-
- ------ : अमरनाथ यात्रेला का जावे ? : -----
..कारण आपल्यातील प्रत्येकजण धार्मिक तरी असतो, निसर्गप्रेमी तरी असतो, लेखक- कवी असतो, अभ्यासक असतो, नाही काही तरी, भारतावर प्रेम करणारा निस्सीम देशप्रेमी असतोच, असतो !.. व यासाठीच भारतीयाने अमरनाथ यात्रेला जावे
.... ' अमरनाथ यात्रा ' केवळ धार्मिक यात्रा नव्हे !... तर त्याहीपलीकडे जाऊन निसर्गप्रेमींना खुणावणारी हिमशिखरे, हिम ओहोळ(ग्लेशियर), हिमसरोवरे, हिमशिखरे, हिमनद्या, हिमद-या तेथे आहेत त्या निसर्गाला ज व ळून पा ह ण्या साठी निसर्गप्रेमींना ही प र्व णी आहे. निसर्गप्रेमींसाठी ही निस र्ग या त्रा आहे.
... ' अमरनाथ यात्रेच्या ' सानिध्यात वातावरण लेखकाला एवढे पोषक असते की, एखाद्या लेखकाला कादंबरीचा, कवीला काव्याचा विषय स्पुरावा ... असे अमरनाथ यात्रे चे वातावरण असते. म्हणूनच लेखक- कवी साठी ही लेखनयात्रा आहे.
..... बर्फात निर्माण होणारे शिवलिंग आज ही एक गूढ आहे. अभ्यासकाला त्याचे गूढ नेहमीच राहील. अशा अभ्यासकासाठी ही अभ्यासयात्रा आहे.
...... आणि ....... शेव टी .............
भारतीयांसाठी ... ' काश्मीर ' भारताचा अविभाज्य भाग आहे. असे आपण अभिमानाने म्ह्णतो पण
काश्मीर मध्ये जाण्यास धजावत नाही. आपण तेथे जाऊन आपला हक्क शाबित केला पाहिजे. आणि हा हक्क शाबित करण्यासाठी अमरनाथ यात्रेसारखी दुसरी यात्रा नाही !.. तमाम भारतीयांसाठी ही देशयात्रा आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१२ --
२०१२ मध्ये आम्ही पुण्यातून 'झेलम एक्सप्रेस' ने निघालो
जम्मू जवळचे एका विचित्र नावाचे रेल्वे स्टेशन ---------- " गंज बासौदा "
जम्मूतावी स्टेशन वर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१३ --
२०१३ मध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचे नियोजन केले. मुंबई हून जम्मूला निघालो. वाटेत दिल्लीला एक दिवस स्थलदर्शन केले. व ' राजधानी एक्सप्रेस' ने जम्मू ला उतरलो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१४ --
२०१४ मध्ये विमानाने जाण्याचे ठरवले 'पुणे ते श्रीनगर ' असे विमानाने गेलो. वाटेत ३-४ तास दिल्लीला थांबावे लागले.
.... एशियाड बस आणि विमान काय फरक आहे बुवा !... लोक उगाचच विमानाने प्रवास करतात !!..
श्रीनगर कडे कूच होणारे आमचे हेच ते विमान ! ...
दिल्ली ते श्रीनगर विमान प्रवासात विमानातून घेतलेली छ्बी
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------