मागे जाऊन येऊ…

घाम,लाल मातीचे पाय,मग अंघोळ आणि मटण भाकरी
आजीची गोदढि घेऊन पुढच्या रविवारची स्वप्न पाहू…
लक्षात येईल तेव्हा मित्रा एकच रविवार होतं बालपण
एक दिवसाचा आयुष्य नशिबी आपल्या पुन्हा भानावर येऊ…

चल मित्रा थोडा मागे जाऊन परत येऊ …

चल मित्रा थोडा मागे जाऊन परत येऊ …

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users