ब्रेक-अप के बाद ………

Submitted by कृष्णतारा on 26 February, 2015 - 01:55

तिच्यासाठी झालो होतो मी येडा ………
ती गेली निघून हातात देऊन पेढा …… ।

सोडली होती तिच्यासाठी रम …...
आता सोबती आहे माझा फक्त आणि फक्त गम …… ।

तिच्या सोबत फिरताना वाटत नव्हती पर्वा न वाटायची शरम ……
गोल्डफ्लेक दिली सोडून आता ओढतो आहे गरम …… ।

standardपणा जपत होतो जेंव्हा आवडत होतो मी तिला …
आता मला सावरतेय तिचीच मैत्रीण शीला …।

दुसरा मिळाला बॉयफ्रेंड तर मला dump केले ……
तिच्यासाठी आणलेले गिफ्ट तिच्या मैत्रिणीने चोरून नेले …।

थकून जेंव्हा बसलो बारमध्ये पीत होतो व्होडका ….
तिच्यासोबत राहून रिलेशनशिपमध्ये झालो होतो मी कडका …।

चढली जेंव्हा व्होडका मला तेंव्हा डोक्यात ट्यूब पेटली ….
गाठले नंतर शिलेला एका झटक्यात ती पटली …।

आता फक्त विचार करतोय आयुष्याच्या ब्यालंसशीटचा ….
किती दिवस खेळू देणार खेळ हा डेटिंगचा …।

शेवटी जीवनभर एक जीवनसाथी हवी आहे …
करेल माझ्यावर मनसोक्त प्रेम अशी माझ्या स्वप्नातील ती एक परी आहे…।

Group content visibility: 
Public - accessible to all site users