ठरवले होते तिथे जर थांबलो नसतो

Submitted by जयदीप. on 11 February, 2015 - 13:16

ठरवले होते तिथे जर थांबलो नसतो....
एकमेकांना कधीही भेटलो नसतो!

बेफिकीरीने मला बोलावले होते
मी मला घेऊन इतका चाललो नसतो

खोल असता डोह जर माझा तुझ्या इतका...
सूर असता मारला, मी डुंबलो नसतो!

रंग माझा एवढाही बदलला नसता
सावलीमध्ये तुझ्या जर रापलो नसतो

पोचलो असतो जिथे पोचायचे होते
सारखा माझ्यात मी जर हरवलो नसतो

आरशामध्ये स्वतःला पाहिले असते
तर स्वतःवरती कधीही भाळलो नसतो

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंग माझा एवढाही बदलला नसता
सावलीमध्ये तुझ्या जर रापलो नसतो

पोचलो असतो जिथे पोचायचे होते
सारखा माझ्यात मी जर हरवलो नसतो

आरशामध्ये स्वतःला पाहिले असते
तर स्वतःवरती कधीही भाळलो नसतो>>>.खूपच अर्थपूर्ण आहेत अशा ओळी आवडणॅ व्यक्तीसापेक्ष आहे.

सुंदर