किशोरीताईंवर एक कविता

Submitted by kulu on 14 February, 2015 - 10:19

खरं तर ही कविता देण्याची हे योग्य स्थळ, वेळ न लायकी नव्हेच. पण कवितेपेक्षाही गायनाच्या सन्दर्भात असल्याने ही कविता मी इथे लिहीतोय. कदाचित याला काव्य म्हणुन काहीच मोल नसेल पण खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी!

गानसरस्वती

kishoritaai.jpg

पवित्र हळवे सूर निराळे,
भैरवाची त्या जात कबिरी,
स्वरश्रुतींच्या हिंदोळ्यावर झुलत
निघाली आर्त किशोरी!

शांत मुद्रा मिटले डोळे,
तर हाती स्वरमंडल बाजे
दो बाजू दो तानपुरे अन
मध्ये शारदा जशी विराजे.

जिने साधुनी सख्य स्वरांशी,
स्वरा-स्वराला समूर्त केले,
दिव्य तिचा हा यमन ऐकण्या,
देवी -देवता उभे ठाकले!

जिने लाविता श्रुती बिभासी,
धैवतासही धैवत कळला.
तिने "सहेला रे" गातसा,
भूपाला गंधार गवसला!

सूर तिचे हे भरुनी राहिले,
अनंत कोटी विश्वांमधुनी,
राग-रागिणी स्वतःच म्हणती,
सरस्वतीच ही नच ही किशोरी!

- कुलदीप मोरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूब भालो !
मस्तच रे..फारच छान उतरलीये कविता. भक्तिभाव ओतप्रोत भरलाय अगदी ! आणि धैवतासही धैवत कळला,
भूपाला गंधार गवसला... या अतिशय छान उपमा !!
लिहीत रहा.

भारतीताई खुप धन्यवाद! तु स्वतः इतकी सुंदर कविता करतेस, तुझा प्रतिसाद म्हणजे ग्रेटच Happy

चैतन्य, जाई, के अंजली खुप खुप धन्यवाद! Happy

ओहो... अरे क्या बात है. कशी सुरेख लयीत आहे...
भक्तीभाव... नक्की. पण कविता म्हणूनही उच्चं आहे, रे.

खूप सुंदर. किशोरीताई माझं ही दैवत. त्यांच्या गाण्या एवढ मला दुसर्‍या कोणाचच गाण आवडत नाही. त्यामुळे मनाला भिडली. .

छान लिहिली आहेस.. एखादी रागमाला म्हणून गाताही येईल, नव्हे तू तशी गात असशीलच अशी दाट शंका मला आहे.. त्यामूळे पुढच्या मैफिलीत कुलूला जोरदार आग्रह करावा हि ( इतरांना ) विनंति !

अंजु, शरद, अमेय, शोभना, मनीमोहोर, बी, लीलावती, जिज्ञासा, योग, दाद धन्यवाद!

दिनेश, मी नाही रे म्हणत रागमालेसारख पण आता तुझी आयडिया ढापुन बघतो तसं म्हणता येतं का ते ! Happy

क्या बात है!!!!

मस्तच रे..फारच छान उतरलीये कविता. भक्तिभाव ओतप्रोत भरलाय अगदी ! आणि धैवतासही धैवत कळला,
भूपाला गंधार गवसला... या अतिशय छान उपमा !!
लिहीत रहा.>>>>>>>>>>>>>>+१०००००० Happy

कुलु....

"...खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी...." ~ हे फार सुंदररितीने मांडले आहेस तू. काव्याच्या व्याख्यांनुसार कविता लिहिण्याच्या मागे तू लागलेला नाहीस तर किशोरीताईंविषयी तुझ्या मनी असलेला प्रगाढ आदर आणि भक्ती यांचा मिलाफ हा होय. तो शब्दात बांधण्याचा प्रयत्न वाचल्यावर पद्यात ती भावना चांगली मांडू शकतोस असेच इथल्या प्रत्येक प्रतिसादकाला वाटत आहे...मला वाटते तुझ्या काव्यप्रतिभेला यापेक्षा अन्य कुठली पावती नकोच आहे.

नुसतीच लिवलीस. मेल्या...>>>> अनिलभाई Proud मला चालच सुचेना Sad
मामा कसली भारी प्रतिक्रिया Happy
देव काका, थांकु. मस्त संगीतबद्ध केलीत कविता!