ब्रेड~ सत्यासत्यता

Submitted by jpradnya on 8 February, 2015 - 07:11

बरेच लोक ब्रेड ह्या खाद्यप्रकाराला यथेच्छ नावे ठेवत असतात. ़ जगातले निम्में लोक ब्रेड किंवा तत्सम पदार्थ रोज खातात. एक भारत सोडला तर पोळी/भाकरी कुठेही बनत नाहीं. मग कोणत्या आधारा वर आपण असा निष्कर्ष काढतो? (मैद्या चा ठीक आहे...पण wholewheat / multigrain bread पण वाइटच का मानायचा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय आहे प्रज्ञा.

अलिकडे अनेक प्रकारच्या ब्रेड्स बनतात.

मैदा हा पोटासाठी चांगला नसतो हा एक भाग आहे. आणि ब्रेड बनवताना ती हायजेनीकली किती चांगली बनवलेली आहे हा दुसरा प्रश्न.

मी मल्टीग्रेन अनेकदा घेतो.

पुण्यात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधे ब्राउन रंगाचा ब्रेड वापरतात सॅन्डविचेससाठी तो ब्रेड मी बाहेर नाही पाहिला. त्यादिवशी सुई घ्यायची होती म्हणून एक सॅन्डविच मागवला आणि तो फार आवडला. त्यातील ब्रेड अतिशय छान होती.

चांगला विषय आहे प्रज्ञा.<<< १००%सहमय्तय मी

असो आता येणारे प्रतिसाद वाचून ज्ञानात भर घालावी म्हणतोय

व्होल व्हीट ब्रेड चांगला.

पण मी असे ऐकली की मैद्याच्याच पिठात रंग घालुनही तसा दिसणारा ब्रेड करतात म्हणे.

या दोन्हीतला फरक न खाता कसा ओळखायचा ?

माझ्या दृष्टीने
१. २००० कॅलरी प्लॅन असेल तर ६औस ग्रेन चालेल, त्यातला कमीत कमी ३ औस तरी होल ग्रेन हवा.
२. मल्टीग्रेन या लेबलला काही अर्थ नाही कारण रिफाइनिंगच्या प्रक्रिया झाल्यावर पोषक घटक गमावलेले असतात. दुसरे असे की जास्त भाग मैदा आणि थोडा भाग इतर ग्रेन घातले तरी मल्टीग्रेनचे लेबल लावता येते. होल विट किंवा होल ग्रेन हेही असेच एक लेबल. १००% होल विट किंवा १००% होल ग्रेन लिहिले असेल तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर नुसतीच मनाची समजूत.
३. बर्‍याचशा ब्रेडमधे मीठाचे प्रमाण जास्त असते. २०० मिलीग्रॅम्/ स्लाईस असा माफक गोल ठेवला तरी लेबल बघून शोधणे आले. एवढे करुन बाकीचा आहार लक्षात घेता मीठ प्रमाणात राखणे हे तसे बॅटलच. बरेचदा स्लाईस पातळ असते आणि पर सर्विंगचा क्लेम तोकडा ठरतो.
४. मला ओपन फेस सॅन्डविच वगैरे प्रकार झेपत नाहीत. त्यामुळे माझ्या कॅलरी प्लॅन मधे ब्रेड बसवणे कठीण जाते. त्यापेक्षा ब्राऊन राईस, बार्ली, ओट्स, घरी केलेली चपाती आणि इतर फ्लॅट ब्रेड्स हे रोजच्यासाठी सोपे जाते.
५. शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी घातलेली अ‍ॅडिटिव्ज टाळणे हे ही माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे विकतचा ब्रेड शक्यतो टाळते. घरी ब्रेड करणे हे मूड असेल तर होते. पण पोळी आणि इतर प्रकार त्यामानाने झटपट होतात.
ब्रेड अजिबात खात नाही असे नाहीये पण तो शेवटचा पर्याय असतो किंवा ट्रिट म्हणून - जसे की वडापाव.

>एक भारत सोडला तर पोळी/भाकरी कुठेही बनत नाहीं.>> अगदी पोळी/भाकरी नसली तरी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅटब्रेड असतात.

आपल्याकडेच मैद्याच्या ब्रेडचे प्रस्थ जास्त आहे. जगभरात विविध प्रकारचे ब्रेड बनतात.

व्होल व्हीट ब्राऊन ब्रेड, तसेच त्याबरोबर सलाड घालून आणि पुदीना चटणी फासून केलेले सँडवीच किंवा व्होल व्हीट टोस्ट हे प्रकार ऑफिसातील डाएटींग करणार्‍या मुलींना खाताना पाहिले आहे. म्हणजे हा प्रकार डाएटींगला उपयुक्त असतो एवढे नक्की.

चवीला म्हणाल तर, जे जे पौष्टीक ते ते बेचव या कॅटेगरीतील मी असल्याने मला स्वत:ला तो ब्राऊन ब्रेड नाही आवडत. पण ऑफिसमधील मैत्रीणींमध्ये थोडेसे चवीला त्यांचे सँडवीच खातो ते तेवढ्यापुरते बरे वाटते.

व्होल व्हीट खारी मात्र मला आवडते.

मैद्याची रोटी आवडते पण हॉटेलमध्ये वारंवार सब्जीरोटी खायची झाल्यास मग त्या मैद्याच्या तंदूर रोट्यांऐवजी बरेचदा तवा पराठा खाणे पसंद करतो. काही ठिकाणी तो मैदा आणि व्हीट दोघांच्या मिश्रणातून बनवतात, व्होल व्हीट नसतो.

ब्रेडच्या texture मधला फरक कळू शकतो. १००% होल विट किंवा १००% होल ग्रेन लिहिले असेल तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर नुसतीच मनाची समजूत. >> +१

माझे स्वत:चे ब्रेडचे म्हणाल तर चपाती-भाकरी वगैरे प्रकार आयुष्यात जेवढे खाल्ले आहेत तेवढाच मी ब्रेड देखील खाल्ला आहे, किंबहुना जास्तच..

मस्का आणि स्लाईस ब्रेड, बनपाव आणि बटर, कडक पाव मस्का लाऊन, अंड्याचे हाल्फफ्राय आणि पाव.. हे सर्व चहा बरोबरचे माझे फेव्हरेट नाश्ते
घरच्या घरी वा कॉलेजचा मिसळपाव, बाहेर हॉटेलात भाजीपाव, गाडीवर वडापाव, समोसापाव नाहीतर सॅंडवीच वा कच्छी दाबेली हे देखील वरचेवर किंवा रोजच खाणे होतेच..
घरी चिकन, मटण बरोबर वा कधीकधी अंड्याच्या कालवणाबरोबर सुद्धा मी पाव आवडीने खातो..

हे सर्व लहानपणापासून रेग्युलर खाऊनही त्रास असा फारसा झाला नाही आजवर, कदाचित आतड्याला पचवायची सवय झाली असावी.
ब्राऊन ब्रेड वगैरे हे शब्द मी हल्ली हल्ली ऐकू लागलोय, एके काळापर्यंत कुठे दिसलाच तरी त्याचा रंग बघून तो गरीबांचा पाव असावा असे वाटायचा Wink

नेहमीची पोळी आणि गव्हाचा ब्रेड यात 'हेल्दी खाणे' दृष्टीने काय फरक आहे?

तसेच १००% होल व्हीट ब्रेड व कोंड्यासकट केलेल्या नेहमीच्या पोळीतही?

Sorry for roman typing.

Kondyasakat poli karne sugaraniche kaam karan tasha pithachi elasticity kami aste. Matra tyat fiber content adhik aslyane adhik changli (chaav vegali janavte).
Halli kondyasaha peeth milane tase avghad aahe. Kahi kahi brands lihtat high fiber pan poli kartana aani khatana nehmisarkhich lagate. Tyamule mi sashank aahe.

नव्या दळणयंत्रांनी गव्हाचं सालासकट मैद्याइतकं बारीक दळण केलं, तर त्या पिठाला चाळून 'सपिट' बनवता येईल, जे मैद्याच्या लेव्हलचे बारीक असेल. (बारीक = कणांचे आकारमान)
सीमंतिनी म्हणतात तशी लवचिकता त्या पिठात नसेल, पण आंबवल्यावर यायला हरकत नसावी. शिवाय आर्टिफिशियल अ‍ॅडिटिव्ह्ज असतात की!. Wink

एक शंका.
इतकं बारीऽक दळल्यावर त्या 'फायबर' चा उपयोग काय? ते फायबर राहील का?

ब्रेड बनण्याची प्रोसेस आता लक्षात नाही. आटा आंबवून ( यीस्ट मिसळून ) त्याचं ब्रेडच्या कणकेत रुपांतर करतात ना ? यात बॅक्टेरीया असतात का ? (असं असेल तर चपातीत (पोळी) ही प्रक्रीया नाही).
ब्रेड खाल्ल्यानंतर त्याचे कण आतड्यात चिकटून बसतात असं वाचलं होतं. कोंड्यासहीत पीठाची पोळी खाल्ल्यास ब्रशचं काम होतं.

कोंडारहीत पीठाच्या चपातीत आणि ब्रेडमधे काही फरक आहे का याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. किंवा ब्राऊन ब्रेड आणि मैद्याची पोळी यात चांगलं काय हे पण जाणून घ्यायला आवडेल.

Yeast is not same as bacteria. Bacteria are prokaryotes (primitive microorganisms) while yeast is a eukaryote (more complicated). Bread-making uses yeast that ferments the flour (basically breaks down carbohydrates to release CO2). Poli/bhakari does not involve any fermentation step.
पोळीसदृश्य प्रकार भारत सोडून कुठे बनत नाही असे नाही. मेक्सिको मधे tortilla (उच्चार: टॉर्टिया) नावाच्या मक्याच्या पिठाच्या, मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या खातात. त्यातल्या कणकेच्या पोळ्या थेट आपल्या पोळ्यांसारख्या लागतात. (tortilla कसे बनवतात हे मला माहिती नाही. मी फक्त विकत आणून खायचे काम करते :P)
मला वाटते इथियोपियन जेवणात देखिल सगळे पदार्थ एका भल्या मोठ्या घावनावर वाढून सर्व्ह करतात.

Ethiopian injera is fermented. Pan mi tujhyashi sahmat aahe bahutek deshat unleavened breads astat.
Jewish lok paassover hya saaNaala unleavened bread khatat.

एकूणच ब्रेड हेल्दी नसतो असंच ऐकण्यात / वाचनात आलं आहे. त्यामुळे कुठलाही ब्रेड प्रकार टाळतेच. पण काही हेल्दी ऑप्शन मिळाल्यास चालेल. कधीतरी पोळीला सुट्टी द्यायला आवडेल. सो... वाचतेय.

ब्रेड मधे यीस्ट असतं म्हणून / तो फरमेंटेड असतो म्हणून तो हेल्दी नसतो असंही ऐकलं आहे. ते खरं आहे का?

>>स्वाती२ , भारतात १००% होल व्हीट ब्रेड मिळतो का ?>>
श्री, मला माहिती नाही.

आमच्या मित्राची बॅरीअ‍ॅट्रिक सर्जरी झालेय. त्याला डॉकने यीस्ट घातलेले ब्रेड खायचे नाही असे सांगितले. यीस्ट ब्रेड म्हणे सिस्टिममधून पास व्हायला जास्त वेळ लागतो. सर्जरीने त्याचे लहान आतडे कमी झालेय. ब्रेड खाल्ल्यास तो आतड्यात जास्त वेळ राहिल्यावर इतर घटकांसाठी जागा कमी पडणार आणि पोषण होणार नाही असे काहीतरी तो सांगत होता. त्याला होलविट टॉर्टिया व्रॅप चालतो पण पिझा, होलव्हिट पिटा , क्रुटॉन वगैरे खाता येत नाही. बेकिंग पावडर वापरुन केलेले चालते. त्यामुळे होल विटचे मफिन्स चालतात.

आपण जे गव्हाचे पिल्सबरी किंवा इतर पिठं वापरतो तो गहु नवीन असतो. असे म्हणतात धान्य हे कमीतकमी एक वर्ष तरी जुने वापरावे. ह्याच कारणामुळे जुने लोक धान्य घरात साठवून ठेवत असत. जे रेडीमेड पिठ बाजरातून आपण विकत घेतो (परदेशात) त्या पिठाची पोळी गुळचट नाही नाहीत. पोळीला एक गोडवा असतो तो ह्या पोळ्यांमधे नाही लागत. आणि पोळी तव्यावर अस्ताना जो सुगंध दरवळतो तोही नाही येत. ह्याचा अर्थ ही लोक चांगल्या दर्जाचा गहू वापरत नाही. ही पिठ नक्की कशी तयार होतात त्यांनाच माहित.

मी परवाच गोदरेज फूड हॉल मधून मल्टिग्रेन आणि वरून सीड्स पेरलेला मस्त ब्रेड आणला. होल व्हीट ब्रेड पण मुंबईत मिळतो. ब्राउन ब्रेड जो विकतात त्यात कॅरेमेल घातले आहे का रंगासाठी ते पॅकेजिंग वर दिलेल्या लिस्ट मध्ये चेक करावे.

पण मला पावभाजीचे पाव, व्हाइट ब्रेड व मैद्याचे नान, मलबार पराठा, लुची हे सर्व प्रकार आवडतात. फार आरोग्य पूर्ण नाहीत हे माहीत आहे पण कमी प्रमाणात खाल्ले तर काही त्रास होत नाही. कधी कधी
साधे ब्रेड अमूल बटर सँडविच, चीज सँडविच ह्याला कंफर्ट फूड म्हणून पर्यायच नाही असे वाटते. ( माझ्यापुरते. ) व्हाइट ब्रेड, ऑरेंज मार्मालेड व अमुल बटर पण एक विनिन्ग काँबिनेशन आहे. मी पिझा खायला गेले तरी डो बॉल व गार्लिक बटर पेस्तो मागून खाते. जुन्याकाळी फिरते साधू जसे आगीत कणकेचे गोळे भाजून खात त्याचे हे एलिगंट अवतार वाटते. कार्ब्स नको असलेल्यानी ब्रेड व पोळी पासून दूर राहायला हवे.

बी तुम्ही आशिर्वाद आटा किंवा सध्या हेमा मालिनी एक आटा ब्रंडची जाहिरात करत आहे तो, किंवा
अश्विनी हेअर ऑइल वाल्यांचा किंवा आशीर्वादचा मल्टिग्रेन आटा वापरून पाहा. तो साध्या कणकेत काही प्रमाणात मिसळायचा असतो.

सध्या हेमा मालिनी एक आटा ब्रंडची जाहिरात करत आहे तो >> अमा, तुम्ही त्यांच्या मार्केटिंग ला अप्रत्यक्ष दिलेली दाद आहे ही! Happy

ब्रेड चांगला भाजून कुरकुरीत होईल असा केला आणि त्यानंतर खाल्ला तरीही त्याचे कण आतड्याला चिकटून बसतील का? अर्थात ब्रेड असा कडक भाजला तर तो लवचिक न राहिल्याने आपण चपातीचा तुकडा ज्या प्रमाणे दुमडून त्यात भाजी पकडून खातो तसे करता येणार नाही परंतु पातळ भाजीत ब्रेड बुडवून खाता येईल किंवा सुकी भाजी चमच्याने खात मधून मधून ब्रेडचा तुकडा खाता येईल.

मी ब्रेड पूर्वी मोठ्या प्रमाणात खात असे परंतु आता महिन्यातून एकपेक्षा जास्त जेवणात ब्रेडचा समावेश होणार नाही हे पाहतो. त्याचप्रमाणे जेव्हा ब्रेड भाजी / सांबार / वरणासोबत खातो तेव्हा तो वरील पद्धतीने कडक भाजूनच खातो. परंतु जर ब्रेड जर काकडी टोमॅटोच्या कापांबरोबर सॅण्डविच स्वरूपात खायचा असेल तर मात्र न भाजता खातो.

ब्रेडचे तोटे (जसे की आतड्याला कण चिकटणे, रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची वाढ, इ.) सर्वश्रूत आहेतच. तरीही तो इतका प्रचंड प्रमाणात खपतो कारण त्याचे काही फायदे देखील आहेत.

चवीला चांगला.
मऊ असल्याने खाण्याकरिता सोपा. दात नसलेली व्यक्तिही खाऊ शकते.
शरीरात ऊर्जा लवकर शोषली जाते.

ब्रेडचे स्वस्त असणे / दर्जाला खराब असणे हा वर्षानुवर्षे चालत आलेल्या सरकारी धोरणाचा भाग आहे. सरकारी धोरणाप्रमाणे मैदा बनविणे महाग पडत असले तरी मुद्दामच मैदा स्वस्तात कोटा पद्धतीने बेकरीज् ना उपलब्ध करून दिला जातो. याउलट पूर्ण गव्हाचे पीठ कृत्रिमरीत्या महाग होत जाते. त्यामुळे केवळ नफेखोरीकरिता मैदा वापरण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. अगदी १००% गव्हाच्या पीठापासून बनविलेले असा शिक्का असणारे ब्रेड, खाकरा, बिस्किटे यासारखे पदार्थ मैदामुक्त असतील याची खात्री देता येत नाही. जर यातला सरकारी हस्तक्षेप / अनुदान / कोटा पद्धती दूर केली तर आपोआपच मैदा महाग होईल व कोणी गव्हाच्या पीठात मैद्याची भेसळ करण्याचे कारण उरणार नाही.

जे पदार्थ मैद्याशिवाय बनविणे अवघड आहे असे केक, खारी सारखे पदार्थ यांतच केवळ मैदा वापरला जाईल व त्याची अतिरिक्त किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाईल. ज्यांना ठरवून जंक फूड खायचेय ते त्याची जास्त किंमत देऊन खरेदी करतील.

आता मात्र अनारोग्यकारक मैदा स्वस्तात मिळतोय. माझी जास्त किंमत देऊन आरोग्यकारी पदार्थ खायची तयारी असली तरीदेखील अशा महागड्या पदार्थांमध्ये नफेखोरीकरिता या स्वस्त मैद्याची भेसळ नसेल याची मला शाश्वती वाटत नाही.

फारेंडा अरे हो. ती जाहिरात अशी सुरू होते. टीव्हीवर शोले चालला आहे व गब्बर तो अजरामर डायलॉग टाकतो ये रामगड वाले अपनी लडकियोंको किस चक्की का आटा खिलाते है वगैरे. मग हेमा आपल्याकडे वळून म्हणते उस समय तो मैं जवाब न दे सकी पर अब कहती हू. कायसेसे नाव त्यांचा आटा!!!. मध्य प्रदेशातील चुनिंदा गहू वापरून.. ब्ला ब्ला ब्ला व मग पोळीचा अप्रतिम शॉट आहे. गरम तव्यावर्ची पोळी. हेमीची साडी पण सोनेरी यलो अशी आहे. तिने स्वत:ला मस्त मेंटेन केले आहे त्या वयात तसे दिसणे सोपे नाही. पण तात्पर्य, तो मध्यप्रदेशातील गहू सर्वात उत्तम सिहोर कि काय तो त्याचा रेडीमेड आटा आहे. अजून बिग बास्केट वर ऑन लाइन उपलब्ध नाही. म्हणून घेतला नाहीये.
आशीर्वाद झिंदाबाद. पण ते ही जहिरातीत हम तो यू पी एम्पी तक जाते हैं अच्छा गँहू चुनने असे सांगतात व आमची चक्की सबसे क्लीन असे ही.

लादी पाव/ ब्रेड/ बनव्ण्याच्या बेकर्‍या बघू नयेत. रोलर फ्लोअर मिल मध्ये देखील स्वच्छतेची काय स्टँडर्ड्स फॉलो करतात कोण जाणे. म्हणून वरील दोन ब्रांड विश्वसनीय वाटतात. मोठ्या कंपनीत क्यूसी असते तरी.

तिने स्वत:ला मस्त मेंटेन केले आहे त्या वयात तसे दिसणे सोपे नाही.

या वाक्याशी १०००००००००००० वेळा सहमत. हे लिहिण्यासाठीच प्रतिसाद दिला, नाहीतर दिला नसता Happy

आमच्याकडे फक्त आणि फक्त अय्यंगार बेकरीतला पांढराशुभ्र मऊसुत ब्रेड (अधुनमधुन मुड आला की) चालतो. बाकीचे सगळे ब्रेड आम्ही विकत घेणे बंद केलेत. घरी ब्रेड केला तर कणिक, ओट्स इ. वापरुन ब्रेड करतो. घरच्या कणकेच्या ब्रेडची चव आणि टेक्शर पाहिले की बाहेरचा ब्राऊन ब्रेड फक्त रंगाने ब्राऊन आहे, त्यात बाकी सगळे पांढरेच आहे याची खात्री पटते. (हे मी भारतातल्या ब्राऊन ब्रेडबद्दल बोलतेय. इथे नाववाल्या कंपन्या पण फसवणुकीचे उद्योग करतात. बाहेर कदाचित ब्राऊन ब्रेड म्हणुन खरोखरीचा ब्राऊन ब्रेड देत असतीलही.)

वर अय्यंगारच्या ब्रेडच्या वर्णनात कापसासारखा मऊ हे शब्द राहिले. ते त्यात घालुन वाचा.

मध्यप्रदेशातल्या सिहोर(जिल्ह्याचे नाव)चे गव्हाचे बारीक, मध्यम तसेच जाड पीठ देशपांडेंच्या श्रीकृष्ण फ्लोर मिल्सच्या माध्यमातून मुंबई तसेच ठाण्यात घरपोच मिळू शकते. .

आणखी एक सरळसरळ जाहिरात Wink

सांगलीच्या विश्रामबाग मधील जुनेद बेकरीतले पाव! हैद्राबादच्या साबोन आणि माउंटन बेकरीतले ब्रेड आणि पावां त्याही आधी हिंदूस्तान बेकरी पुणे चे ब्रेड. फ्रेश बेक झालेला ब्रेड स्लाइस न करता घ्यायचा आणि त्याचे तुकडे तोडून ग्रीक गॉडेस डिप मध्ये बुडवून नाहीतर गार्लिक बटर मध्ये डुबवून खायचे......
प्रज्ञाजींचा धागा लवकरच ब्रेड फॅन क्लब मध्ये परिवर्तित होणार का?
एवरिथिंग दॅट टेस्ट्स गुड इज बॅड फॉर युअर हेल्थ!!! हे लक्षात असू द्यावे. मध्यंतरी क्रॉफर्ड मार्केट मध्ये रस्त्यावर मैद्याची रोटी खरपूस भाजलेली व चना खाल्लेले. अतिशय स्वस्त व टेस्टी.

अमा, धन्यवाद. मी ती जाहिरात पाहिली नाही आता तूनळीवर शोधून पहातो. हेमा मालिनी, रेखा, जिनत अमान, श्रीदेवी ह्या कलाकारांनी स्वतःला छान सुडौल ठेवले आहे Happy बहुतेक त्या ब्रेडस खात नसाव्यात Happy

मी इटालीमधे जेवढे ब्रेडचे प्रकार खाल्ले ते मला जास्त आवडले होते कारण त्यात गव्हाची एक चव लागायची. माझ्यामते ईटालीमधील ब्रेड्स जास्त छान असतात. सिंगापुरमधे तर ब्रेडचे अगणित प्रकार मिळतात आणि ही .. लाईन लागलेली असते पण खास बेकरीमधे जाऊन गरम गरम पाव आणता येतील अशा बेकर्‍या कुठेतरी दुर असतात. त्यात ही लोक बदकाचे अंडे घालतात. कोंबडीच्या अंड्याचा वास तरी ठिक आहे पण बदकाच्या अंडीचा वास घेऊन कसेतरीच होते. पुण्यात आमच्या बावधनमधेही छान मिळतात ब्रेड्स. लालसर मऊसर असतात.

अलिकडे मल्टीग्रेनचे प्रस्थ फार वाढले आहे. पण अशा ब्रेडमधील ग्रेन्स काढून जर पाव पाहिला तर तो मैद्यासारखाच असतो. त्यात सुधारणा नाही.

भारताप्रमाणे, मोरोक्को, पाकिस्तान, अरब देश इथे सुद्धा पोळी तयार केली जाते. पण आपल्याकडे पोळ्यांचे भाकरयांचे विविध प्रकार आहे तेवढे तिकडे नाहीत.

आमच्याकडे तर आई दर आठवड्याला ५ किलो कनिक दळुन आणते. मी जो आटा इथे विकत घेतो त्याची पॅकींग डेट आधीच ३ ते ४ महिन्यांपुर्वीएची असेअते आणि ते पिठ १ वर्ष वापरु शकतो असेही लिहिलेली असते.

तयार पिठाच्या ह्या अशा अनुभवांमुळेच मी सकस चे भाकरीच पिठ वापरतो. माझ्या भाकर्या मसत होतात.

आमच्याकडे तर आई दर आठवड्याला ५ किलो कनिक दळुन आणते.>> आईच्या हातच्या गरम पोळ्यांची सर कश्यालाही नाही.अनुमोदन. मी पुण्यात असताना आईला कणिक दळून आणून देत असे. तो पिठाचा वास अजून लक्षात आहेच. मला भाकरी येत नाही म्हणून मी थालीपीठ बनवते.

डेव्हिल वेअर्स प्रादा मध्ये मुलींना बारीक राहायचे फार टेन्शन अस्ते. एका मुलीची पॅरीस ट्रिप रद्द झाल्यावर ती बनपावावर झडप घालते, तो सीन आठवला. मिस कंजेनिअलिटी मध्ये पण तिला वजन कमी करायला पाव खाउ नको म्हणून सांगितले जाते.

माझे असेही ऐकण्यात आहे की भारतात म्हणे ब्रेडसाठी जी कणिक बनवतात त्यावर मजुर लोक पाय देऊन ती कणिक नरम करतात. मी चित्रही पाहिले होते.

दोन गोष्टी आहेत. पहिली स्वच्छता आणि दुसरी दर्जा. दर्जा थोडा कमी असलेला चालेल पण स्वच्छ्ता मला तरी मस्ट वाटते.

आपल्या भारतात अजूनही घरी ब्रेड बनवण्याची पद्धत नाही. पण युरोप अमेरिकेत लोक घरी ब्रेड बनवतात. अख्ख्या कनकेचा ब्रेड होतो का मला माहिती नाही.

आपल्या भारतात अजूनही घरी ब्रेड बनवण्याची पद्धत नाही. पण युरोप अमेरिकेत लोक घरी ब्रेड बनवतात. अख्ख्या कनकेचा ब्रेड होतो का मला माहिती नाही.>> होतो ना. इथे पण पाककृती आहेत.

कमर्शिअल ब्रेडमध्ये तो जास्त दिवस टिकाउ राहावा म्हणून जे केमिकल्स घालतात ते जास्त डेंजरस आहे. पण आपण असे किती खातो? ब्रेड खाणे सोडायचे आणि पोलुशन ने मरायचे असे होणार नाइतर.

थोडस अवांतर करतो... आपण जर पोळ्यामधे मल्टीग्रेन टाकलेत तर कसे होईल!? मला एकदा हा प्रयोग करुन बघायचा आहे. बहुतेक पोळ्या जाड लाटाव्या लागतील आणि तेल जास्त ओतावे लागेल.

माझे असेही ऐकण्यात आहे की भारतात म्हणे ब्रेडसाठी जी कणिक बनवतात त्यावर मजुर लोक पाय देऊन ती कणिक नरम करतात. मी चित्रही पाहिले होते.

>>> Rofl

माफ करा, हसु आवरले नाही. पण ऐकीव माहितीवर विश्वास ठेवलास, बी? आजकाल सर्रास २००-३०० किलो कॅपॅसिटीचे डोमेकर वापरले जातात कंपन्यांमधे. एका बेकरीत प्रत्यक्ष बघितल्यामुळे हे खात्रीने सांगु शकतो. Happy

विश्वास नाही ठेवला गिरिकंद. मी फक्त ऐकले आहे. आणि चित्रही पाहिले आहे. पण हे कितपत खरे आहे माहिती नाही. ब्रेड तर वरुन छान शुभ्र असते दिसायला.

बी, मल्टीग्रेन म्हणजे सरळ अख्खे दाणे घालत नाहीत तर वेगवेगळ्या धान्याचे जे पिठ असते त्याला मल्टिग्रेन आटा म्हणतात. गहु, नाचणी, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्ये दळून त्यांचे पिठ एकत्र केले की झाला मल्टिग्रेन आटा. याच्या पोळ्या नेहमीच्या पोळीप्रमाणे मऊसुत होणे जरा कठिण. आणि जर जास्त तेल ओतले तर मग हेल्दी ऑप्शनचे काय? मुळात हेल्दी म्हणुन आपण मल्टीग्रेन खातो ना?

http://vidhas-jg.blogspot.in/2011/03/multigrain-atta.html

इथे बघा मल्टिग्रेन आटा. या आट्याची पोळी अगदी मऊसुत होते असे लिहिलेय. एकदा करुन पाहायला हरकत नसावी Happy मी मल्टिग्रेनचे पराठे करते.

ब्रेड बनवण्यासाठी असलेल्या पिठात ग्लुटेनचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. मैद्यात ते असते पण नाचणी, ज्वारी, बाजरी इत्यादीत नसते. म्हणुन मल्टिग्रेन आट्याचा पाव करताना त्यात वरुन ग्लुटेन घालतात. मी इथल्या बाजारात रेडिमेड ग्लूटेन कधी बघितले नाही, त्यामुळे वापरले नाही आणि त्यामुळे मी केलेला मल्टिग्रेन पाव नेहमी जड होतो. बाजारातल्यासारखा मऊ लुसलुशित होत नाही. बाजारचे मल्टिग्रेन ब्रेड हे जास्त ग्लुटेन वापरुन केलेले असतात किंवा जर ग्लुटेन घातलेले नसेल तर मग ते मुल्टिग्रेनच्या नावाखाली मैद्याचेच असतात Happy

साधना,

मल्टीग्रेन म्हणजे भाजणीचे पिठ एक उत्तम उदाहरण होईल. इथे ब्रेडमधे मल्टीग्रेन म्हणजे त्यात सुर्यफुलाच्या बिया, रोल्ड ओट्स, जवस, अक्रोडाचे तुकडे असे अजून एकून ९ घटक असतात. त्याला मी मल्टीग्रेन म्हणत आहे ब्रेडविषयी बोलायचे झाले तर.

मस्त आहे तू दिलेली लिंक. त्यात तिने फुलका चौकनी केला आणि तो मस्त फुलला. बहुतक चौकनी फुलका कापयचे कटर असेल तिच्याकडे.

जर ब्राउन ब्रेड किवा होल विट ब्रेड (गव्हापासून) बनवलेला ब्रेड आपण रोज खाल्ला तर आपल्याला काही त्रास होऊ शकतो का?

मैद्याच्या/व्हाईट ब्रेडपासून जसे त्रास होतात तसे त्रास ब्राउन/होल विट (गहू) पासुन बनवलेला ब्रेड रोज खाल्ला की आपल्याला त्रास होतो का?

लहान मुले दिवसातुन चार वेळा जर खात असतिल तर त्यातल्या एका वेळी ब्रेड देण्यास हरकत नसावी. ब्रेड बरोबर काही फायबरयुक्त पदार्थ असावेत (भाजी, सॅलड किंवा फळ).

लहान मुलाना (वय < ५ वर्ष) ब्रेड द्यावा की नाही? >>

वेगळ्या पद्धतीने विचार करा. अमेरिकेची लोक संख्या ३०० + मिलियन, इंग्लंडची ६०-६५ मिलियन , जर्मनीची ७५-८० मिलियन, फ्रांसची ६० -६५ मिलियन . या देशात पाच वर्षाखालील मुलांना ब्रेड नक्कीच देत असतील. भारतात सुद्धा शहरी भागातली मुलं सुद्धा ब्रेड थोडा फार खात असतीलच. या देशात सरसकट ५ वर्षाखालील मुलांना ब्रेड देऊ(च) नये अशा प्रकारचे काही सरकारी, वैद्यकीय वा आहारशास्त्रीय गाइडलाइन्स ऐकिवात नाहीत. किंवा या देशात ब्रेड खाण्यामुळेच काही एपिडेमिक्स झालेले नाहीत. वाढती ओबीसिटी , वाढते टाइप २ डायबेटिस चे प्रमाण तर भारतात पण आहे. ते काय फक्त ब्रेड मुळेच ? बैठी जीवनशैली, प्रोसेस्ड फूड वर भर, सोडा आणि अतिरिक्त साखर वाले पदार्थ अशा सारख्या अनेक फॅक्टर्स मुळे नाही ?

संतुलित आहार, योग्य तितक्या फिझिकल अ‍ॅक्टिव्हिटी यावर भर असावा. अगदी रोज सर्व वेळ फक्त ब्रेड बटर भरवणार आहात का ? एखाद दिवशी ब्रेड - पीनट बटर, एखाद दिवशी पाव भाजी, असे द्यायला काहीच हरकत नाही

लहान मुलाना (वय < ५ वर्ष) ब्रेड द्यावा की नाही? >>

वेगळ्या पद्धतीने विचार करा. अमेरिकेची लोक संख्या ३०० + मिलियन, इंग्लंडची ६०-६५ मिलियन , जर्मनीची ७५-८० मिलियन, फ्रांसची ६० -६५ मिलियन . या देशात पाच वर्षाखालील मुलांना ब्रेड नक्कीच देत असतील. भारतात सुद्धा शहरी भागातली मुलं सुद्धा ब्रेड थोडा फार खात असतीलच. या देशात सरसकट ५ वर्षाखालील मुलांना ब्रेड देऊ(च) नये अशा प्रकारचे काही सरकारी, वैद्यकीय वा आहारशास्त्रीय गाइडलाइन्स ऐकिवात नाहीत. किंवा या देशात ब्रेड खाण्यामुळेच काही एपिडेमिक्स झालेले नाहीत. वाढती ओबीसिटी , वाढते टाइप २ डायबेटिस चे प्रमाण तर भारतात पण आहे. ते काय फक्त ब्रेड मुळेच ? बैठी जीवनशैली, प्रोसेस्ड फूड वर भर, सोडा आणि अतिरिक्त साखर वाले पदार्थ अशा सारख्या अनेक फॅक्टर्स मुळे नाही ?

संतुलित आहार, योग्य तितक्या फिझिकल अ‍ॅक्टिव्हिटी यावर भर असावा. अगदी रोज सर्व वेळ फक्त ब्रेड बटर भरवणार आहात का ? एखाद दिवशी ब्रेड - पीनट बटर, एखाद दिवशी पाव भाजी, असे द्यायला काहीच हरकत नाही

मला पाव आणि एकंदरच बेकरी आयटम खूप आवडतात.पूरणपोळी वाटीभर तुपात बुडवून खाणार्‍यांनी केक ला नावं ठेवली की केस उपटण्याइतका त्रास होतो. 'आमी चोर हाय पण तुम्हीबी साव नाय' असं काहीसं वाटतं.
त्यामुळे 'पाव पूर्ण बंद' वगैरे न पाळता 'घरात कमीत कमी वेळा आणणे' इतकेच पाळते.घरी चांगला होल व्हिट ब्रेड बनवता आल्यास जास्त वारंवारतेने खाईन.

मलाही ब्रेड अतिशय आवडतो...विशेषतः सँडविचेस! आणि तेलकट ऑप्शन्स पेक्षा ब्रेड कधीही चांगला वाटतो.
आतातर ब्रेड ने कँसर होतो असे म्हणतात. त्यात कितपत तथ्य आहे?
होल व्हीट अथवा साधा...ब्रेड आठवड्यातून एकदा तरी हवाच..........

खावा की नाही ब्रेड! घरी करण्याची एखादी हातखंडा कृती माहिती ए का कुणाला?

ब्रेड हा खरेच होल व्हिट ब्रेड आहे हे कसे तपासता येईल?
साध्या डोळ्यानीही त्यातला कोंडा दिसतो ( धान्याची टरफले पण दिसतात. ) असा ब्रेड पोताला मऊसूत लागत नाही,
जरा कडकच राहतो. पण कडकपणा हा निव्वळ मिश्रपिठ वापरून येत नाही. फ्रेंच ब्रेड, बगेत पण कडकच असतो, पण त्यात फॅटचे प्रमाण खुपच कमी असते, म्हणून तो कडक असतो.
आपल्याकडे पावावर घटक लिहिलेले असतात ना ? असल्यास ब्राऊन ब्रेड वरचे घटक बघा बरं. खुपदा तो रंग
कॅरेमल नी आलेला असतो. असा ब्रेड फक्त रंगाने बाऊन दिसतो.
ब्रेड टिकण्यासाठी त्यात थोडे व्हिनीगर घालतात ( नाहीतर लवकर बुरशी येते ) तसेच खुपदा कॅल्शियम पण
घातलेले असते.

ब्रेड मधे केवळ मैदा आहे, किंवा तो भारताबाहेरून आला म्हणून वाईट मानू नये. ( यीस्ट ची अ‍ॅलर्जी मात्र असू शकते कुणाकुणाला )
मैद्याला इतर गोष्टींची जोड देता येते.
आणि आंबवण्याची प्रक्रिया वापरून आपल्याकडे कितीतरी प्रकार केले जातात.
ईडली, डोसा, नान, भटूरे, आंबोळ्या, साल पापड्या, कुरड्या...पासून ते थेट आसवं ( द्राक्षासव, कुमारीआसव ) !

आतातर ब्रेड ने कँसर होतो असे म्हणतात. त्यात कितपत तथ्य आहे? >> पी हळद अन हो गोरी ही म्हण बदलून ' इट ब्रेड , से हेलो टू कॅन्सर' अशी करावी काय ?

असे म्हणतात >> कोण म्हणतात ? कशाचा आधारवर ? कशा प्रकारचा कँसर ? ब्रेड मधला नक्की कोणता घटक कार्सिनोजेनिक आहे? कुठल्या देशात, किती लोकांच्या जेवणखाणाची, राहणी मानाची मोजणी करुन हे निष्कर्ष काढले त्या म्हणणार्‍यांनी ?

ब्राऊन ब्रेड बद्दल सहमत दिनेशदा.तो ब्राऊन बरेचदा कॅरेमल ने बनतो आपल्या इथे तरि.
परदेशात मात्र होल व्हिट ऑप्शन्स खरोखर थोडे कडक आणि चवीला वेगळे पाहिले आहेत.मला तो वरुन कडक आतून थोडा मऊ ब्रेड खूप आवडायचा.(बगेत इतका मोठा नाही पण छोटा लांबट, आपल्या सबवे ब्रेड सारखा.)

काही ऑर्गनिक प्रॉडक्टस कंपनींचे होल व्हिट ब्रेड आणि रागी ब्रेड मिळतात. ते २-३ दिवसच टिकतात म्हणुन ७-८ मध्यम आकाराच्या स्लाईसच्या छोट्या पॅकेटमध्ये मिळतात. पण हा होल व्हिट ब्रेड परदेशातील कडक होल व्हीट ब्रेड सारखा नाही, पण मैद्याच्या ब्रेड एवढा मउ पण नाही. चव होल व्हीट सारखी आहे. रागी ब्रेडला विशेष चव अशी नाही.

हल्ली ब्रेड आनि बाकी बर्याच पदार्थन्मध्ये "हाय फ़्रुक्टोस कोर्न सीरप" असते, त्याबद्दल काय मत आहे?
असे वाचण्यात आले होते की, ते आपले शरीर नीट पचवु शकत नाही आणि मग ते मेदाच्या रूपात साठून राहते...खरे आहे क?

Pages