निरवानिरव
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
35
रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं
आणि सुरु होते
शेवटची निरवानिरव
जड वाटतात तेंव्हा
मोठ्या जिकरीने
साठवलेल्या ..
संग्रह केलेल्या
गाठोड्यात बांधून ठेवलेल्या
ठेवणीतल्या
वस्तू..
गजबजलेल्या संसाराचं
रिक्त..रिकामं चित्रं!
निर्जीव वाटायला लागतात
त्यावेळेसचे ते सर्व क्षण अन क्षण
काहीच उरलेलं नसतं
उरलं असतं
एक न पेलणार ओझं
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!
जिवाला जड झालेल्या वस्तू
आणि जड झालेला जिव
दोन्हीच्या त्यागातंच
आयुष्याची निरवानिरव होऊन जाते!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
खूपच आवडली. ही निरवानिरव
खूपच आवडली.
ही निरवानिरव भावना, प्रत्येक नवीन जागी मूव्ह होताना, जुनी नोकरी सोडून जाताना.... इतकंच कशाला भारतवारीहून निघताना अन्नेक वेळा.. काही जवळच्या व्यक्तींकडून वयोपरत्वे जाणवलीच आहे. मनापासून ती भावना त्या क्षणी त्रास देणारी असली तरी एक मस्त फिलिंगपण असतंच. खूप आठवणी जगवाल्यास. धन्यवाद.
वॉव दक्षिणा आणि अमितव खूपचं
वॉव दक्षिणा आणि अमितव खूपचं सुंदर प्रतिक्रिया लिहिली तुम्ही दोघांनी. मला जे नीट मांडता आले नाही ते अतिशय सुंदर शब्दात मांडले. धन्यवाद.
छान कविता.
छान कविता.
बी त्याचा अर्थ साती आणि
बी त्याचा अर्थ साती आणि सृष्टी म्हणताहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. तुमच्या कविता करण्याबद्दल नाही. आणखी सविस्तर प्रतिसाद इतक्या चांगल्या कवितेवर अवांतर होईल म्हणून थोडक्यात लिहायचा प्रयत्न केला. पुलेशु.
रोजची दुपारची..
रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं>>> कवितेची सुरवातच मन जिंकून घेते शब्द छान मिळालेत तुम्हाला ...
.... कविता चांगली झालीय .
Pages