गुरु बंधू येता घरा ................

Submitted by विनायक. दि.पत्की. on 7 February, 2015 - 10:20

गुरु बंधू येता घरा ....

गुरु बंधू येता घरा,
तोची दिवाळी दसरा.
गुरु सेवेत सर्व विसरावे
सेवेचेच जाळे सर्वत्र पसरावे

गुरुचे रूप तुम्ही असता
न कळत गुरूंचा सैदेश देता
समस्यांवर मार्ग हि दाखवता
आणि सांभाळता शरणागता

एक नवे वळण हि देता
समस्यांशी हि जुळवता
सहजच चूक कळवता
कळीकाळाचे भय पळवता

सानिध्याने स्फुरण चढते
माझे मी पण गळून पडते
अंतर्मनास दर्शन घडते
सेवेस पाउल कोठे न अडते

षड्रिपू आमच्या मनी नसावे
अनुसंधान मनी वसावे
सर्वातच तुम्ही मला दिसावे
गुरुवर्या नित्य येत असावे

|| जय श्री राम ||

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users