चुनावी जुमला म्हनजे काय?

Submitted by बाळू पॅराजंपे on 9 March, 2015 - 04:48

सगळीकडं चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला असा जयघोश चालु आहे. याचा अर्थ काय ? काही काही मेसेजेसवरुन याचा अर्थ खोत बोलले असा असतो का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तत्कालीन पीएम कसे दुर्बल आहेत हे भक्तांनी देशाला सांगितले होते. पीएम पदावरील व्यक्ती कशी हवी याच्या कसोट्या सुद्धा भक्तांनीच सांगितल्या होत्या. स्वतः भक्तांच्या देवाने सुद्धा ५६ इंच छाती आणि पाकच्या हद्दीत घुसून दहशतवाद संपवणे आदी भाषणे केली होती. सीमेवर जवान शहीद होत असताना नेते मात्र पार्ट्या झोडताहेत यावर काळजाला हात घालणारे भाषण केले होते.

तेव्हांच्या पीएमच्या बाबतीत व्यंगचित्रं, एकेरी उल्लेख, टिंगल हे सर्व भक्तांचे हक्क होते असं दिसतं. पण आता पीएम पदावरील व्यक्ती ही आदरणिय आणि प्रातःस्मरणिय झाली असल्याचे कळते.

http://www.maayboli.com/node/41664

त्या काळी अण्णा हे भक्तांचे आवडते नेते होते. आता मात्र अण्णांचे उल्लेख भक्तांकडून कशा पद्धतीने होतात हे कुठल्याही वर्तमानपत्राच्या पोर्टलवरून जाऊन प्रतिक्रियांमधे पाहता येईल. तेच आयडी आहेत ज्यांनी अण्णांबद्दल विरोधी मत दिल्यास देशद्रोहाचे आरोप ठेवलेले होते.

http://www.maayboli.com/node/36811

http://www.maayboli.com/node/40528

बजेट मधे सर्वच स्पष्ट झालेले आहे. हा लेख आधीच्या राजवटीत त्या राजवटीसाठी लिहीलेला असला तरी या राजवटीला सुद्धा अतिशय फिट्ट लागू होतोय.

http://www.maayboli.com/node/40461

भक्तांची भाषा.
त्यांचा सात्विक संताप.

येडा अप्पाचे नाव काढताच नाहीसा होतो.
आता असे धागे निघणे नाही.

http://www.maayboli.com/node/42340

भक्तांचा मुक्त संचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गजर.
हा एक भक्त नमुना म्हणून घेतला आहे.

कॉम्रेड पानसरे सरांच्या हत्येबाबत एकाही भक्ताला दोन ओळी निषेधाच्या लिहाव्याशा न वाटणे हे समजू शकते. पण रॅशनॅलिस्ट्स ??

त्यांना निषेध हा एक शब्दही लिहीता येऊ नये का ?
पानसरे सर कोण होते, कुठल्या पक्षाचे होते यापेक्षा त्यांनी काय भूमिका घेतल्या, कुठल्या लोकांचे लढे लढले हे पाहणं गरजेचं नाही का ? पानसरे सर रॅशनॅलिस्ट्स नवह्ते काय ?

सो कॉल्ड रॅशनॅलिस्ट्सच्या भूमिकेवर शंका का घेऊ नये यातली ही एक प्रमुख घटना. मुश्रीफ सरांनी दिव्य भारती या औरंगाबादेतून निघणा-या वर्तमानपत्रात म्हटले आहे की राष्ट्र सेवा दलाने पानसरे सरांना सांगितलं होतं की आम्ही पुण्यात हू कील्ड करकरे हा मुश्रीफ सरांचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्याप्रमाणे तो आयोजित केला होता. पण ऐनवेळी मुश्रीफ सरांना कार्यक्रम रद्द झाल्याचे कळवण्यात आले. तेव्हां पानसरे सरांनी म्हटले की " समाजवाद्यांनी कच खाल्ली का ? हरकत नाही, मी दीडशे कार्यक्रम घेणार आहे".

रॅशनॅलिस्ट लोकांपेक्षा अशा लोकांची जास्त गरज आहे. रॅशनॅलिस्ट म्हणजे स्वतःपुरतं, स्वतःची विचार सरणी सुधारत नेणारे पुरोगामी, ज्यामुळे समाजात काहीही बदल होत नाहीत असे निष्क्रीय लोक. यांच्या नादाला लागून हजारो आणखी असेच निष्क्रीय बनतात. याचा फायदा उचलून भक्त लोक मात्र निर्लज्जपणे आपल्या अजेन्ड्याचा प्रचार देशभर करत राहतात. यातल्या कित्येक गोष्टी फक्त प्रचारकीच नाहीत तर बनावट होत्या हे आता उघडकीला येत आहे.

पण म्हणतात ना अब क्या फायदा जब चिडीया जुग गयी खेत !
भक्तांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देता आलं नाही तर मीडीया, भक्तांचं नेटवर्क यांच्या जोरावर लोकांना ते सुखी आहेत असा आभास निर्माण करायला वेळ लागणार नाही.

बदल हवा असेल, भांडवलदारांच्या गुलामीतून बाहेर पडायचे असेल तर बाहेर पडावे लागेल. फुकटात काहीही मिळत नाही. दुसरा करेल आणि आम्ही त्याला शाब्दीक टाचण्या टोचू या पद्धतीने तर अजिबातच नाही. भले चुका असतील पण या लबाडांना रोखायला स्वतःची भूमिका निश्चित केली पाहीजे.

communist1.jpgcommunist2.jpg

पानसरे सरांच्या हत्येबाबत चर्चा का होऊ शकत नाही हे कळालेलं नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गळे तर मागच्या राजवटीत घोटले जात होते ना ? आता आनंदीआनंद आहे ना ?

गुड बाय फ्रेण्ड्स !

खामोशी बहोत कुछ बोलती है ....
खास कर खामोशी भी करवटे लेती हो |

भक्तांसारखं बिनडोक होणे याशिवाय पर्याय नाही. निष्क्रीय विद्वानांपेक्षा परवडलं ते.

आपली कळकळ कळली. पण सध्या आम्ही अच्छे दिन येण्याच्या प्रतीक्षेत आहोत, त्यासाठी कुठल्या उद्योगपतीच्या पत्नीला वाकूनच काय अगदी लोटांगण घालण्यासही तयार आहोत. मग भले आमच्या पदाची अवहेलना झाली तरी चालेल.

नमो यांचे सुद्धा पाय मातीचेच आहेत याची जाणिव एव्हढ्या लवकर होईल अस वाटलं नव्हत. त्या छातीत अ‍ॅसीडीटीमुळे गॅस भरला असण्याच्या शक्यतेने ती छप्पन इंची झाली असावी.

बायद वे ती लाल शालवाली स्त्री टुमकुरची महापौर आहे.

गीता रुद्रेश

http://www.tumkurcity.gov.in/node/116

यादीत सध्या तीन नंबरला आहे.

तेंव्हा टुमकुरात फूड फेस्टिवल होता.

बदल हवा असेल, भांडवलदारांच्या गुलामीतून बाहेर पडायचे असेल तर बाहेर पडावे लागेल. फुकटात काहीही मिळत नाही. दुसरा करेल आणि आम्ही त्याला शाब्दीक टाचण्या टोचू या पद्धतीने तर अजिबातच नाही. भले चुका असतील पण या लबाडांना रोखायला स्वतःची भूमिका निश्चित केली पाहीजे.>>>>>>>>सहमत

बायद वे ती लाल शालवाली स्त्री टुमकुरची महापौर आहे. >>> च्यायला, असं आहे होय ? डिलीट करतो.

त्या गुजरात मधल्या बुलेट ट्रेनसारखं झालं, ओबामा टिव्हीवर नमोंचं भाषण ऐकतात प्रमाणे.

आपल्या चहावाल्याने रेल्वे स्टेशनवर चहा कधी विकला याचा पुरावा उपलब्ध नसल्याचं माहीती अधिकारात उघडकीला आलेलं आहे.

हो.

मागे एकदा या फोटोवर चर्चा झाली होती.

आणि ती टुमकुरची महापौर आहे हा शोध नुकतेच कै. झालेले स्पार्टाकस यानी लावला होता.

मी टुमकुरच्या कार्पोरेशनची लिंक पाहुन कन्फर्मेशन केले होते. तेंव्हा तो फोटो एक नंबरला होता.

शंभर दिवसात काळा पैसा काही आला नाही. कोर्टात सांगितले आहे की मार्चाखेरीस काळा पैसा भारतात आणू.
मार्च आला आणि अर्ध्याच्या वर संपला.

एक तारखेला जागतिक नमो दिवसाच्या मुहूर्तावर प्रत्येकाने आपापले बँक अकाउंट्स चेक करावेत. १५ लाख नक्की जमा झालेले असतील. कदाचित , या मुहूर्ताचा घाट घातला असावा. लब्बाड कुठले !