वेश्यागृहात व्हावा की मंदिरात व्हावा

Submitted by Prashant Pore on 17 March, 2015 - 06:02

वेश्यागृहात व्हावा की मंदिरात व्हावा
कुठल्या फुलास असतो मृत्यो तुझा सुगावा?

एकेक अक्षराने केलेत घात इतके
इतिहास खुद्द आहे मित्रा इथे पुरावा

पाणी कमी दिल्याने चिरतात सर्व भिंती
शिंपून प्रेम थोडे ह्रदयास कर गिलावा

पैसा कमावण्याला माणूस धावताना
वात्सल्य प्रेम सरते अन वाढतो दुरावा

ही एवढी अपेक्षा काळोखल्या पिढ्यांची
गर्भारल्या भविष्या जन्मा प्रकाश यावा

कुठलाच देव आता बहुदा नसेल भोळा
भगवंत मनगटाचा मजला प्रसन्न व्हावा

प्रशांत पोरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

sorry for not writing in Devnagari.

I don't understand techniques of Gajhal, but this one is a very meaningful.

ही एवढी अपेक्षा काळोखल्या पिढ्यांची
गर्भारल्या भविष्या जन्मा प्रकाश यावा<<< छान (ही एवढी - ह्यात वृत्त पाळलेले असूनही दोन मात्रा भरीच्या वाटल्या, क्षमस्व)

इतिहास खुद्द आहे मित्रा इथे पुरावा<<< ही ओळ स्वतंत्ररीत्या आवडली.

बाकी मतला समजला नाही (किंवा जो अर्थ समजला तोच अभिप्रेत आहे की नाही हे लक्षात आले नाही)

कवी प्रशांत पोरे,

हा शेर छान आहे.

कुठलाच देव आता बहुदा नसेल भोळा
भगवंत मनगटाचा मजला प्रसन्न व्हावा

कळावे

गं स