अश्मयुगातला बाबा

Submitted by सौमित्र साळुंके on 17 February, 2015 - 00:44

आपली मुलगी बाबांसोबत दंगा करण्याच्या मूडमधे आहे.. बाबांनासुद्धा तेच करायचं आहे. पण नकळत डोक्यात काटे टकटक करत पुढे चाललेले.. बॉस कालच म्हणाले होते, जरा लवकर ये उद्या, डेडलाइन जवळ आलीये आणि आपण अर्ध्यात पण नाही आहोत. मुलीला फसवून दाराबाहेर पडताना चहासुद्धा घ्यायची इच्छा होत नाही. ती जी काही सात अट्ठाविस किंवा आठ चौदा असते ती पकडायला उसेन बोल्टला शरम वाटावी या स्पिडमधे तुम्ही पळता. कधी मिळते कधी हुकते. मिळाली तर ठीक पण हुकली तर जबर म्हणजे डबल मूड ऑफ़! असं वाटतं अश्म्युगात असतो (हे गृहीत धरून की तेव्हा काहीतरी बोली विकसित झाली असेल) तर कसं असतं?

मुलगी सकाळी सकाळी म्हणाली असती... "बाबाबा सकासाशा!" (चला सश्याच्या शिकारीला जावुया)
मग तुम्ही म्हणाले असता, "नकोगा वाबोगाचावा नाता तिहातिया दुण्सो टापाटाका" (वाघ चावेल नाहीतर हट्टी हत्ती सोंडेत धरून आपटेल)
मग ती चिडून आईला (जीने कुठल्या तरी जड़ीबुटिचा चहा कढत ठेवलाय) म्हणाली असती,"सपक्ला तार्भी वारिबा साटू नकाला सपकला वारिबा माटु"... (किती भित्रा नवरा आहे तुझा, मला नका आणू असला भित्रा नवरा)
मग तुम्हाला वाईट वाटलं असतं..
तुम्ही तड़क office bag सॉरी, दगडी भाला खांद्याला लावून तिला म्हणाला असता:

"ठूल झेमा परी
काशिरी रुकुन ययूया घरी,
तिराती जम्मर वालचे मलाला
सव्वालाचा घाम्प्रून ताघ्लेला हुम्माला.
होप लिझा झिमा नझाला रिबारी
हुम्मान टोखाटा लोबलो चिगोष्ट खरी"

(ऊठ माझे परी,
शिकार करून येवुया घरी
रात्री मछर कडकडून चावले मला
अस्वलाचं पांघरुण घातलं होतं मी तुम्हाला
झोप नव्हती झाली माझी बरी
म्हणून खोटं बोललो, हिच गोष्ट खरी)

तुम्हाला ती "झेमाबाबाला.... झेमाबाबाला" म्हणत बिलगली असती आणि तुम्ही तुमच्या योकोबाला (बायकोला) म्हणाला असतां, "जाआ मूर्साय राफ्राय राका हां, लोकाम्बी लिमाली राता गबातो" (आज सुरमई फ्राय कर हां, कोलमी मिळाली तर बघतो)

हट्टी हत्ती आणि चावरया वाघांचा एरिया टाळत तुम्ही मस्त फिशिंग नेट घेवुन गेला असता छोट्याश्या समुद्रसफरीला आणी तुमच्या परिराणी सोबत केली असती मासेमारी!!!

नको तो लैपटॉप, त्या डेडलाइन्स, त्या मीटिंग्स, एम् एस वर्डची सेटिंग, आणि अप्रूवलसाठीचं वेटिंग...

तुम्ही आणि तुमची बच्चू मासेमारीला,
कधी शिकारीला,
झाडांवर लटकायला,
जंगलात स्वैर भटकायला,
दगडाने ठिणग्या पाडत,
झाडावरचा मध काढत,
उंच डोंगरावर दोघींना घेवुन जात,
गुहेतून आणलेला शिधा,कुठल्याश्या सुळक्यावर बसून खात...
सूर्य उतरला की तुम्हीही उतरून तुमच्या घरी,
थंडीत दोघिंवर अस्वलीं पांघरूण
आणितुमची रात्रभर राखणदारी! Happy

सौमित्र साळुंके
१७ फेब्रुआरी २०१५

तळटीप: अश्मयुगात कुठून आली फिशिंगनेट आणि नाव, अश्मयुगात बोली भाषा नव्हतीच, ही बोली भाषा मराठी किंवा अरबी भाषेसारखी वाटतेय अश्या स्वरूपाच्या कमेंट्स करू नयेत. तसल्या खवचटपणावर फक्त माझी मक्तेदारी आहे Happy केवळ भावना लक्षात घ्यावी. माझी ज्ञानपीठासाठी शिफारस व्हावी असा माझा मानस नाही कारण मला सलमान रश्दीची भीती वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माताशा वाकिटा!
डजीटुबी टालावया एमी ताजाना झामी लुगमी लाम शई टिचकली सतई.
एमी डोव्याथेळने तईये गानूस लगाई सतए.
तेयाना शेपंनटी लेदिद काशिरी नेघुअ एलाए सतई.
एती माई नाभूज लाक्खी सतई.

Happy

आमचा एरिया थोडा दक्षिणेकडे असल्याने आमची अश्मयुगी थोड्डीशी वेगळी आहे तुमच्यापेक्षा.
तुमच्यासाठी अनुवाद करते.

'मस्तं कविता!
जडीबुटी वाटायला (प्रॅक्टीसला) मी जाताना माझी मुलगीही मला अशीच चिकटली असती.
मी थोड्या वेळाने लग्गेच परत येते सांगून गेले असते. पेशंटनी (फी म्हणून) दिलेली शिकार घरी घेऊन आले असते.
ती आम्ही भाजून खाल्ली असती.

छान प्रयत्न, पण "तेव्हाच्या बोली भाषेवर" जास्त जोर न देता प्रसंग वर्णनावर दिला असता तर अधिक खुलली असती.
तसेच ज्ञानपीठ व सलमान रश्दीची भिती हे उल्लेख अनाठाई असे माझे मत.
पुढील लिखाणास शुभेच्छा.

limbutimbu - आपला अभिप्राय योग्य आहे. मानसरोवर (नवी मुंबई) ते मस्जिद या सव्वा - दीड तासाच्या प्रवासात उभ्याने लिहिलंय आज सकाळी. पुरेसा वेळ मिळाला नाही किंबहुना कधीच मिळत नाही. मात्र प्रामाणिक अभिप्रायाबद्दल आभारी.

मानसरोवर (नवी मुंबई) ते मस्जिद या सव्वा - दीड तासाच्या प्रवासात उभ्याने लिहिलंय आज सकाळी.
>>>>
बापरे, भारी आहे..
आणि सहिये Happy

>>> मानसरोवर (नवी मुंबई) ते मस्जिद या सव्वा - दीड तासाच्या प्रवासात उभ्याने लिहिलंय आज सकाळी. >>>> बापरे, भारी आहे.. <<<<<
बघ बघ ऋन्मेषा... अशी चिकाटी अन आवड हवी. हो की नै?

प्रवासात लिहिले असेल, तर माझे वरील मुद्दे गौण ठरून उलट इतक्या कमी वेळात व अवघडलेल्या स्थितीतही फारच छान लिहिलय असे म्हणतो.

आमचा एरिया थोडा दक्षिणेकडे असल्याने आमची अश्मयुगी थोड्डीशी वेगळी आहे तुमच्यापेक्षा.
>>>>>
<:G :-G> साती, खरंच आहे... प्रत्येक मैलावर अश्मयुगी बदलते!!!

अग्ग्गोबै , मग मध्येच मानखुर्दात उत्रुन आमच्याकडे च्या प्यायला यायचे की
>>>>>
काऊ, मान्खुर्दात "उतरता" पण येतं? <:D :-D>

बघ बघ ऋन्मेषा... अशी चिकाटी अन आवड हवी. हो की नै?
>>>
माफ करा सौमित्र, तुमच्या धाग्यावर हे जरा अवांतरच होतेय, पण इथे मला अप्रत्यक्ष चैलेंज देण्यात आले आहे. आता पुढचा लेख दारावर लटकवून नाही लिहिले तर बघा,.. शप्पथ, तो पण विदाऊट टिकीट!

छान आहे लेख. आवडला.

पुढचा लेख दारावर लटकवून नाही लिहिले तर बघा,.. शप्पथ, तो पण विदाऊट टिकीट!>>>>डब्ल्यु टी? दारावर एक्टाच लटक हो, गफ्रेला नको सोबत घेऊस.:दिवा: नन्दिनीला अनुमोदन. हे असले डोम्बारी प्रकार प्रत्यक्षात आणण्याची कल्पनाही करु नका.

नंदिनी, ओके!, तेव्हा ट्रेन सिग्नलला, प्लॅटफॉर्मवर वा यार्डात थांबलेली असेल याची काळजी घेईन.
रश्मी, प्लीज, मी कालच सस्मित यांना वचन दिलेय की विश्वचषकात भारत पुढचा सामना जिंकेपर्यंत मी माझ्या "ती"चा उल्लेख करणार नाही, तुम्ही मोहात पाडू नका.
धागाकर्ता सौमित्र, पुन्हा क्षमस्व, हे शेवटचे Sad
तरी तुमचा धागाच वर येतोय याला फायदा म्हणून बघू शकता वा जश्यास तसे याचा बदला घेऊ शकता Happy

धागाकर्ता सौमित्र, पुन्हा क्षमस्व, हे शेवटचे

<<<<< ऋन्मेऽऽष, हरकत नाही... आनंदाची देवाणघेवाण होतेय तर हरकत कशाला असेल. असो बाकी मी खिडकीच्या आतल्या बाजूला "उभ्या राहण्याच्या पहिल्या" जागेवर उभा राहून लिहिलंय. आणि गंमत म्हणजे माझं बहुतेक लिखाण आजकाल तसंच होतं. ते वटवृक्षाच्या किंवा कदंब वृक्षाच्या वगैरे खाली बसून ध्यान करण्यासारखं किंवा ग्रंथलेखन करण्यासारखं झालंय. <:D :-D>

यावरून आणखी एक आठवलं... ते मानखुर्द गोवंडीला काही जण खिडकीवर पाय "रोवून" उभे राहातात आणि आत बसलेल्यांना एक वेगळीच अनुभूती मिळते. त्यावरच एकदा वैतागून लिहिलं होतं.

10959847_10205229409390701_5970164428425928964_n.jpg

आपले चरण पाहिले या डोळा
सुख सारे गेले वाहुनिया

करावी का तुम्हा पदांची आरती
जीव द्यावा ट्रेने झोकोनिया???

करावे कशाला ऐसें उपद्व्याप
थोर काय जाता ##टाया??

कशासाठी घ्यावा वहानेचा गंध
आगळाच छंद बोकडांचा

कुठून या आल्या अश्या अवलादी
देशाला कारण काळजीचे

रक्षक झोपले टांगा वर छान
घाण या मातीत सोकावली

सनी म्हणे यांचा उत्तम ईलाज
‪#‎#वर‬ रट्टे सोसेलसे!!!

२ फेब्रु २०१५.