तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....

Submitted by निनाद जोशी on 26 February, 2015 - 04:05

माझे घरंगळणारे अश्रू तुझ्या पायापाशी पोहोचले .......
तुझा स्पर्ष होताच थोडेसे गालात हसले......

म्हणाले तुझा सहवास फारच मोजका झालाय.....
सावलीत बसूनही माझा जीव उन्हाने त्रासालय....

हवीये तुझी भेट काही क्षण तुझे हवे आहेत ....
आठवणीचा प्रकाश उजळवायला थोडे भास तुझे हवे आहेत ....

जाताजाता तुझी छोटी भेट दे मला ....
तू नाही तर तुझा आभास दे मला ....

किमान आठवण ठेव माझी हृदयाच्या एका कोपऱ्यात....
अडगळीत का होईना पण राहण्याचे समाधान असेल त्यात....

चाल आता मी धरतो परतीची दिशा....
तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....

चाल आता मी धरतो परतीची दिशा....
तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users