हाय.. रे ही तगमग.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 23 February, 2015 - 07:34

स्त्रोत :- हा लेख सुचण्याकरता फेसबुक वरील बरीच अकाउंट जबाबदार आहेत. मी एकटाच, एक मृगजळ, कधी येशील परत ? वगैरे वगैरे.. हो.. या नावाचीही प्रेमात असफल झालेल्यांची अकाउंट आहेत. ती फेक किंवा तत्सम असली तरी प्रेमभंग हे त्यांच्या जीवनात येउन गेल हे लक्षात आल. (आता कसा काय शोध लागला हा भाग निराळा). याशिवाय अनेक ग्रुप आहेत अशाच अर्थांचे.. हा लेख त्या सार्यांना समर्पित.(किशोरावस्तेथिल शारीरिक बदलांच शिक्षण आजकाल दिल जातंय शाळेतून पण 'मानसिक बदल' त्याच शिक्षण कोण देणार? असच काहीस.)

'व्ह्यालेनटाइन डे' काही वर्षांपूर्वी तो भारतात अस्तित्वात नव्हता, जेव्हा तरुणाईत पसरला तेव्हा फक्त १४ फ़ेब्रुअरि या एका दिवसापुरता मर्यादित होता.. मग त्या दिवसाला आणखीन स्पेशल बनवण्यासाठी तो गिफ्ट शॉप आणि तत्सम दुकानातून काही दिवस आधी झळकायला लागला.. राजकारण्यांनी मग त्यात नाक खुपसलं आणि नकळत त्याची आणखीन जाहिरात होऊ लागली. असा हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा. गेल्या एक दोन वर्षांत या "डे" बरोबर भरीस भर म्हणून कि काय आणखीन नवीन "डेझ" वेगवेगळ्या नावाखाली (रोज डे, किस डे वगैरे वगैरे) साजरे होऊ लागले. प्रेमाचा पाऊस म्हणजे फ़ेब्रुअरि महिना जणू. मात्र यावर्षी नवीन तर काय ; पुढचे ७ दिवस देखील मोजण्यात येऊ लागले. (अर्थात ते साजरे करण्यासारखे नाहीत ... ब्रेक अप डे, दुसरी शोध डे वगैरे वगैरे) एकच वाटल कि आजच्या पिढीच प्रेम हे खरच 'प्रेम' आहे ? प्रेमाची व्याख्या राहिली दूर पण प्रेमात जी भावना असते ती खरच मनात दाटून येते काय? प्रेम 'आकर्षण' ह्या माध्यमातून झाल तरी ते परिपक्व ह्या सकल्पनेपर्यन्त पोहोचत का या पिढीत? का उगाचच फक्त झुरण, वाट बघण, न जेवण अस काहीस "फिल्मी" ष्टाइलच वागण त्याला जोडलं जातंय.?

'व्ह्यालेनटाइन डे' ची संध्याकाळ. एका पार्क जवळून जाण्याचा योगायोग जुळून आला. माझ्यासमोरुनच एक प्रेमी युगुल (?) एकमेकांच्या हातात हात घालून त्या पार्कमध्ये शिरताना पाहिलं. कॉलेजची एकदोन वर्ष पार केलेले असावेत. जेमतेम १७ नाहीतर १८ वय वर्ष असाव. पार्कमधील इतर प्रेमीन्प्रमाणे आज हे देखील "एकसाथ जियेंगे मरेंगे, लेकिन एकदुसरे बिना नहीं रहेंगे" टाइपच्या शपथा घेतील. पण खरच हि अशी नाती टिकतील? त्यातूनही अगदी हुश्शार, करिअर ओरीएन्तेड कपल्स असतील तर ती प्रेमाची आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक जबाबदारीची नैय्या पार करून जातीलही पण बहुतेकांची नैय्या हि बुड्नारीच असते. जेमतेम वय त्यात दोघांचाही सेम वय, पुढे अभ्यास कमी.. नोकरीसाठी वणवण थोडक्यात 'मुलगा' या प्रकाराच सेटल नसण. मग या एका कारणापायी दोघांच मिलन दुरावण, नाहीतर जात कुळ अशी लहान सहन कारण, पण दुरावण आणि मग पुन्हा प्रेमभंगात रडण.. अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रक्रिया असतात. अजाणत वय.. फुलपाखराप्रमाणे भिरभिरणार वय. दोष प्रेमात पडलेल्या त्या दोघांचा नसतोच, त्यांच्या चलबिचल मनाला न ओळखता आलेल्या पालकांच्या विचारशक्तीचा असतो. पालक म्हणायचं तर फक्त आई वडीलच नाहीं तर कधी मोठी बहिण तर कधी मोठा भाऊ हि होऊ शकतो. काही गोष्टींसाठी प्रेमाने कानउघाडणी करावीच लागते. सुरळीतपण यावा आणि नात टिकाव यासाठी मार्गदर्शनाची गरज असतेच.

आमच्याच घरातलं उदाहरण. माझे धाकटे दीर सध्या या प्रेमाच्या हवेत बहरत आहेत. पण तसे ते "सेटल"या प्रकारात मोडणारे. म्हणजे खर तर ग्रीन सिग्नल मिळाला आहे असच तरी पण त्यांचा त्रागा चालूच. रविवारचा दिवस. त्याची चुळबूळ चालूच. फोन घेतला, बोलला, ठेवला, पुन्हा चिडचिड. कान पिळण्याची वेळ आली बहुतेक. मग हि जबाबदारी लाडक्या वहिनीचीच.
"चिरंजीव जरा ऐकता का? म्हणजे आत्ता तुझ्या मनात जे चालल आहे ते मी पक्क खरखुर तुझ्याच शब्दात तुला ऐकवलं तर त्यानंतर मी सांगेन तसं वागशील ?"
"बोल.. ऐकेन मी तुझ."
“ऐक मग आणि समजूनही घे.”
“पूर्ण दिवस आपल्या फ्यामिलीसोबत असूनही.. कोणी तरी आठवत असत. काहीही करून कस तरी काही संभाषण होईल का या प्रयत्नात वेळ जात असतो. ती स्पेशल व्यक्ती फोनची वाट बघत असेल अस सारख वाटत असत.. त्या गडबडीतच मिळतो चान्स आणि लावला जातो फोन. पण कोणी ऐकल तर.? किंवा सगळ्यांसमोर आपल "आपल्या दोघांतल" बोलण कोणी दुसर्याने का ऐकाव? त्या भितीतच किंवा विचारातच जे बोलायचे असते ते राहून जाते.. आणि काहीही बरळतो आपण..त्या स्पेशल व्यक्तीशी.
"बोलायचं होत बरच काही, बोललो काहीच नाही.. हे काय संभाषण झाल काय ? " ह्या विचारातच मग पुढचा वेळ आपणच आपल्याशी भांडत राहतो.. घुसमसत राहतो.. उगाचच चिडचिड करतो पण ..पण थोडा वेगळा विचार केला तर..?”

"बरोबर ओळखलस तू. ‘ती’ आज घरच्यांसमोर काहीच बोलत नाहीये.. कशी बोलणार पण.. नाही जमत ना.. "दिल तोः बच्चा है जी थोडा कच्चा है जी"

“म्हणूनच या कच्चा दिलाला शिजवण्यासाठी हा कान मंत्र.. जरा वेगळा विचार करून बघ.. अशा वेळेला निदान आवाज तरी ऐकायला मिळाला, ती स्पेशल व्यक्ती ठीक आहे आणि याहूनही सगळ्यात महत्त्वाच म्हणजे बिझी असतानाही तिची आलेली आठवण आणि या एका फोनने तिला याची झालेली जाणीव हे सार फार सुखदायक नाही का? सगळे असतानाही मी नाही म्हणून वाटणार अपूर्णत्व आणि त्याची नव्याने झालेली ओळख.. हा नवीन अनुभव आनंद देणारा नाही का?”

बराच वेळ विचार केल्यावर डोक्यात शिरल्या गोष्टी महाशयांच्या.. म्हणाले, "हो ग.. खरच.. Love You वहिनी..."
मग कुठे म्याचमध्ये मन रमायला लागल... सगळ्यांचच. प्रेमात पडलेल्यांना पडू न देता सावरण हि सगळ्यांचीच जबाबदारी असायला हवी.. ती हि प्रेमाने.

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>दुसरी शोध डे<<< Lol

दुर्दैवाने बाकीच्या लेखातून नीटसे आकलन झाले नाही. दोनवेळा वाचून पाहिले. चुभुद्याघ्या

मयू आपल्या प्रेमाबद्दलच्या भावना आणि आपण कधी बदलू यांचा काही नेम नाही! खरंतर प्रेम आपल्या मेंदूत होणारी रासायनिक अभिक्रिया आहे त्यापरत्वे काहीही नाही. तरीही मनाला ओढ असते आपल्या हदयप्रिय व्यक्तीची!छान प्रेम झाल्यानंतर संवाद हा घडणारच फक्त त्याचा कंटाळा केव्हा येईल हे न सांगितलेलेच बरे!
बाकी लेख उत्तम,आपल्या मनातील विचारांना तुम्ही लिपीबद्धं केले त्याबद्दल आपले अभिनंदन!
पुलेशु