बावनकशी चांडाळचौकडी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

ते चौघंही त्याच्याभोवती जमले होते.
‘कॅट माणूस होता एकदम’.
‘हो नं. काय-काय करावं लागलं आपल्याला’.
‘डॉक्टर, तुम्ही health-food च्या नावाखाली prescribe केलेले almonds, pistachio, cashew सगळे हजम केले म्हाताऱ्यानी’.
‘नाहीतर काय. आणि भिमसिंगच्या दंडुक्याचाही काही प्रभाव नाही पडला’.
‘क्लब मध्येही पैसे जिंकतच राहिला’, त्यांच्या एकमेव नायिकेकडे कटाक्ष टाकत भिमसिंग डिफेन्सीव आवाजात म्हणाला.
‘टेन्शन न घेणारं जबरदस्त हृदय होतं म्हाताऱ्याचं’.
‘पण शेवटी व्हिडिओ चॅटवर key-lover नी च बाजी मारली की नाही? रिमोट e-speak नी च पुरेसा चाळवला शेवटी तो’.
‘चला, वेळ नका घालवू. काढून घ्या तो मौल्यवान हिरा आणि टाका फावड्यानी शेवटची माती. गेला एकदाचा सोडून या जगाची चौकट तो’.

(LAMAL, ऑगस्ट २०१४, विषयः चौकट)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मला वाटलं आशुडी, मंजूडी, नीधप & झंपी बद्दल बोलताय की कॉय !
अग्गदी बावन्नकशी आहे हो ही मंडळी Proud नको तिथे नाक खुपसतील, मायबोली ह्यांचीच जहागीर असल्यासारखे सल्ले देतील नाही तिथे पचकतील अजुन काय न काय !!

गजा, कीवर्ड्स -

बावनकशी
चांडाळचौकडी
कॅट
हृदय - बदाम
key-lover - किल्वर
e-speak - इस्पिक
चौकट

चौकट राजा
किलवर राणी आणि इस्पीकच्या राणीने घात झाला.
बदाम , चौकट वगैरेच्या उता-यांना दाद दिली नाही.

सह्हीच ! आवडली. बारीकसारीक मजा आहेत त्या शोधायला धमाल आली.

कॅट ही एक किल्ली आहे. ती लावली की कुलुप उघडेल.

अनझेपेबल पण झोपेबल >>> अहो, एक डाव वाचून तर बघा. अगदी नेहमीचं हुकमी कथानक नाहीये पण एकदा का डोक्यात ब्रिज बांधला गेला की जीव रमील.

मुळात ब्रिज कसा खेळतात ते ठावुक नाही हा बेसिक लोच्या आहे>>
सेम हियर, लेखकाबद्द्ल/कथेबद्द्ल काहीही तक्रार नाही, आहे ती माझ्या पत्यांच्या ज्ञानाबद्दल आहे Uhoh

लोकहो, धन्यवाद.

चौकट हा विषय असल्यामूळे पत्त्यांचा जोड मनात आला.
खूप लांबण न लावता मिनी स्टोरीत सगळे सुईट्स (आणि जमतील ते संबंधीत शब्द) आणायचा प्रयत्न

चौकट विषयाव्र लिहिलेली मूळ कथा इतरत्र प्रसिद्ध झाली होती
http://aisiakshare.com/node/3374