आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे (तरही)

Submitted by इस्रो on 22 February, 2015 - 02:03

आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे (तरही) -
(सोयीसाठी तरहीच्या ओळीत "माझ्या" ऐवजी "त्यांच्या" असा बदल केला आहे).

आजही सार्‍या स्त्रियांना यातना तितकीच आहे
आजही जखमेत त्यांच्या वेदना तितकीच आहे

माणसाला दूर ठेवा आमुच्यापासून देवा
सर्व प्राण्यांची पुराणी प्रार्थना तितकीच आहे

कोणताही पक्ष सत्ता स्थापन्या आला तरी पण
आम जनतेचीच करतो वंचना तितकीच आहे

'तो' दिवा वंशास आहे 'ती' म्ह्णे की धन पराया - ('तो'=मुलगा, 'ती'=मुलगी)
काल होती आज ही ती धारणा तितकीच आहे

फारसे त्यांना कधीही बरसणे जमलेच नाही
अन तरी त्यांची उगाचच गर्जना तितकीच आहे

- इस्रो [९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users