आमचं काही खरं नाही .........

Submitted by निनाद जोशी on 26 February, 2015 - 04:26

ह्यांना वाटते यांचे खेळ आम्हाला काही कळत नाही
अहो ते न कळायला आम्ही काही बालवाडीतली पोरं नाही

एक दिवसाची मैत्री ,नंतर पुन्हा भांडण करता
थोडस काही झाल्यावर संसार मोडायच्या बाता करता
अहो सिमेंट लाऊन जोडलेला संसार काही झाल तरी मोडत नाही
पण दादागिरीची भाषा मात्र काही केल्या जात नाही

वेगळे होऊन एकमेकांत लढाया लढता
आणि काही वेळ गेला कि त्याला सामोपचाराची ठिगळ जोडता
या तुमच्या जोडणीला काहीच अर्थ उरत नाही
असल्या या नाटकांना कोणीच महत्व देत नाही

सर्व काही तुम्ही एकमेकांत वाटून खाता
नंतर खाण्याला विरोध केल्याचा दिखावा करता
गोरगरिबांचे वाटे लुटताना तुमचे मन थरथरत नाही
वरून त्यांच्याकडून मत मागताना तुम्हाला लाजा हि वाटत नाहीत

असे तुम्ही पुढारी , तुम्ही काय देशाचा विकास करणार
तुमचा वेळ एकमेकांत भांडण्यात जाणार
तुम्हाला काही आमच्यासाठी वेळ मिळणार नाही
आणि स्वतः काहीतरी केल्याशिवाय आमचं काही खरं नाही .........

Group content visibility: 
Public - accessible to all site users