बेसावध

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

बेसावध

एका बेसावध क्षणी
बांध फुटला ...

काय सरलं
काय उरलं
हिशेब होत राहील
पण,
आत्ता त्याच बांधावर उभा राहून
विचार करतो आहे
त्या क्षणी बेसावध नक्की कोण होतं?

मी?
बांध?
की बांधापलिकडचा निवांतपणे खडे मोजत बसलेला
तरंगमग्न डोह?

प्रकार: 
शब्दखुणा: 

!!!

परागकण... सुरेख सुरेख कविता...
होतात कुठे? आहात कुठे? हरवू नका पुन्हा... (ही ताकीद समजा)

अगदी आपाद मस्तक फक्त कविताच .
तुमची कविता एकदा रंगस्वर ला ऐकण्याचा… पाहण्याचा योग आला होता. नीधप यांच्या 'आतल्यासहित माणूस' मध्ये. वेगळाच प्रयोग होता.