जे मला सोसायचे

Submitted by निशिकांत on 27 February, 2015 - 00:41

जे मला सोसायचे
का कुणा सांगायचे?
कायदे ठरवेन मी
मी कसे वागायचे
ध्येयपूर्ती हो न हो
निश्चये धावायचे
मृगजळाला प्राशुनी
तृप्त आहे व्हायचे
स्वप्न, पायांचे अधूरे
एकदा घसरायचे
द्रौपदीला आजही
तेच ते भोगायचे
कोरले हृदयावरी
तिज कसे विसरायचे?
जाहले निर्माल्य ते
मन कसे फुलवायचे?
राहिले "निशिकांत"चे
आतुनी उमलायचे
निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरले हृदयावरी
तिज कसे विसरायचे? .>>>>>>>

या शेराने मला माझ्या कवितेतील ओळी आठवल्या .......

येतीस तर हसून ये
जातीस तर हसून जा
जाता जाता काळजावर
गोंदलेले पुसून जा

--- बाळ पाटील