स्त्री

Submitted by _हर्षा_ on 7 March, 2015 - 02:30

मळभलेलं आकाश
त्याखाली जळणा इतक्या प्रखर जाणीवा
भावनांचा पेटलेला होमकुंड
अनामिक भितीने वेढलेला भावनांचा समुद्र
सग्गळ काही बाजुला सारुन
व्यक्त होऊ पाहतेय ती
तिला साथ अथांग शब्दांची
देशील ना तु?

तिच्या डोळ्यातलं पाणी
खळण्याची वाट बघतेय ती
वाहणार्‍या पाण्याबरोबर
आठवांचा पाऊस पाडुन
मोकळी होऊ पाहतेय ती
तिच्या बरोबर त्या पावसात
भिजशील ना तु?

अनेक जाणीवांपल्याड
अगदी मुक्त मो़कळी
होऊ पाहतेय ती
तुझ्या माझ्या सारखीच
कित्येकदा झुरतेय ती
तिच्या आधाराला तुझा
हात देशील ना तु?

Group content visibility: 
Public - accessible to all site users