कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

Submitted by निमिष_सोनार on 6 February, 2015 - 10:20

स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
अधून मधून चाणक्यला स्वप्नातून किंवा शकून म्हणून दर्शन देणारा आणि मार्गदर्शन करणारा सिंह (सम्राट चंद्रगुप्ताचा आत्मा) ही संकल्पना झकास जमून आलीय.
तसेच चाणक्य मेल्यानंतर बहुतेक त्याचा आत्मा सूत्रधारा सारखा त्याची "चाणक्य नीति" आपल्याला सांगत राहाणार आणि गोष्ट पुढे नेणार असे वाटते आहे, जसे कृष्ण महाभारतात सांगायचा तसेच! अर्थात अजून सिरीयल मध्ये चाणक्य जिवंत आहे.

नितीन देसाई चा सेट छान आहे. पुन्हा एकदा!
श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत.
स्पेशल इफेक्ट छान आहेत.
थोडे नाट्य जास्त आहे पण ठीक आहे, त्याने मनोरंजन मूल्यही वाढते आणि सोबत आपल्याला अशोकाची जीवनकथा सुद्धा कळते.
यात शुद्ध हिंदी बोलणारी जर्मन अभिनेत्री सुद्धा आहे ,जिने हेलेना चे काम केले आहे.
हेलेना हि सेल्युलस निकेटर ची मुलगी आणि चंद्रगुप्त मौर्य ची पत्नी. बिंदुसार ची सावत्र आई. सेल्युलस निकेटर हा अलेक्झांडर चा सेनापती असतो. खुरासन नावाचे एक पात्र आहे जे नूर या आपल्या मुलीचा विवाह बिन्दुसार शी करून मगध हडप करण्याच्या मार्गावर असतो.

आतापर्यंत ची कथा:

हेलेना आपल्या जस्टीन या मुलाच्या मदतीने बिंदुसारला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. शुभ्रदंगी त्याला वाचवते जिच्याशी लग्न करून बिंदुसारला काही कारणास्तव पुन्हा मगध मध्ये परतावे लागते . बिन्दुसार ला त्याचेवर हल्ला कुणी केला/करवला हे कळत नाही. मगध चा राजा जस्टीन ला बनवण्याचे तिचा डाव फसतो. दरम्यान चाणक्यवर बिंदुसार च्या आईवरच्या विष प्रयोगाबद्दल शंका घेतली गेल्याने तो दूर राहून अर्थ शास्त्र लिहितो. शुभ्रदंगी चा मुलगा अशोक मोठा होतो. दरम्यान एका युद्धात जखमी झाल्यावर बिंदुसार वर उपचार चालू असताना पुन्हा हेलेना त्याचेवर विषप्रयोग करते....

दरम्यान चाणक्य असे योगायोग घडवून आणतो की शुभ्रदंगी चा बिंदुसार बद्दलचा गैर समाज दूर व्हावा (जो खुरासन या राज्यकर्त्याने निर्माण केला असतो - तिला आणि पोटातल्या अशोक ला मारण्याचा प्रयत्न बिन्दुसारच्या नावे करून!) आणि तिचा मुलगा अशोक हा सम्राट व्हावा.....!!!

सर्वांनी ही मालिका बघावी अशी माझी इच्छा आहे. विनंती आहे.
बाकी आपली मर्जी.
जे बघतील त्यांनी आपली मते मतांतरे येथे मांडावीत ही अपेक्षा!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार मोठे षडयंत्र कसं उलगडतात चाणक्य ते बघायला आवडेल.

चाणक्य आणि छोटा अशोक दोघांचा अभिनय आवडला.

शैलेश दातारचा रोल मात्र संपला. लहान होता तसा हा रोल.

निमिष्_सोनार, लेखाच्या शीर्षकाशेजारी 'संपादन'वर क्लिक निवडा. तळाला 'वाचकवर्ग' अंतर्गत वेगवेगळे गट दिसतील. तुम्ही इतिहास निवडलेला दिसेल. तो बदला.

चला फारच हळू हळू चाललेली मालिका, आता वेग घेतेय का बघायचं.

फायनली बिंदुसार राजाच्या समोर राणी धर्मा आणि अशोक ह्याचं सत्य समोर आलं आणि त्याला आपला अजून एक मुलगा आहे आणि तो अशोक आहे हे समजलं.

होना ! आता परत योग्य वेळेची वाट पाहाणे आलेच, सत्यकथनासाठी.
कधी एकदा पूर्ण कुटुंब भेटेल देव / [writer] जाणे!

.

Pages