विद्युल्लता २०१५ प्रदर्शन - निमंत्रण

Submitted by सावली on 6 March, 2015 - 00:50

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी फोटो सर्कल सोसायटीने महिला दिनाच्या निमित्ताने 'विद्युल्लता' हे फोटोस्टोरी प्रदर्शन आयोजित केले आहे.
२०१५ साली महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, जळगाव, सोलापूर, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद अशा विविध भागातल्या, समाजासाठी उत्तुंग कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या फोटोस्टोरी या प्रदर्शनात पहाता येतील. या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन ६ मार्च २०१५ ते ८ मार्च २०१५ रोजी ठाणे कलाभवन, ठाणे येथे भरवले जाणार आहे.
तुम्हा सगळ्यांना या प्रदर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.

जागतिक महिला दिनानिमित्त फोटो सर्कल सोसायटी व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय `विद्युल्लता 2015' छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. फोटो सर्कल सोसायटीच्या 12 महिलांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन 6 ते 8 मार्च दरम्यान ठाणे कलाभवन येथे भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

6 मार्च रोजी सायंकाळी 5-30 वाजता ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून जव्हारमधील ज्येष्ठ समाजसेविका प्रमिला कोकड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 7 व 8 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनातले प्रेसनोटसाठीचे फोटो.

( यातले सगळेच फोटो मी काढलेले नाहीत. सगळ्यांचे मिक्स आहेत )

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱया महिलांचा व त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. ठाण्यातील फोटो सर्कल सोसायटीच्या वेदीका भार्गवे, स्वप्नाली मठकर, संघमित्रा बेंडखळे, वेदवती पडवळ, रेखा भिवंडीकर, नंदिनी बोरकर, गार्गी गीध, स्नेहा गोरे, अस्मिता माने, अश्विनी शिर्के, मिनल पाटील, सायली घोटीकर यांनी काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱया जळगावच्या पद्मश्री नीलिमा मिश्रा, सोलापूरच्या चंद्रिका चव्हाण, शुभांगी बुवा, ऍड. दीपा भोसले, नयन जोशी, सांगोल्याच्या डॉ. संजीवनी केळकर, औरंगाबादच्या संगीता कुलकर्णी, सुजाता दाभाडे, वर्षा पाटील, संगीता पाचंगे, लातूरच्या दीपा पाटील, तुळजापूरच्या भारतबाई देवकर, जव्हारच्या प्रमिला कोकड, घणसोलीच्या लतिका सु. मो., ठाण्याच्या शोभा वैराळ, कल्याणच्या विद्याताई धारप, यमगरवाडीच्या सुजाता गणभीर, प्रणिता मिटकर, मुळशीच्या संगीता हुलावळे, हवेलीच्या स्मिता होनप यांच्या सामाजिक कार्याची प्रचिती देणारी छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.

प्रदर्शनाला नक्की या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users