आमच थोड वेगळ आहे..

Submitted by Kally on 13 March, 2015 - 04:17

आमच थोड वेगळ आहे
स्पष्ट शब्दात नहीं
दाटलेल्या कंठानी का होईना
पाण मनातल्या भावनांची ग्वही अधी मी दिली
म्हणूनच,, म्हणूनच आमच थोड वेगळ आहे

लाल फुलाने नाटलेल नहीं आमचे नात
तर एकमेकांची साथ देणार, काळजी करणार
मनाचा पुस्तकात जपलेल्या गुलाबी कळीसारख आहे
म्हणूनच,, म्हणूनच आमच थोड वेगळ आहे

आवड त्याला जुन्या गाण्यांची
आणी मला त्याने गुणगुणलेल्या गाण्यांची
नकळत सारख्याच ओळी रेंगाळतात दोघांचाही ओठी
म्हणूनच,, म्हणूनच आमच थोड वेगळ आहे

सखी मानतो तो मला त्याची
आणी खरच शोभतो माझा मुकुंद
तरीही राधा की मीरा या प्रश्नात नहीं अडकलो आम्ही
म्हणूनच,, म्हणूनच आमच थोड वेगळ आहे35033_441931925893177_1091710289_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users