जिव्हाळा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दहावी होऊन आता तीस वर्षे होऊन गेली, तरीही आमच्या बापटबाईंची आठवण अजून ताजी आहे. आजही त्यांची तेजस्वी मूर्ती डोळ्यासमोर आहे. त्यांचा कुठलाच विद्यार्थी त्याना विसरणे शक्य नाही.
पण मीदेखील त्यांच्या लक्षात असावे, तेसुद्धा ईतक्या वर्षानी हि माझ्यासाठी सुखाची परमावधी ठरली.

माझ्या धावत्या भारतभेटीत माझ्या वहीनीला त्या भेटल्या. लगेच त्यानी माझी चौकशी केली. मी भारतात आहे हे समजल्याबरोबर, उद्याच माझ्या घरी ये, असे प्रेमळ आमंत्रण त्यानी दिले.
मीही गेलोच. अगदी तोच चेहरा, तेच तेज, पाहताक्षणीच नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व.
खुप गप्पा मारल्या. बाई माझ्या निबंधाचे वगैरे कौतूक घरात सांगत होत्या त्यावेळी मला खुप शरमिंदे व्हायला झाले.
मग सहज म्हणाल्या, ईतकी वर्षे होतास कुठे ?
मी म्हणालो भारतातच तर होतो.
त्या म्हणाल्या, मग आलास का नाहि भेटायला ?
मी म्हणालो, खुप कठिण परिस्थितीतून जात होतो, कुणाकडे जातयेत नव्हतो.
बाई म्हणाल्या, मग मला बोलवायचे, मी आले असते, त्याच वेळी तर आपल्या माणसांची गरज असते.

आयूष्याचे सार्थक झाले माझ्या.
परवा बाईंचा वाढदिवस.
त्याना शुभेच्छा देण्याईतपत मी कधीच मोठा होऊ शकणार नाही.
आशिर्वाद मात्र हक्काने मागेन.

प्रकार: 

दिनेशदा, छान अनुभव Happy

अगदी मनापासुन. छान !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

दिनेशदा एक माहिती हवी होती.

LONGWOOD म्हणजे कोणते झाड? त्याला मराठीत काय म्हणतात? आपल्याकडे ते मिळू शकेल का?

कृपया माहित असेल तर सांगा.

गुरुब्रर्ह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवेनमः

-योगेश