आजूनही हा त्रास माल होतो
माझे आजोबा पूर्वी अमावसेच्या आठवड्याल कोणत्याही रात्री झोपेत मोठ्याने ओर्द्याचे तसे झाले नाही तर पूर्निमेचाय आठवड्यात कोणत्याही रात्री तोच
त्रास मला होतो
वडलांच्या तोंडून आईकून आहे कि माझे काका (माज्या वादांचे मोठे भाऊ) लहान असताना घरची परिस्थिती बेताची असल्या मुले इतर ठिकाणी मोलमजुरी
करून घरी बाजारहाट आणायचे असेच एकदा अंधार झाल्यावर बाजारहाट घेऊन घरी परतत होते
वाटेत अंधार होता भरपूर झाडी आणि शेती होती (आता JCB ने ती रस्ता मोठा केला आहे आणि झाडे पण तोडली आहेत) रस्त्यात त्यांना एक बकरीचे पिल्लू
गावी त्याला "करडू" म्हणतात ओरडताना दिसले त्यांना वाटले कि मेंढपाळाच्या कळपातले असेल आपण त्याला घरी नेऊ जर, धनगर आला तर त्याला परत करू नाहीतर त्याला पाळू असे
म्हणून त्याला खांद्यावर घेतले आणि चालू लागले एका जागी
आल्यावर त्यांना मागून आवाज आला कि "माजी जागा आली आता मला जाऊदे" आणि अचानक ते करडू
खांद्यावरून नाहीसे झाले काकांनी हातातली पिशवी तिथेच टाकून धूम ठोकली तेवा पासून ते रात्री झोपेत अचानक बडबडतात
माझा त्रास वेगळे, आहे पण आजोब्न सारखाच आहे मला कोणता प्राणी व्यक्ती एखादी गोष्टीची भीती होते आणि झोपेत जोरात ओरडतो माझी पत्नी पण घाबरून मला मला झोपेतून जागे करते
गेले ३ ४ महिने ती गावी गेली आहे पण मला काही त्रास झाला नाही मी उशाला नेहेमी काही लोखंडी वस्तू (हल्लीच मी स्टील ची टोकेरी छोटी सळी आणली आहे जी तंदुरीत वापरतात ती) टोकेरी वस्तू झोपतो तर तो त्रास कमी होता पण गेल्या २ आठवड्यात माझी बहिण आली आणि मी हौल मध्ये झोपलो ती ठेवायला छोटी सळी विसरली आणि नेमकी त्या दिवशी ३ फेब १५ ची पोर्णीमा होती आणि तिचे महत्व पण प्रखर होती त्याच रात्री मी मोठ्याने ओरडलो ह्या वर काहीही उपाय नाही आहे किती मंत्र जाप करून सुद्धा काही फायदा नाही मला एक लोखंडी वस्तू घेऊन झोपवेच लागते डाव्या पायाची चप्पल पण चालते
अमानवीय धाग्यावर हाच प्रतिसाद
अमानवीय धाग्यावर हाच प्रतिसाद दिलाय ना .
लोखंडाचा आणि भुताचा काय संबंध असतो ? कोणी सांगेल का ?
मराठी नीट टाइप न झाल्यामुळे नक्की काय म्हणायचय नाही कळलं . online मराठी टायपिंग च्या साईट वरून करा कि . तुमचा देवापेक्षा जास्त विश्वास लोखंडाच्या सळी वर आहे?
सारीका, भुते लोखन्ड, खाकी
सारीका, भुते लोखन्ड, खाकी वर्दी/ सरकारी वर्दी ला घाबरतात असे ऐकलय. त्यामुळे असेल असे. पण या वर्दीला घाबरतात म्हणून या गोष्टीन्चे पेवच फुटले होते आमच्या लहानपणी.
काय तर म्हणे एक भुत रात्री १२ नन्तर रस्ता अडवुन येणार्या जाणार्याला त्रास द्यायच, पण एकदा एक इन्स्पेक्टर त्याच रस्त्याने त्याची ड्युटी सम्पवुन मोटरसायकलवरुन चालला होता, तेव्हा त्या भूताने त्याला अडवले. पण इन्स्पेक्टरने न घाबरता भुताला पट्ट्याने हाणले तेव्हापासुन भुते घाबरतात म्हणे वाहन आणी वर्दीला.:हाहा: तर त्या भुताला कसे काय मार बसला असेल ते गोष्ट सान्गणारा जाणे. पण लहानपणी आम्हाला असे प्रश्न पडत नव्हते.:फिदी:
लोखंडाचा आणि भुताचा काय संबंध
लोखंडाचा आणि भुताचा काय संबंध असतो ? कोणी सांगेल का ? >>> माहित नाही . पण माझी आजी , लहान बाळ झोपेत घाबरू नये म्हनून लोखंडी सूरी वगैरे ( अर्थातच , व्यवस्तिथ फडक्यात गुन्डाळून ) त्याच्या डोक्याशी ठेवायला सांगायची .
अंतर्मनात दडलेल्या
अंतर्मनात दडलेल्या गोष्टींमुळे आपल्याला हा त्रास होतो. झोपेत ओरडणे. बरळणे. चालणे या गोष्टी काही अबनॉर्मल त्रास नव्हे. फारच त्रास वाटत असेल तर आपण सायकोथेरपीस्टची मदत घ्या.
रमचे २-३ पेग लावून झोपत जा,
रमचे २-३ पेग लावून झोपत जा, कसलाही त्रास होणार नाही तुम्हाला.
एक मस्त डॉबर मन पाळा भुते,
एक मस्त डॉबर मन पाळा भुते, उंदीर सर्वांच्या चिंध्या करेल. मस्त झोपा.
मिमिविजय, लोखंडाची वस्तू
मिमिविजय,
लोखंडाची वस्तू टोकेरीच हवी असते की कुठलीही लोखंडी वस्तू चालते?
गावागावातल्या नार्कोडायनेमिक (झोपेत हालचाल, आवाज घडवून आणाणार्या भूते,आत्मे आणि भास इ. गोष्टी) गोष्टींच्या डिमांडस वेगवेगळ्या असतात बहुतेक. आमच्या एच के रिजनमध्ये लोखांडाची टोकेरी नव्हे तर धारदार वस्तू लागते.
तुम्ही एकदा प्रयोग करून फक्त लोखंडाची गोष्टं चालते की टोकेरीच हवी की धारदारच हवी यावर प्रयोग करून पहा.
मला रिझल्टस कळवा. मी याबाबतीत तुम्हाला मदत करू शकेन कदाचित.
आमच्या वडलांना हाच अनुभव १९४२
आमच्या वडलांना हाच अनुभव १९४२ साली वडाळ्याला आला होता. रात्री अकराला ACME कंपनीतून ड्युटीवरून परतताना ते टेकडीवरच्या स्मशानाजवळच्या शॉर्टकटने बिनधास्त दादरला चालत यायचे. असेच एक करडू एकदा उचलून घेतले आणि चालता चालता ते मोठा बोकड झाले. दुसरे दिवशी ताप आला पण नंतर काही त्रास झाला नाही.चंद्र राहू एका स्थानी आहेत काय ?एक तर्क .