प्रेम..

Submitted by अश्विनी_कुलकर्णी on 12 March, 2015 - 13:24

प्रेम..
बघायला गेलात तर दोन अक्षरं.. समजल तर अख्ख जीवन..
अशीच एक कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

"मुलगी झाली.. मुलगी आणि आई दोघी पण सुखरुप आहेत." डॉक्टरांनी बाहेर येउन सांगितल.
एरवी खूश झाली असत एखाद कुटुंब पण मोरे घराण्याला वारसच नाही मिळाला म्हणून सगळ्यांनी तोंड वाकड केल..

प्रकाश मात्र एकदम खूश होता अपली एव्हडीशी परी पाहून अगदी आकाश ठेंगण वाट्त होत त्याला पण आईने तिथेच निर्णय सुनावला आता तुझ तुझ घर नवीन बघ... पाया खालची जमिनच सरकली त्याच्या. पण शब्दाबाहेर कधीच नव्हता तो..

कशी बशी त्याने एका खोलीची व्यवस्था केली अन ३ जीवांची कसरत चालू झाली. एकाच्या पगारात खोलीच भाड, ओल्या बाळंतिणीच न त्याच्या परीच भागण शक्य होईना.

सरते शेवटी माऊ(प्रकाशची परी) ३ महिन्याची झाल्यावर नोकरीला परत सीमाने जायचे हे निश्चित झाले.. दिवसामागून दिवस जाउ लागले. पण माऊला ठेवायच कुठे? घरच्यांनी कोणी सांभळ्ण्याचा तर प्रश्नच नव्ह्ता.

"पाळणाघर.. पाळणाघरात ठेउया प्रकाश माऊ ला???? " सीमाच्या या बोलण्यावर प्रकाश आधी भयंकर चिडला पण जस जसा सीमा बोलत होती .
"प्रकाश पैसे जातील तर जाउ देत पण निदान अपली माऊ सुरक्षित आहे हे तरि समाधान लागेल ना रे, करायच तिच्याच साठी ना आणि तिच्याशिवाय आपल आहे तरी कोण??.." :'(
सीमाच हे शेवट्च वाक्य तर प्रकाशला मनोमन पट्लां दुसर्या दिवशी प्रकाश पळणाघरांची यादीच घेउन आला.. ५ ठिकणी जाऊन आल्यावर त्याने एक ठिकण निश्चित केल ते म्हणजे अनगळ काकू..
३ महिन्याची माऊ त्यांच्या कडे राहू लागली.. हळूहळू ती ही तिथे रमली.. सीमा नोकरीवर जाउ लागली.. दोघांनी मिळून स्वत:च घर घेतल..

बघता बघता छोट्याश्या माऊची 'नेहा प्रकाश मोरे' झाली.. आता नेहा ८वीत गेली होती तरी पण पाळणाघरातच जात होती. तिच्या बरोबरीच, तिच्याहून लहान बरीच मुल मुली तिथे होती.. आजही रोजसारख ती घरचा अभ्यास करत बसली होती पण दिवस मात्र रोज सारखा जाणार नव्हता याची तिला कल्पना देखिल नव्ह्ती..

तिच्या जीवनातील नवीन वादळानी तिला आवाज दिला होता..
"कोणी आहे का घरात अनगळ काकू ईथेच राहतात का गं..?"

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

"हो हो आहे ना बोला काय काम आहे???" नेहा काही बोलायच्या आतच काकू घरातून आल्या.

"नमस्कार मी चितळे.. श्वेता चितळे तुम्ही पाळणाघर चालवता ना?"

"हो, ही काय जेव्हडी मुल दिसता आहेत ती सगळी दिवसभर येथेच असतात. तुमच कोणी आहे का?" काकूंच्या स्वभावानुसार काकूंनी डायरेक्ट मुद्द्याला हात घातला.

चितळे - "माझा मुलगा राज.. त्याला ठेवायचे आहे. तसा आता ८वी ला आहे पण आम्ही दोघ पण नोकरीचे. त्यात याच महिन्यात इथे राहायला आलो. लाजतोच आहे तो इतका मोठा असून कसा जाऊ म्हणून पण इलाज नाही . काळजी वाटते म्हणून माहिती साठी आले."

"चालायच ओ लहान आहे ८ वी म्हणजे काय जास्त नाही काळ्जी तर वाटतेच आई वडिलांना.. ही आमची नेहा ही सुद्धा आहेच की ८ वीत. लहान पणीपासून माझ्याकडेच असते. आताच्या जगात राहायच म्हणजे दोघांना करावीच लागते नोकरी.."

"हो ना. हे एक बर झाल कोणीतरी आहे म्हणायच त्याच्या वयाच म नाही त्याला अगदीच वेगळा वाटणार.."

"बघा तुम्ही दोन दिवस ठेवा त्याला .. पटल त्याला, तुम्हाला तर ठेवा नाहीतर रमायला तरी पाहिजे ना हो त्याला पण त्रास नको त्याच्या कलाने पण घेतल पाहिजे मुल फ़ार हळव्या मनाची असतात "

"हे उत्तम सुचवलत वहिनी अछा उद्या येते मग त्याला घेऊन मी. मग हिशोबाच ठरवू.."

"हिशोबाच काय लेकरु रमायला हव.. मी पाळणाघर चालवते पण प्रत्येकाला स्वत:च्या मुलांसारख जपते."

"मग उद्या १० वाजता सोडते त्याला." एव्हड बोलून चितळे निघून गेल्या.

काकूंच्या घरी येऊन कोणी नाही म्हणेल अस आज पर्यन्त झाल नव्हत.. काकू खुपच प्रेमळ होत्या..

दुसर्या दिवशी सगळेच नवीन मित्र येणार म्हणून वाट पाहत होते. काकूंनी बजावल पण होता की त्रास नाही द्यायचा अस लहानग्यांना.

आणि एकदाचा राज आला.

गोरा गोरापान, घारे डोळे, तपकीरी केस... अगदी अखाद्या हिरो सारखच...

काकूंनी त्याला जवळ बोलावल न लांबूनच त्याच्या आईला जा काळ्जी करु नका असा इशारा केला.

"नाव काय तुझ बाळा..?"

"राज"

"राज.. अरे वा छान नाव आहे की. बर मग कुठ्ल्या शाळेत जातोस?"

"नू. म. वी."

"तुला क्रिकेट खेळयला आवडत का?"

आता मात्र साहेबांची कळी खुलली मनासारखे प्रश्न काकूंनी विचारायला सुरुवात केली होती. इतके अनुभव असल्याने कोणचही मन पटकन जाणत होत्या.

"हो आवडत ना पण इथे कोणी नसतच आम्ही आधी रहायचो ना तिथे होते मित्र इथ मात्र कोणीच नाही त्यात या आईने इथ सोडल आज मी तर येणारच नव्हतो"

"अस्स मग बर झाल आलास ते.. आज बघ आमच्य कडे एक जण कमी पडतोय खेळ्शील का?"

"कुठे कोण दिसतय.. काही तरीच सांगता तुम्ही."

काकू टेरेस वर घेऊन येतात तोवर चेहरा पडलाच होता त्याचा पण हळूहळू आवाज येऊ लागले तस बघू तरी अस approch झाला त्याचा.

काकूंनी सगळ्यांची ओळ्ख करुन दिली. अजून नेहा आली नव्हती आज उशिरच येणार होती. सीमाचा हाफ़ डे होता.

खेळ सुरू झाला न आपण इथे नवीन आहोत याचा देखिल विसर पडला राज ला. खेळ संपवून सगळे घरात आले. काकूंनी जेवायला बसवल. दमल्यामुळे नंतर सगळ्यांनीच ताणून दिली..

तूर्त नेहा पाळणाघरात आली होती. न तो नवीन मुलगा आला हे देखिल काकूंनी सांगितला तिला.

नेहा शाळेच काही लिहित बसली होती. अचानक समोर अनोळ्खी जाणवल्यान तिने वर पाहिल. तर समोर राज उभा होता.

"काय..?" राज म्हणाला.

"काय?"

"कोण तू? आत कशी आलीस? काSSSSSकू तुमच्या घरात ही कोण तरी मुलगी घुसलीए.. न मलाच काय अस म्हणतीए"

या वाक्यावर मात्र अगदी काकूंसकट सगळे मोठ्यांदा हसू लागले.

राज एकदम शरमलाच काल आई सांगत होती ती ही मुलगी ८वीत लीच हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होत.

" sorry"

"राज ना तू?"

"हो"..."८वीत आहेस का तू आई सांगत होती काल"

"हो, मग आवडल का काकूंच घर?"

"आवडल ना मस्त मजा आली क्रिकेट खेळताना. तू सकळी नव्हतीस ना म्हणून ते........"

"नेहा नाव आहे तिच.. उशिरा आली ना म्हणून रहिली ओळ्ख करुन द्यायची." काकू म्हणतच होत्या तोच त्याची आई आली न्यायला.

"चला काकू उद्या भेटू आई आली बघा"

या वाक्याने चिरंजीव रमले हे समजल त्याच्या आईला. हिशोबाच ठरवून राज ला घेऊन गेल्या त्या.

ओळ्खच इतक्या विचित्र पद्धतीने झाली की घरी गेल्यावर पण दोघंच्या डोक्यात तेच ते येत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद नंदिनीजी.. नक्कीच नंतरचे लिखण मोठेच असेल याचा प्रयत्न करते आहे लिखाण करायला थोडे अवघड जात आहे देवनागरी मध्ये चुका खुप होत आहेत.. पुढ्च्या भागात कथा पूर्ण करते.. नंदिनीजी यातच पुढचा भाग लिहिता येतो की नवीन धागा घ्यायचा?

नुसतं नंदिनी म्हटलं तरी चालेल. इथेच संपादन करून लिहिता येऊ शकेल. हा भाग छोटा असल्यानं इथंस लिहिलंत तर बरं पडेल.

सुरुवात चांगली झाली आहे....
पु.ले.शु.....

<<<<<माता आणि आई दोघी पण सुखरुप आहेत." >>> मुलगी आणि आई अस हव आहे का?>>>>+`1

मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न करत आहे मराठी लिहिताना फ़ारच चुका होत आहेत. होतील लिहुन तसे संपादित करत आहे धागा.

>>>>>>>>>>>>> लिखाण करायला थोडे अवघड जात आहे देवनागरी मध्ये चुका खुप होत आहेत <<<<<<<<<<<<<<<<<<

अश्विनी तुम्ही टाईप कसे करीत आहात. direct इथे टाईप करत असल्याने अडचण येत असेल अस मला वाटतंय.
म्हणजे तुमच्या keyboard ची default भाषा इंग्रजी असेल ना ?
तर अस करा google चाच मराठी keyboard उपलब्ध आहे तो download and install करा , त्यानंतर तुम्हाला default भाषा मराठी करता येईल.
आपण msg मध्ये टाईप करतो तसे टाईप करता येते आरामात ..