चिडलीस? आजकाल रोजच चिडतेस नाही ?
जाऊ दे. मी पण नाहीच बोलणार.
दार आपटलं मी. हो. तुझा चेहरा दिसत होता समोर. रडवेला.
तरीपण बाहेर येताना आपटलं मी दार.
एकतर इतका दमलोय आज. लांब कंटाळवाण्या मिटिंग्ज. दिवसभर मान मोडून काम केलंय. मी तक्रार नाहिये करत.
पण घरी आलो तर तूही त्रासलेली.
पिल्लांना जेवण भरवून झोपवत होतीस.
नेहमीच्या माझ्या काही सवयी.
तुझ्यामते "वाईट" सवयी. पायमोजे जागेवर न ठेवणे ही तुझ्यामते वाईट सवय आहे!
मग तू बोललेलं नेहमीचंच वाक्य. "वस्तू जागेवर ठेवत जा की रे. तू असा पसारा करायला लागल्यावर पोरं पण तेच शिकतील."
रोज मी ऐकून न ऐकल्यासारखं करतो (पण बदलत नाही!)
पण आज खरंच डोक्यात गेलं ते. बडबडलो काय वाट्टेल ते.
पण आज तू बोलली नाहीस. माझ्या बोलण्याला तुझ्याकडे उत्तर तयारच असतं असंही म्हणता येईना मला नेहमीसारखं.
तु़झ्या डोळ्यात पाहिलं तर पाणी आणि त्यातून डोकावणारी माझ्यावरची माया.
अगं भांड की. बोल तावातावाने. अस्वस्थ वाटायला लागलं मला.
तुझ्या शांत बसण्याला चिड्चिडेपणाचं लेबल लावून बाहेर पडलो घरातून.
सोसायटीच्या लॉनवर उगाच फेर्या मारत राहिलो.
किती वेळ गेला कोणास ठाऊक!
वॉचमनच्या हाकेने भानावर आलो.
"साहेब, अंधारात फिरताय जणू? आज ताई नाही आल्या फिरायला?" त्याचा भाबडा प्रश्न.
तुला ताई म्हणतो तो.
माणसं जोडणं मस्त जमतं मला.
पण एकदा जोडलेली माणसं टिकवतेस तू!
मागे वळून पाहिलं, फ्लॅटमधली लाईट बंद होती. मला वाटलं झोपली असशील. बास आता, घरी जाऊन पडूया असा विचार करतोय तोच फोन वाजला.
तुझा मेसेज.
"हिरवळ बघून झाली असली तर घरी ये. भांडायचंय तुझ्याशी."
क्युट
क्युट
आवडलं
(No subject)
मस्त.
मस्त.
किती क्युट ..आवडल तिच भांडण
किती क्युट ..आवडल
तिच भांडण पण वाचायला हव होत.
आवडल खूप.
आवडल खूप.
खुपच छान
खुपच छान
अगदी घरगुती....त्यामुळे
अगदी घरगुती....त्यामुळे तितकेच सुंदर...."घर अमर-मानसी का"....आविष्कार चित्रपटातील राजेश खन्ना शर्मिला टागोर आले नजरेसमोर....अशीच भांडणे, कधी खरी तर कधी लटकी...शेवटी परत एकत्र....छानच ना !
आवडेश..
आवडेश..
मस्तः)
मस्तः)
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
अगदी घरगुती....त्यामुळे
अगदी घरगुती....त्यामुळे तितकेच सुंदर...."घर अमर-मानसी का"....आविष्कार चित्रपटातील राजेश खन्ना शर्मिला टागोर आले नजरेसमोर....अशीच भांडणे, कधी खरी तर कधी लटकी...शेवटी परत एकत्र....छानच ना !>>> ओह्ह अशोकमामा. अगदी मनातले बोललात. हा लेख वाचून खरच आविष्कार चित्रपटाची आठवण झाली.
लेखही खूप क्युट
खुप छान लेख, आवडला
खुप छान लेख, आवडला
मस्त !
मस्त !
क्यूट!! खूप आवडल
क्यूट!! खूप आवडल
लेखणीतुन छान उतरलय भांडण.
लेखणीतुन छान उतरलय भांडण.
आवडले
आवडले
मस्त! खूप आवडलं..
मस्त! खूप आवडलं..
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद