भेटते त्या क्षणी चला म्हणते

Submitted by बेफ़िकीर on 19 February, 2015 - 11:28

माझी नवीन गझल - भेटते त्या क्षणी चला म्हणते

भेटते त्या क्षणी चला म्हणते
जी मला फक्त आपला म्हणते

अल्पसंख्यांक मी कसा होऊ
लाख माणूस जग मला म्हणते

एक दुनिया अशी हवी होती
जी भल्याला तरी भला म्हणते

काय आयुष्य लाभले आहे
फक्त जगण्यास जे कला म्हणते

जिंदगी 'बेफिकीर' आहे ही
चांगल्याला न चांगला म्हणते

======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

सुशांत,

'कला' हा शेर आवडल्याचे नोंदवल्याबद्दल अनेक आभार! Happy

सर्वांचा आभारी आहे.