गजल...

Submitted by शशिकांत on 10 March, 2015 - 03:26

गजल...
ते भावतील डोळे पाणावतील डोळे !!
हलकेच ओलसर मग रागावतील डोळे !!
तेव्हा तिला न कळले माझ्या मनातले रे,
यादेत आज माझ्या ताणावतील डोळे !!
कैफात या सुडाच्या ते घालतील दंगा,
नजरेतली करारी मग दावतील डोळे !!
शोधू नकोस आता मजला उगाच तेथे,
वाटेवरी पुन्हा त्या ओलावतील डोळे !!
परदा नकोस ओढू डोळ्यांस घातलेला,
विसरून लाख दु:खे नादावतील डोळे !!
- शशिकांत कोळी (शशी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users