संयुक्ता विजेट कोड व फेसबुक पान

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 February, 2015 - 07:08

नमस्कार मायबोलीकर,

संयुक्ताद्वारे आजपर्यंत मायबोलीवर अनेक समाजाभिमुख, चर्चात्मक व स्त्रियांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहेत. माहितीजालाच्या जगतात या उपक्रमांबद्दल एकत्रित स्वरूपात वाचता यावे यासाठी 'संयुक्ता' विजेट कोड आणि 'संयुक्ता' फेसबुक पान हे दोन उपक्रम अंमलात आणले गेले. आज ते आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.

१. संयुक्ता विजेट कोड

संयुक्ता विजेट कोड संयुक्ता सदस्य आणि मायबोलीकर आपल्या अनुदिनीवर झळकवू शकतात. विजेट कोड टाकल्यावर तुमच्या अनुदिनीवर 'संयुक्ता'ची छोटी प्रतिमा दिसेल. हा दुवा वाचकांना संयुक्ताच्या मायबोलीवरील मुख्यपृष्ठावर घेऊन जाईल. सर्व प्रकारच्या अनुदिनींवर हा विजेट कोड लावता येईल. विजेट कोड संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास मायबोली व्यवस्थापनाशी संपर्क साधावा किंवा याच धाग्यावर लिहावे ही विनंती.

विजेट कोडः
<a href="http://www.maayboli.com/sanyukta" title="sanyukta">
<img src="http://cdn1.maayboli.com/files/u28443/sanyukta.jpg" width="100%" height="100%" />
</a>

२. संयुक्ता फेसबुक पान

संयुक्ता फेसबुक पान इथे आहे. मायबोलीचे व्यवस्थापक या पानाचे मुख्य व्यवस्थापक आहेत. या पानाचा साधारण तोंडवळा संयुक्ताचे मायबोलीवरील मुख्यपृष्ठ दिसते तसाच आहे. 'संयुक्ता'मधले सार्वजनिक उपक्रम, वेगवेगळ्या क्षेत्रांमधील यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती, महिलां विषयक बातम्या, नवे-जुने कायदे अशा काही गोष्टी या पानावर देण्याचा प्रयत्न राहील. हे पान संयुक्ताचे एक प्रकारे 'सोशल नेटवर्किंग'च्या जगातले मुखपत्र आहे. 'संयुक्ता' ग्रूपमधील सार्वजनिक धाग्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरूपात पाहावयास मिळतील.

आशा आहे हे दोन्ही उपक्रम आपल्याला आवडतील आणि 'संयुक्ता'ची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यास हातभार लावतील.

धन्यवाद!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users