Submitted by विनायक. दि.पत्की. on 7 February, 2015 - 10:14
प्रयत्नांती परमेश्वर (राम कर्ता )
मंदिरात येणारे सर्व
भाविक असतात असे नाही
नावेत बसणारे सर्व
नाविक असतात असे नाही
गाणे गाणारे सर्व
गायक असतात असे नाही
पुढारी पण करणारे सर्व
वि(नायक) असतात असे नाही
शाळेत जाणारे सर्व
शिकतील असे नाही
बाजारात बसल्यावर सर्व
विकतील असे नाही
नौकरी करणारे सर्व
बढतील असे नाही
सैन्यात जाणारे सर्व
लढतील असे नाही
घरून निघणारे सर्व
घरी परत येतील असे नाही
यश मिळवणारे सर्व
दारी चरत जातील असे नाही
खाल्लेले सर्व
पचेल असे नाही
बोललेले सर्व
रुचेल असे नाही
स्मार्ट फोन वापरणारे
स्मार्ट असतील असे नाही
आंबट आवडणारे सर्व
आंबट शौकीन असे नाही
काहीही असले तरी
कोणावाचून कोणाचे अडत नाही
जेवताना सावधतेनेच
पोटाला ताण पडत नाही
वि(नायक) .दि .पत्की
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ओघवत्या भाषेत मार्मिक
ओघवत्या भाषेत मार्मिक निरिक्षण एकदम पटले