भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

Submitted by नंदिनी on 6 February, 2015 - 04:17

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!

खरंच ही बातमी वाचून बरं वाटलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. आयाम कोसला फॅन.>>>+१.
विशीत ते वाचल्यामुळे ते भारावून वगैरे झाले होते.पण त्यानंतरचे जरीला,बिढारवाचले पण त्यावेळी कळले नव्हते.आता परत वाचून पहायला हवे.

नेमाडे सरांचे अभिनंदन. समस्त मराठीजनांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. नेमाडे सरांचे लेखन नि नेमाडपंथ हा खरोखरच अभ्यासण्याचा विषय आहे.

नेमाड्यांना पुरस्कार मिळाला यापेक्षा एका मराठी लेखकाला तो मिळाला याचा मला जास्त आनंद झालाय.

आज हयात असलेल्या कुठल्याही मराठी साहित्यिकाला तो मिळाला असता तरीही मला तितकाच आनंद झाला असता.

बाकी नेमाड्यांची मी फक्त कोसला वाचलीय. पण बहुतेक ती खुपच उशिरा वाचल्याने ती तितकीशी आवडली नाही पण ठिकाय.

हिंदू वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काही माबोकर समिक्षकांच्या मते वाचनीय आहे त्यामुळे ज्ञानपिठानिमित्त परत एकदा प्रयत्न करुन पाहिन. Happy

छान.

या आधी पाळला गेलेला नियम मोडला.

वि स खांडेकर

वि वा शिरवाडकर

विन्दा करंदीकर

सगळी नावे वि **** कर या फॉर्म्युलात असायची.

आम्ही नाही वाचलेली साहीत्यसंपदा, एखादं वाचलं असेल तर नाही आवडलं, पण अभिनंदनाला चुकणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.

लोकहो,

संतोषजनक बातमी आहे.

यानिमित्ते भालचंद्र नेमाड्यांचं एक विधान नीट समजून घ्यायला पाहिजे :

>> 'िहदू'तला खंडेराव परंपरेच्या परिघाचे समर्थन करतो हे मी कादंबरी लेखनाचा सुरक्षित परीघ ओलांडल्यावरच
>> लिहू शकलो,

परीघाच्या बाहेर राहिल्याने बहुधा वाताहात होत असावी. हाच न्याय धर्मचौकटीस लावावा का?

आ.न.,
-गा.पै.

गापै
ऑनलाईन लोकसत्ता मधे बॅकग्राउंड कलर रेड येतोय की माझ्याकडेच हा प्रॉब्लेम आहे ? त्यामुळे ऑनलाईन अंक वाचणे कठीण आहे.

मराठी लेखकास पुरस्कार मिळाला एवढीच यात समाधानाची बाब आहे. नेमाडे नावाच्या व्यक्तीस मिळणे ही फारशी स्वागतार्ह बाब नाही आणि त्याला तेच जबाबदार आहेत. इच्छुकांन्नी त्यांची पुरस्काराबद्दलची, साहित्य सम्मेलनाबाबतची , आणि जुन्या पुरस्कारविजेत्याबाबतची मते मिळवून वाचावीत... उद्या ते साहित्य सम्मेलनाध्यक्ष पदाच्या घोड्यावर बसायला कमी करायचे नाहीत. सगळ्याच नेमाडपंथी साहित्यिकाचे ते वैशिष्ट्य आहे त्याना सन्मान मिळेपर्यन्त ते त्याला शिव्या घालत असतात....

रॉबिनहुड<<<< १००००००००००००००००००००००००००००००००............................................................n

वेळा सहमत मी आपल्याशी
मुलाखतही ऐकली काल त्यांची निव्वळ असंतोषी माणुस ...म्हणे यंदाचं साहित्यसम्मेलन शेवटचं आहे असंत्या लोकांनी जाहीर करावं मग जाईन मी ..........अरे मरा ना ज्यांना जगायचं नसेल त्यांनी! लोकाना काय मरायला सांगताय ???
खूपच कमी पातळीचा माणूस वाटला मलातरी
प्रत्यक्ष भेटला तर चांगला खडसावीन त्या माणसाला मी !!!!!

इथे अरेरे. किंवा, इथे तिथे, "नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे शक्ती कपूरला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासारखे आहे." असे बोलणार्‍या लोकांसाठी खुशखबर!

"सल्मान रश्दी" यांनी तुमच्याप्रमाणेच नेमाडे बिमाडेंवर टीकाबिका केलिये. ती टीका अर्वाच्य बिर्वाच्य शब्दाबिब्दांत आहे असं झी २४तास वाले म्हणताना जस्ट ऐकले ब्वा.

हाहाहा !! आभार सर्वांचे
माझे गझलेचे वेड पाहून मला माझा एक मित्र वैभव खुळ्कर्णी म्हणतो ते आठवले Happy

@चेतन गुगळे कोटिशः आभारी आहे मी आपला ह्या लिंक बद्दल
सर्वांनी आवर्जून वाचावा असा लेख आहेतो !!! वाचाच दोस्तों
माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे की नेमाडेंना हा पुरस्कार मिळाला म्हणून ज्यांना मनःपूर्वक खेद आहे त्यांनी -त्यात मी ही आहेच -सर्वांनी अशी एखादी स्वाक्षरी मोहीम काढता येइल का की पुरस्कारार्थींची निवड करणार्‍या समीतीला तिचा विचार बदलता येइल ..म्हणजे अर्थातच तसे काही होण्याची शक्यता आणि कालावधी आता उरला असेल तर

मी खरोखर सीरीयस आहे ह्याबाबत !

माझे हे वैयक्तिक मत कोणाला आक्षेपार्ह वाटेल त्या सर्वांची ह्या सार्वजनिक ठिकाणी मी व्यक्तिगत माफी मागत आहे ..पण क्षमस्व !

हुडा, तुझं नेमाड्यांबद्द्लचं मत माहिती आहे. मात्र वरची टिप्पणी 'तुझी' वाटत नाही. मराठी लेखकाला मिळाला म्हणून ठीक आहे- हे उदाहरणार्थ फारच भंपक आहे हे तुला लिहिल्यावर लगेच जाणवलं का? बंगाली आणि कन्नड आणि इतर 'तुमचे' नाहीत का?

ज्ञानपीठ 'साहित्यासाठी' असतं, वाचाळपणासाठी नाही. त्यांचं बोलणं ही वेगळी गोष्ट आहे. त्याबद्दल मलाही बरेच इश्यूज आहेत. मात्र तीही त्यांची लीडरशिप आणि पुढे राहण्याच्या स्ट्रँटेजीचा भाग होता- असा संशय आल्यावर त्यांना माफ करून टाकलं! पण ते म्हणजे फारच क्षुद्र. इतका ह्युज लेखक (कुणी कितीही काहीही म्हणलं तरी झालाच तो आता! :फिदी:) असं काही तरी करेल, याची भरपूर शक्यता असतेच की नाही?! की मराठी सोडून इतरच लेखकांनी फक्त राजकारणं करावीत..?

साहित्याबद्दल बोलशील तर पुढे बोलू. नाहीतर तुझा लिंब्यासारखाच लिंबुटिंबुअनुल्लेख. Proud

मी नेमाडेंचे साहीत्य वाचलेच नाहीय पण आत्ता नक्की वाचणार आहे.
त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाला? ते तरी समजेल.
त्यांच्या साहित्यात काय आहे कुणी लिहणार का?

त्यांच्या साहित्यात परात्मभाव असतो म्हणे ! 'कोसलाबद्दल ' हे समीक्षेचे पुस्तक वाचा त्यासाठी.
साजिर्या सांगू शकेल....त्याने भारावून जाऊन खंडेराव नावाचा तात्पुरता आय डी ही घेतला होता पुपु वर ::फिदी:

रश्दीला बुकर पुरस्कार मिलाला होता तेव्हा ह्यांनी तिरसट कॉमेन्ट केल्या होत्या त्यावर. त्या व्याजा सकट परत आल्या आहेत.हे लेखक लोकं फारच हलकट असतात हो !

साजिर्‍या , मला साहित्याबद्दल बोलायचे नाही त्यात मला कळत नाही .त्यामुळे अनुल्लेख केला तरी चालेल. मला व्यक्तिद्वेष आवडतो. माणसाच्या मेंदूत आणि हृदयात जे असते ते आपसूक ओठावर येते असे मला वाटते.

@रॉहू

ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या साहित्याला मिळालाय. त्यात प्रामुख्याने त्यांच्या कादंब्र्या (कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू), दोन कवितासंग्रह आणि टिकासंग्रह. त्यातील टिकास्वयंवरमध्ये प्रामुख्याने तू म्हणतोस तशी साहित्यिक राळ उठवलेली आहे. मी त्यांची भाषणे, वर्तमानपत्रांत ते देत असलेल्या मुलाखती वगैरे बाजूला ठेवतोय कारण त्याला पुरस्कार देताना किती वजन दिले आहे ते माहिती नाही.
देशीवाद ही एक संकल्पना त्यांनी मांडली, रुजवली, तिला परिभाषा दिली. हे एक महत्त्वाचे काम आहे. मग तुम्हाला / आम्हाला तो वाद पटो अथवा न पटो. हीच बाब त्यांच्या साहित्याबाबतदेखील. तुला/अनेकांना ते आवडत नसले तरी नेमाड्यांनी एक शैली रुजवली, मराठी साहित्याला खणखणीत चार कादंब्र्या दिल्या. केवळ किती प्रसवले हाच निकष असेल तर बाबुराव अर्नाऴकर ते गुरुनाथ नाईक ते सुमती क्षेत्रमाडे आणि कित्येक अनेक लेखक/लेखिका नेमाड्यांपेक्षा सरस ठरतील. मायबोली आणि आंतरजालावर ब्लॉग्ज लिहिणारेदेखील कित्येक जण.

ज्ञानपीठ पुरस्कार अजूनपर्यंत तरी 'उत्तम' कार्य केलेल्या लोकांना देण्यात आला आहे. त्यातही राजकारण होत असेल. पण फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारात जसा किमान फरक आहे त्याप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्काराला वजन आहे हे सामान्यांना वाटते.

नेमाड्यांनी पुरस्कार स्वीकारू नये असे मलाही वाटते. ते त्यांनी आजवर केलेल्या वक्तव्यांशी फटकून असेल. पण तो नेमाड्यांचा प्रश्न आहे. लेखक/नट/नाटककार/कवी हा खाजगी आयुष्यात काय करतो याच्यावर मी तरी त्याचे साहित्य मोजत नाही. हां, मी त्याला माणूस म्हणुन जी मोजपट्टी लावेन ती त्याच्या/तिच्या वर्तणुकीवर असेल. पण हा पुरस्कार त्यासाठी नाही हे तुलाही मान्य असेल.

विनय हर्डीकरांच्या लोकसत्तातील लेखांत हाच गुंता आहे. बिढार मधला चांगदेव पाटील विंदा/शिरवाडकरांना शिव्या घालतो म्हणजे नेमाडेपण त्यांना शिव्या घालतात असा अजब तर्क त्यांनी लढवला आहे (टीकालेखात नेमाड्यांनी त्यांना शिव्या घातल्या आहेत असे म्हणाले असते तर बरोबर ठरले असते). म्हणजे शक्ती कपूर, प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, रणजीत हे बलात्कारी प्रवृत्तीचे लोक आहेत/होते असे म्हटल्यासारखे झाले. दुसरे म्हणजे नेमाड्यांनी जरी या सर्वांना शिव्या घातल्या असतील तरी त्याचा नेमाड्यांना ज्ञानपीठ मिळण्याशी काय संबंध?

वर अरेरे वगैरे म्हणणार्‍या अनेकांनी विंदा, कुसुमाग्रज्/शिरवाडकर व खांडेकर किती वाचले आहेत? त्यांच्या व नेमाड्यांच्या साहित्यात तुम्हाला काय फरक जाणवतो की ज्यायोगे या तिघांना ज्ञानपीठ मिळणे न्याय्य व नेमाड्यांना मिळणे अन्याय्य होते?

वर अरेरे वगैरे म्हणणार्‍या अनेकांनी विंदा, कुसुमाग्रज्/शिरवाडकर व खांडेकर किती वाचले आहेत? त्यांच्या व नेमाड्यांच्या साहित्यात तुम्हाला काय फरक जाणवतो की ज्यायोगे या तिघांना ज्ञानपीठ मिळणे न्याय्य व नेमाड्यांना मिळणे अन्याय्य होते? >>> +१०००

नेमाडेंचे अभिनंदन!

कोसला कॉलेज मधे असताना वाचली होती व आवडली होती. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचताना कंटाळा आला. त्यामुळे बाकीची वाचली नव्हती.
तर लोकहो एक सांगा - 'हिंदू' वाचण्याआधी ही बाकीची वाचणे आवश्यक आहे का (शैलीची माहिती करून घेण्यासाठी)?

नेमाडेंची काही अचाट वक्तव्ये वाचली होती पण त्यांच्या लेखनाच्या दर्जाशी किंवा ते आपल्याला आवडण्याशीही त्याचा संबंध लावायचे कारण नाही.

फारेण्डा,
ही अचाट वक्तव्यं आणि तपशिलांच्या गफलती त्यांच्या कादंबरीचा भाग बनून येतात, तेव्हा गोंधळ होतो.

अच्छा, मी कोसलाच्या पुढे फारसे वाचलेले नसल्याने त्याची कल्पना नव्हती. मग लोकांच्या प्रतिक्रियांमधे ते मिक्स का होते ते समजले.

हिंदू ही एक वेगळी चार पुस्तकांची सिरीज असणार आहे असे वाचले. ती शैली व आधीची कोसलाने सुरू होणार्‍या सिरीज ची शैली सारखीच आहे का?

साजिर्‍याने आधी रसग्रहणात लिहीलेले व खंडेराव या आयडीने लिहीलेले वाचून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे हिंदू वाचण्याची.

नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. >>+१

टण्या ह्यांस अनुमोदन.

काल ते फारच मते व्यक्त करतात. त्यांची लोकप्रियता पुलंच्या मानाने फारच कमी आहे. असे एक स्टेटस वाचनात आले. मन उदास झाले. नेमाडे न वाचलेले देखील किती लोक आहेत. एक लेखकच कायम सर्वगुण संपन्न असावा असे समाजाला का वाट्ते कोण जाणे. त्याणे फक्त समाजाला पचेल रुचेल ते लिहावे. भाराभर पुस्तके विकावी आणि मते व्यक्त न करता चूप बसून पुढील निर्मिती करावी अशी मानसिकता आहे.

हुडा, लेखक लोकांनी हलकट का असू नये? तीही आपल्यातुपल्यासारखी माणसंच आहेत की. मात्र ज्ञानपीठासारखे पुरस्कार व्यक्तीद्वेष किंवा व्यक्तीप्रेमावरून दिले जात नसावेत. बाकी उत्तर टण्याने दिलं आहे, आणि त्यानंतर बोलण्यासारखं काही राहिलेलं दिसत नाही..

फारेंडा, 'आवश्यक' असं काहीच नाही. पण नेमाड्यांच्या शैलीचं आणि त्यांच्या काहीतरी मांडण्याच्या स्फोटक पद्धतीचं व्यसन लागलेले चांगदेव चतुष्ट्याला 'हिंदू'पेक्षाही डोक्यावर घेतात, पुन्हापुन्हा वाचतात. चांगदेव पाटील हा व्यवस्थेत राहून छोटीमोठी वैचारिक किंवा प्रत्यक्ष बंड करत होता. हिंदूचा खंडेराव हा बंडखोर राहिलेला नाही. तो इथं तत्त्वचिंतक झाला आहे. बंडापेक्षा पदरात पडलेलं अवकाश कवेत घेण्याची, समजून घेण्याची ऊर्मी खंडेरावात आहे.

'हिंदू' आधी वाचायची असेल, पण त्याआधी चांगदेव थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर इथंच टण्याने दिवाळी अंकात लिहिलेला लेख वाच. टण्याच्या पहिल्या पोस्टीत त्याची लिंक आहे.

***

नेमाड्यांनी हा पुरस्कार स्विकारावा असं मला वाटतं. आणि ते स्वीकारतील- असंही वाटतं. नैतिक अधिष्ठानं वगैरे ठीक आहे, पण लेखकाच्या साहित्यव्यवहाराला जास्त महत्त्व आहे. त्याला राजाश्रय, जनाधार आणि विशिष्ठ प्रकारची ऑथेंटिसिटी मिळणं महत्वाचं आहे. आपला लेखक भाषा आणि प्रांतांच्या पलीकडे पोचण्यासाठीही ते फार महत्त्वाचं आहे. चार रविवारच्या पुरवण्या अशा तशा उलट सुलट लेखांनी भरून येणारच आहेत. पण त्या ज्ञानपीठ स्वीकारल्याने भरून आल्या तर मला जास्त चांगलं वाटेल. नाकारल्यानेही गदारोळ होणारच आहे, आणि 'आपला उग्रलेखकरावचेहरा आणखी उग्र करण्याचा हा नेमाड्यांचा प्रयत्न आहे' अशी टीका होणार. त्यापेक्षा ते स्वीकारून आपल्यातल्या लेखकाच्या भव्यपणाला आणि वैश्विकतेला झळझळीत पावती मिळाल्याचं दाखवून देणं जास्त आवश्यक आहे. लेखकांना 'लाडकं' करून डोक्यावर नाचवण्याची सवय असलेल्या महाराष्ट्रातल्या एका लेखकाला हे 'उच्चासन' मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यासाठीही.

Pages