||तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 7 February, 2015 - 10:23

||तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम||
( चाल--- जहा डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा )

हे गुणी मानवा करू नकोरे भलते सलते काम
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम.
तू जन्म घेतला स्व कल्याणा आता न दुसरे काम
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम .||धृ ||

हा देह मिळाला जरी तुला हे नव्हे तुझे निजधाम
दुष्कृत्य न करावे मनी धरावे श्री हरी चे नाम ,श्री हरीचे नाम
अगाध महिमा नामाचा तू जाणून घेरे नाम
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम.

हे विश्वची अवघे मायाजाळ इथे नित्य फुटतो घाम
मर मर करशी जीव हि देशी मिळते न शांतीचे धाम , मिळते न शांतीचे धाम
पै पै करुनी जमवशी , मग व्यर्थ का देशी दाम
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम.

भोग हे देहाचे न चुकले कोणी असो घनशाम
जरी मनमानी वापरले तू दाम दंड आणि साम . दाम दंड आणि साम
पुन्हा पुन्हा तू येणे करशी आणिक होशी जाम ,
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम.

जगी उद्धरले जन अवघे जे निश्चयी होते ठाम
नामस्मरणानेच मिळेल तुला खरा आराम ,तुला खरा आराम ,
झाले गेले विसरून जा रे होऊ नको बेफाम
तू बोल जय श्रीराम ,श्री राम जय जय राम.

|| जय श्री राम ||

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users