येशील का रे ? (स्फुट)

Submitted by मी मी on 3 February, 2015 - 11:14

पूर्वी तुलाच शोधत असायचे तुझा शोध पहिला इतर सर्व नंतर
तू पूर्ण हवास अगदी हक्काचा … वेडा हट्ट … पण
तू माझ्या आयुष्यातला तुझा वावर कमी केलास, हळूहळू अबोला
आणि एक दिवस पूर्ण दुरावा …
मी तीळ तीळ तुटत राहिले … तरीही
माझ्या लेखी तुझा शोध संपला नाही. …
तू पूर्ण निघून गेल्यावर मी शोधत राहिले तुझ्यातला अंश
कुणात तरी दिसेल … कदाचित
मग तुझा प्रत्यक्ष शोध संपला आणि सुरु झाला शोध तुझ्या अंशाचा
तुझ्यासारखे वागणे कि दिसणे किंवा मग तुझ्यासारखेच बोलणे
कुणात तरी दिसशील तू कुठेतरी भेटशील तू … दिवसेंदिवस शोध वाढत राहिला
तुझे वेगवेगळे अंश मला भेटत होते माझ्या जवळ येत होते … आणि
त्यात तू प्रत्यक्ष मात्र अंश अंश हरवत राहिलास
तू इतका दूर निघून गेलायेस कि आता दिसेनासाच झालायेस
आणि मी वेडी तुझे एक एक अंश जोडून पुन्हा पुन्हा तुला सांधू पाहतेय
मी तीळ तीळ तुटत … तुला तीळ तीळ शोधून जोड्तेय.
अजूनही वेडी आशा आहे
'अग वेडे! अंश अंश सापडलो तरी मी एकसंध भेटणार नाहीच तुला'
हे समजवायला एकदातरी येशील तू ….
येशील का रे ??

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

Hmmm